सिंह मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 15 Dec 2021 03:31:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 सिंह मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 माझा आवडता प्राणी – सिंह मराठी निबंध  | Lion Essay In Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/ https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/#respond Tue, 14 Dec 2021 06:17:26 +0000 https://dailymarathinews.com/?p=2941 प्रस्तुत लेख हा माझा आवडता प्राणी - सिंह या विषयावर मराठी निबंध आहे. या निबंधात सिंहाचे राहणीमान, त्याची शरीररचना आणि वास्तव्य अशा सर्व

The post माझा आवडता प्राणी – सिंह मराठी निबंध  | Lion Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा माझा आवडता प्राणी – सिंह (My Favourite Animal Lion Essay In Marathi) या विषयावर मराठी निबंध आहे. या निबंधात सिंहाचे राहणीमान, त्याची शरीररचना आणि वास्तव्य अशा सर्व बाबींची चर्चा करण्यात आलेली आहे.

सिंह मराठी निबंध | Majha Avadta Prani Sinh Marathi Nibandh |

लहानपणापासून आपण विविध प्राण्यांच्या कथा वाचत आलेलो आहोत. त्यामध्ये सर्वात शूर प्राणी म्हणजे सिंह! स्वतःला वाटेल तेव्हा शिकार करणे, कोणालाही न घाबरणे, आणि स्वतःच्या वनक्षेत्रात परकीय प्राण्याचे आक्रमण होऊ न देणे, अशा काही गुणांमुळे त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते.

सिंह कोणत्याही प्रकारचा आव आणत नाही. शिकार करताना किंवा इतर कोणत्याही वेळी तो धूर्तपणा करत नाही. स्वतःचे अन्न स्वतः शिकार करून तो मिळवत असतो. असे सर्वच्या सर्व राजाचे गुण हे सिंहाच्या स्वभावात आढळतात.

सिंहाचे शास्त्रीय नाव पँथेरा लिओ असे आहे. तर इंग्लिशमध्ये त्याला लायन (Lion) असे म्हटले जाते. सिंह हा मांसाहारी प्राणी आहे. तो आपल्यापेक्षा कमजोर प्राण्याची शिकार करतो. विशेष म्हणजे सिंहाला रात्रीच्या अंधारात शिकार करणे आवडते.

सिंहाचा रंग करडा – तांबडा असतो. नर सिंहाला आयाळ असते तर मादी सिंहाला आयाळ नसते. सिंह हा १५० ते २५० किलो वजनाचा असतो. सिंहाला चार पाय, आयाळ, अणकुचीदार दात, आणि एक शेपटी असते.

सिंहाच्या तोंडात असणारे अणकुचीदार दात आणि पायाच्या पंजाला असणारी तीक्ष्ण नखे यांमुळे केलेली शिकार त्याला घट्ट पकडता येते. सिंहाच्या आवाजाला गुरगुरणे म्हणतात तर त्याच्या आक्रोशपूर्ण आवाजाला डरकाळी असे म्हणतात.

सिंहाच्या रंगावरून आणि आकारावरून त्याची जात ठरत असते. काही सिंह पांढऱ्या रंगाचे देखील असतात. आफ्रिकी सिंह, आशियाई सिंह, युरोपियन सिंह आणि बरबेरी सिंह असे सिंहाचे चार प्रकार पडतात. सिंहाच्या विविध प्रजाती जगभरात आढळतात.

इतर सर्व प्राणी कोणत्या ना कोणत्या गुणामुळे प्रसिध्द आहेत. तसाच सिंह देखील त्याच्या शूर आणि क्रूर स्वभावामुळे प्रसिध्द आहे. त्याची चाल आणि थाट पाहूनच सर्वजण त्याच्याकडे आकर्षित होत असतात. सिंहाचे असे सर्व गुण मलादेखील आवडत असल्याने सिंह हा माझा आवडता प्राणी आहे.

तुम्हाला माझा आवडता प्राणी – सिंह (Lion Essay In Marathi) हा मराठी निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post माझा आवडता प्राणी – सिंह मराठी निबंध  | Lion Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/feed/ 0 2941
सिंह मराठी माहिती | Lion Information In Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/ https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/#respond Wed, 06 Oct 2021 03:39:53 +0000 https://dailymarathinews.com/?p=2627 प्रस्तुत लेखात सिंहाविषयी मराठी माहिती देण्यात आलेली आहे. सिंहाचे अस्तित्व आणि सिंहाचे राहणीमान अशा सर्व मुद्द्यांची चर्चा

The post सिंह मराठी माहिती | Lion Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात सिंहाविषयी मराठी माहिती (Lion Information In Marathi) देण्यात आलेली आहे. सिंहाचे अस्तित्व, सिंहाचे वर्णन, आणि सिंहाचे राहणीमान अशा सर्व मुद्द्यांची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

जंगलाचा राजा – सिंह | Sinh Marathi Mahiti |

लहानपणापासून आपण विविध प्राण्यांच्या कथा वाचत आलेलो आहोत. त्यामध्ये सर्वात भीतीदायक प्राणी कोणता वाटला असेल तर तो म्हणजे सिंह!

स्वतःला वाटेल तेव्हा शिकार करणे, कोणालाही न घाबरणे, ऐटीत चालणे, आणि स्वतःच्या वनक्षेत्रात परकीय प्राण्याचे आक्रमण होऊ न देणे, अशा काही गुणांमुळे त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते.

सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो.  सिंहाचे अस्तित्त्व पूर्वीपासूनच आहे. सिंहाचे शास्त्रीय नाव पँथेरा लिओ असे आहे. इंग्लिशमध्ये त्याला Lion (लायन) असे म्हटले जाते.

सिंहाला पोहता सुध्दा येते. सिंह हा मांसाहारी प्राणी आहे. तो शाकाहारी प्राण्याची शिकार करतो. विशेष म्हणजे सिंह हा रात्रीच्या अंधारात शिकार करतो. विशेष म्हणजे जास्तीत जास्त शिकार सिंहिनी करतात.

सिंहाचे एकूण चार प्रकार पडतात. आफ्रिकी सिंह, आशियाई सिंह, युरोपियन सिंह आणि बरबेरी सिंह!

सिंहाची शरीररचना –

• सिंहाचा रंग करडा – तांबडा असतो. नर सिंहाला आयाळ असते तर मादी सिंहाला आयाळ नसते. सिंह हा १५० ते २५० किलो वजनाचा असतो.

• सिंहाला चार पाय, आयाळ, अणकुचीदार दात, आणि एक शेपटी असते.

• सिंहाच्या तोंडात अणकुचीदर दात असतात आणि पायाच्या पंजालासुद्धा तीक्ष्ण नखे असतात, ज्यामुळे केलेली शिकार त्यांना घट्ट पकडता येते.

• सिंहाच्या आवाजाला गुरगुरणे म्हणतात तर त्याच्या आक्रोशपूर्ण आवाजाला डरकाळी असे म्हणतात.

तुम्हाला सिंह मराठी माहिती (Lion Information In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा…

लेखन सौजन्य – प्रीती पवार (सातारा)

The post सिंह मराठी माहिती | Lion Information In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/feed/ 0 2627