सवयी कशा बदलाव्या Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 08 Dec 2021 07:17:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 सवयी कशा बदलाव्या Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 माझ्यातील वाईट सवयी मी कशा बदलल्या… https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/ https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/#respond Wed, 08 Dec 2021 07:13:42 +0000 https://dailymarathinews.com/?p=2919 आपल्याला वाईट अनुभव येतो ती सवय वाईट आणि ज्या सवयीने आपल्याला जीवनाचा चांगला अनुभव येतो ती सवय चांगली

The post माझ्यातील वाईट सवयी मी कशा बदलल्या… appeared first on Daily Marathi News.

]]>
सवय ही सवय असते. तिला वाईट आणि चांगली असे आपण म्हणत असतो. तरीही वाईट सवय म्हणजे ज्या सवयीने आपल्याला वाईट अनुभव येतो ती सवय वाईट आणि ज्या सवयीने आपल्याला जीवनाचा चांगला अनुभव येतो ती सवय चांगली!

उदाहरण

• चांगल्या सवयी –

१. व्यायाम / योगा करणे
२. मदत करणे
३. नाती सुधारणे
४. सकाळी लवकर उठणे
५. उत्साही, आनंदी राहणे
६. मैदानी खेळ
७. छंद जोपासणे

• वाईट सवयी –

१. रात्री जागरण करणे
२. मोबाईल आणि टीव्हीचा अतिवापर
३. व्यसन
४. आळस
५. कोणताही खेळ न खेळणे
६. निंदा करणे
७. अभ्यास न करणे
८. टाइमपास करणे

वरील सांगितलेल्या सवयी या अशा चांगल्या आणि वाईट सवयी आहेत ज्यामुळे तुम्हाला चांगला आणि वाईट अनुभव प्राप्त होऊ शकतो.

मी वाईट सवयी कशा बदलल्या ?

मी यापूर्वी देखील एका लेखात असे सांगितले होते की मी डायरी लिहतो. त्यामुळे स्वतःच्या वाईट सवयी, वाईट वर्तणूक, आणि वाईट अनुभव लगेच समजून घेता येतात. टीव्ही पाहणे हे वाटते तेवढे वरवरचे नाही. आपल्या स्वभावानुसार आणि सुप्त इच्छांनुसार आपण टीव्ही चॅनल्स पाहत असतो.

टीव्ही पाहणे –

प्रत्येक वयातील लोकांसाठी चॅनल्स उपलब्ध असल्याने लहान थोर असे सर्वजण टीव्हीचा आनंद घेत असतात परंतु यामध्ये त्यांच्या मनाची जडणघडण देखील त्याच पद्धतीने होत असते हे लक्षात घ्यावे लागेल. पूर्वी चित्रपट पाहण्याची सवय असल्याने चित्रपटातील आयुष्य जसे दाखवले जाते तसेच आयुष्य असते असा माझा गैरसमज खूप मोठे झाल्यावर तुटला.

वास्तविक जीवनात जगताना लोकांशी संवाद साधणे, एकमेकांची काळजी घेणे, उल्हासपूर्ण दिवस व्यतित करणे याबद्दल माझ्या संकल्पना चित्रपटात दाखवतात तशा होत्या. हिरो जे काही करेल तेच सत्य आहे असे वाटल्याने तो जो मूर्खपणा करेल तसेच आपणही आपल्या जीवनात करण्याचा प्रयत्न करत असतो.

टीव्हीत दाखवले जाणारे प्रेम, हिंसाचार, मानवी भावनांचा उद्रेक, या सर्व गोष्टी इतक्या रंजक पद्धतीने दाखवल्या जातात की नक्की मूर्ख कोण आहे तेच कळत नाही, टीव्हीवर जे लोक काम करत आहेत ते, जे मालिका / चित्रपट बनवत आहेत ते, की आपण! मी जेव्हा टीव्ही पाहण्याची सवय मोडली तेव्हा मला एका वास्तविक जीवनाची दिशा मिळत गेली.

टीव्ही पाहिल्याने एक काल्पनिक आणि अवास्तविक जग आपल्याला दिसत राहते. जीवनातील खरे अनुभव त्याहून खूप वेगळे असतात. ती सवय मोडण्यासाठी मी टीव्हीपेक्षा जास्त चांगला अनुभव कोणत्या गोष्टीतून घेऊ शकतो याचा सर्वप्रथम विचार केला.

मग मला मैदानी खेळ, चित्रकला, वाचन असे पर्याय दिसू लागले. ते मग मी हळूहळू जोपासू लागलो. काही महिन्यांतच टीव्ही पाहणे मला कंटाळवाणे वाटू लागले. मी जोपासलेल्या छंदातच मला गंमत वाटू लागली.

त्यानंतर फक्त टीव्हीच नाही तर मोबाईलवर टाइमपास करणे, इकडेतिकडे फालतू गप्पा मारणे, वादविवाद करणे, अभ्यास न करणे अशा कितीतरी गोष्टी आपोआप बदलल्या. सध्या मी खूप क्रिएटिव्ह आणि आनंद देणाऱ्या सवयी लावून घेतलेल्या आहेत.

त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या वाईट सवयी आणि चांगल्या सवयी समजून घेऊन त्यावर काम केलंत की तुम्हाला जीवनाचा एक अप्रतिम अनुभव येऊ शकेल.

The post माझ्यातील वाईट सवयी मी कशा बदलल्या… appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%b8%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/feed/ 0 2919