शेतीपूरक व्यवसाय Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 23 Jan 2020 10:33:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 शेतीपूरक व्यवसाय Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 हेच शेतीपूरक व्यवसाय आहेत ते अत्यंत कमी खर्चाचे ! https://dailymarathinews.com/shetipurak-vyavsay-margdarshan/ https://dailymarathinews.com/shetipurak-vyavsay-margdarshan/#respond Thu, 23 Jan 2020 10:33:48 +0000 https://dailymarathinews.com/?p=1228 शेतीपूरक व्यवसाय ग्रामीण महाराष्ट्रात किंवा निमशहरी भागात आपण उभारू शकतो. या प्रकल्पांसाठी लागणारा खर्च जास्त नसल्याने तो पैसा तुम्ही कर्ज किंवा स्वतः भांडवल वापरून उभारू ...

Read moreहेच शेतीपूरक व्यवसाय आहेत ते अत्यंत कमी खर्चाचे !

The post हेच शेतीपूरक व्यवसाय आहेत ते अत्यंत कमी खर्चाचे ! appeared first on Daily Marathi News.

]]>
शेतीपूरक व्यवसाय ग्रामीण महाराष्ट्रात किंवा निमशहरी भागात आपण उभारू शकतो. या प्रकल्पांसाठी लागणारा खर्च जास्त नसल्याने तो पैसा तुम्ही कर्ज किंवा स्वतः भांडवल वापरून उभारू शकता. आज महाराष्ट्रात किंवा भारतात बेरोजगारीचे वाढते प्रमाण युवकाला उद्योग करण्यास भाग पाडत आहे. अशातच कोणता उद्योग करावा याबद्दल पुरेपूर माहिती नसल्याने आम्ही घेऊन येत आहोत अशी माहिती जी तुम्हाला उद्योग करण्याबद्दल मार्गदर्शक ठरेल.

फक्त शेती करून शेतकरी उपजीविका भागवू शकतो परंतु आजची महागाई आणि तंत्रज्ञान पाहता त्याला शेतीसाठी जोडव्यवसाय आज ना उद्या करावा लागणारच आहे. शेतीमधून उत्पन्नाची हमी मुबलक पाणी असल्याने देऊ शकतात. परंतु काही भागात फक्त पावसावर शेती अवलंबून असते अशा ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय खूप फायदेशीर ठरतील.

शेतीपूरक व्यवसाय यादी खाली दिलेली आहे. या लेखामध्ये अशा व्यवसायांची फक्त प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे.

१. कुक्कुटपालन –

कमी खर्चात आणि थोड्याशा जागेत हा व्यवसाय तुम्ही करू शकता. कोणत्या जातीचे कोंबडा – कोंबडी तुम्ही पाळणार आहात यावर तुमचा व्यवसाय तुलनात्मक ठरेल. आज कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत आहे. ब्रॉयलर , इंग्लिश , देशी, डी.पी. इत्यादी अशा अनेक जाती कमी जास्त प्रमाणावर तुम्ही सांभाळू शकता. फक्त वेळोवेळी लसीकरण, जागेची स्वच्छता, एवढी काळजी घ्यावी लागते. कमी कष्टात जास्त उत्पन्न तुम्ही या व्यवसायातून मिळवू शकता.

२. शेळी पालन –

शेळीचा प्रजनन काळ हा लगेच येत असल्याने वर्षभरात तुम्ही शेळींची संख्या वाढवू शकता. जर शेळी बांधायला शेड उभे केले तर हमखास उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. फक्त शेळीच्या चाऱ्याची व्यवस्था करावी लागते.

३. दुग्ध व्यवसाय –

ग्रामीण भागात मुबलक चारा असल्याने गाई – म्हैशी – शेळ्या तुम्ही दुग्ध उत्पादनासाठी पाळू शकता. आता दूध प्रक्रिया आणि दूध उत्पादन उद्योग वाढल्याने दुधाची मागणी देखील वाढत आहे. तुमच्याकडे शेड किंवा एखादा गोठा असल्यास तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

४. मशरुम शेती –

मशरूम मोठमोठ्या हॉटेल्समध्ये मागवले जाते. त्याची डिश खूप महाग आहे. त्याची पौष्टिक मूल्ये आणि जीवनसत्वे उच्च प्रमाणात आहेत. ग्रामीण भागात पोषक वातावरण असल्याने एखादया बंदिस्त शेड मध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. शेडमधील तापमान नियंत्रित ठेवणे एवढी एकच अट या व्यवसायात आहे.

५. रेशीम शेती –

भारत आणि चीन हे दोन देश रेशीम उत्पादनात अव्वल आहेत. रेशीमची वाढणारी मागणी हीच रेशीम उद्योगाची खरी चालना आहे. रेशीम कच्चा माल तयार करण्यापासून पूर्ण प्रक्रियेपर्यंत चांगला भाव मिळत असल्याने कमी उत्पन्नाच्या जमिनीत तुती लागवड करून हा उद्योग तुम्ही वाढवू शकता.

६. मधमाशी पालन –

अनेक आजारांवर गुणकारी आणि मानवी शरीराला आरोग्यदायी असा मध तयार करणे म्हणजे तुमच्या उत्पन्नात नक्कीच वृद्धी होणार. मध तुम्ही स्वतः देखील विकू शकता किंवा योग्य बाजार बघून जास्त मध एकदम विकू शकता. एखादी पडीक जमीन असेल तर लाकडाचे खोके/पेटी तयार करून तुम्ही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर देखील सुरू करू शकता.

७. मत्स्य पालन –

एक छोटे तळे किंवा विहीर असेल तर माशाची अंडी किंवा छोटी पिल्ले आणून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. पाण्याचे शुद्धीकरण आणि माशांचे योग्य खाद्यप्रमाण यांचे नियोजन केल्यास कमी वेळेत चांगले उत्पन्न तुम्हाला मिळू शकेल.

८. गांडूळ खत –

एखादी चौकोनी किंवा गोलाकार टाकी बांधून त्यामध्ये ओला कचरा, भाजीपाला, गुरांचे शेण वारंवार टाकत राहून त्यामध्ये गांडूळ सोडावीत. गांडूळ खत खूप पोषक असून शेतीसाठी त्याचा उपयोग होतो. तुम्ही वेगवेगळ्या रास्त भावात गांडूळ खत विकू शकता.

९. औषधी वनस्पती लागवड –

नर्सरीसारखे योग्य आच्छादन तयार करून थोड्याशा जमिनीत देखील तुम्ही सर्व औषधी वनस्पती लागवड करू शकता. औषधी वनस्पती पुढे शहरी भागात औषध प्रक्रिया उद्योगात, विविध साैंदर्य प्रसाधनात वापरल्या जातात. याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

१०. परसबाग –

योग्य पाणी नियोजन आणि उपलब्धता असल्यास तुम्ही परसबाग निर्मिती करू शकता. असे नियोजन करून तुम्ही वेगवेगळ्या
काळात कोणत्या भाज्या , फळे येतात त्याची लागवड करू शकता. स्थानिक किंवा बाजारभाव विक्री देखील करू शकता. हा व्यवसाय एक नियमित आणि हमखास उत्पन्न मिळवून देणारा आहे.

अशा प्रकारचे शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारकडून अनुदान मिळते तसेच अत्यंत छोट्या पातळीवर देखील वरील सर्व व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.

The post हेच शेतीपूरक व्यवसाय आहेत ते अत्यंत कमी खर्चाचे ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shetipurak-vyavsay-margdarshan/feed/ 0 1228