सावित्रीबाई फुले १० ओळी मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 02 Jan 2022 22:23:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 सावित्रीबाई फुले १० ओळी मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 सावित्रीबाई फुले – १० ओळी मराठी निबंध | Savitribai Phule 10 Oli Nibandh https://dailymarathinews.com/savitribai-phule-10-oli-nibandh/ https://dailymarathinews.com/savitribai-phule-10-oli-nibandh/#respond Sun, 02 Jan 2022 06:40:54 +0000 https://dailymarathinews.com/?p=3067 प्रस्तुत निबंध हा सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी १० ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात अत्यंत मुद्देसूद पद्धतीने सावित्रीबाई यांच्याबद्दल

The post सावित्रीबाई फुले – १० ओळी मराठी निबंध | Savitribai Phule 10 Oli Nibandh appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत निबंध हा सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी १० ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात अत्यंत मुद्देसूद पद्धतीने सावित्रीबाई यांच्याबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे.

सावित्रीबाई फुले – १० ओळी निबंध | Savitribai Phule 10 Lines Essay In Marathi

१. ज्ञानज्योती, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी भारतीय स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून स्त्री शक्तीला समाजात महत्वाचे स्थान मिळवून दिले.

२. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला.

३. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह जोतीराव फुले यांच्याशी झाला.

४. जोतीराव फुले आणि सावित्रीबाई यांनी जातीयता, अनिष्ट रुढी – परंपरा आणि निरक्षरता या समाजाला घातक ठरणाऱ्या बाबींविरुद्ध लढा दिला.

५. महात्मा फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा काढली. तेथे सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून काम पाहिले.

६. फुले दांपत्याने इ. स. १८४८ ते १८५२ पर्यंत एकूण १८ शाळांची स्थापना केली.

७. विधवा आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या यशवंतला दत्तक घेऊन सावित्रीबाईंनी त्याला शिक्षण दिले व त्याला डॉक्टर बनवले.

८. जुलै १८८७ मध्ये जोतिरावांना पक्षाघाताचा आजार झाला. त्यांच्या आजारपणात सावित्रीबाईंनी त्यांची सेवा केली.

९. इ. स. १९९६ – ९७ साली पसरलेल्या प्लेग या साथीच्या आजाराची समस्या समजून घेऊन सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ दवाखाना सुरू केला.

१०. प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला आणि १० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

तुम्हाला सावित्रीबाई फुले – १० ओळी मराठी निबंध (Savitribai Phule 10 Oli Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post सावित्रीबाई फुले – १० ओळी मराठी निबंध | Savitribai Phule 10 Oli Nibandh appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/savitribai-phule-10-oli-nibandh/feed/ 0 3067