सचिन तेंडुलकर Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 31 Jan 2020 11:33:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 सचिन तेंडुलकर Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Sachin Tendulkar information in Marathi | सचिन रमेश तेंडुलकर – क्रिकेटचा देव ! https://dailymarathinews.com/sachin-tendulkar-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/sachin-tendulkar-information-in-marathi/#respond Fri, 31 Jan 2020 11:33:46 +0000 https://dailymarathinews.com/?p=1361 गॉड ऑफ क्रिकेट, मास्टर ब्लास्टर अशा टोपण नावांनी प्रसिद्ध असलेला क्रिकेटपटू कोणाला माहीत नाही! आत्ताची जी भारतीय पिढी क्रिकेट खेळत आहे त्या सर्वांचा रोल मॉडेल ...

Read moreSachin Tendulkar information in Marathi | सचिन रमेश तेंडुलकर – क्रिकेटचा देव !

The post Sachin Tendulkar information in Marathi | सचिन रमेश तेंडुलकर – क्रिकेटचा देव ! appeared first on Daily Marathi News.

]]>
गॉड ऑफ क्रिकेट, मास्टर ब्लास्टर अशा टोपण नावांनी प्रसिद्ध असलेला क्रिकेटपटू कोणाला माहीत नाही! आत्ताची जी भारतीय पिढी क्रिकेट खेळत आहे त्या सर्वांचा रोल मॉडेल जर कोण असेल तर तो म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर ! गतकालीन क्रिकेटपटू, सध्याचे खेळत असलेले खेळाडू, पंच, प्रेक्षक सर्वच जण सचिनची खेळी पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असत. त्याच्याबद्दल एक कमालीचा आदर सर्वांच्याच मनात आहे. एक खेळाडू आणि माणूस म्हणून देखील तो तेवढाच श्रेष्ठ आहे.

क्रिकेट व्यतिरिक्त क्वचितच इतर बाबतीत तो प्रसिद्ध असेल. लहानपणापासून क्रिकेटची बॅट आणि तो असे एकच समीकरण त्याच्याबद्दल देता येईल. सर्वोत्तम खेळाडू हा लेजंड कसा बनू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबईत झाला. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेट चे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. रमाकांत आचरेकर हे त्याचे प्रशिक्षक होते. शालेय जीवनात त्याने आपला मित्र विनोद कांबळी याच्यासमवेत हॅरिस शिल्ड स्पर्धेत ६६४ धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. तेव्हाच ही जोडी सर्वांचे केंद्र बनली होती. १९८८-८९ साली प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात त्याने गुजरात विरूध्द नाबाद शतकी खेळी खेळली होती. असा पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणारा तो सर्वात तरुण खेळाडू होता.

विक्रमी क्रिकेट कारकीर्द –

वयाच्या १६ व्या वर्षी सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली कराची, पाकिस्तान येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वसिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादीर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला.

सचिनने आपले पहिले एकदिवसीय शतक १९९४ साली ऑस्ट्रेलिया विरूध्द नोंदवले. त्याला पहिले शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली.

सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावलेले आहे.

१९९७ साली विस्डेनने सचिनला त्या वर्षीचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू घोषित केले. ह्याची पुनरावृत्ती सचिनने १९९९, २००१ आणि २००२ साली केली.

त्याने कसोटी क्रिकेट मध्ये ४९ तर एकदिवसीय क्रिकेट मध्ये ५१ शतके झळकावली आहेत.

तेंडुलकरने एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम सहा वेळा केला आहे. हा पराक्रम त्याने सहा वेळा केलेला आहे.

तेंडुलकर गोलंदाज म्हणून प्रसिद्ध नसला तरी त्याने योग्य अशी गोलंदाजी देखील केली आहे. त्याने कसोटीत १३२ आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे.

१९९३ साली दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात ६ धावांची गरज होती. संपूर्ण षटकात केवळ तीन धावा देऊन भारताला सामना जिंकून दिला.

ऑस्ट्रेलिया या मजबूत संघाविरुद्ध नेहमीच धडाकेबाज खेळी करण्यात सचिन यशस्वी ठरलेला होता. प्रसिद्ध गोलंदाज शेन वॉर्न एकदा गमतीत म्हणाला की, सचिनच्या फलंदाजीची स्वप्ने मला पडतात.

२००० – २०१० या दशकात अनेक दुखापतींनी सचिनला ग्रासले परंतु त्यावर त्याने मात करून आणि सर्वोत्तम फलंदाजी करून टीकाकारांची तोंडे बंद केली.

२००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड.

२०११ चा विश्वचषक जिंकणे हा सर्वात अविस्मरणीय क्षण असल्याचे तेंडुलकर म्हणतो.

१६ मार्च २०१२ रोजी बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यामध्ये शतक झळकावून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके पूर्ण केली.

तेंडुलकरने २०१३ रोजी आपला २००वा कसोटी सामना खेळून झाल्यावर क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली.

जागतिक स्तरावर सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर कसोटीत आणि विव्ह रिचर्ड्स यांच्यानंतर एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वोत्तम मानला गेलेला फलंदाज.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत शतकांचे शतक करणारा एकमेव खेळाडू

आयपीएल “मुंबई इंडियन्स” संघासाठी तो खूप सामने खेळला आहे आणि अजूनही तो मार्गदर्शक म्हणून या संघाशी जोडला गेला आहे. मुंबई इंडियन्स संघ आपल्या यशाचे श्रेय सचिन तेंडुलकरला देत असतो.

क्रिकेट व्यतिरिक्त जीवन –

व्यवसायाने बालरोगतज्ञ असलेल्या अंजली मेहता नामक मुलीशी १९९५ साली सचिनने विवाह केला. त्यांना सारा आणि अर्जुन अशी दोन अपत्ये आहेत. पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्‍न या पुरस्कारांनी सचिन तेंडुलकरला सन्मानित केले गेले आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात
आला आहे. भारतीय विमान दलाने त्याला ” ग्रुप कॅप्टन ” हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिनला ” मानद डॉक्टरेट ” पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत ” मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ” हा गौरव प्रदान करण्यात आला.

The post Sachin Tendulkar information in Marathi | सचिन रमेश तेंडुलकर – क्रिकेटचा देव ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/sachin-tendulkar-information-in-marathi/feed/ 0 1361