शिवजन्मोत्सव Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Tue, 25 Jan 2022 05:07:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 शिवजन्मोत्सव Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 शिवजयंती माहिती मराठी | Shivjayanti Information In Marathi https://dailymarathinews.com/shivjayanti-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/shivjayanti-information-in-marathi/#comments Sat, 02 Jan 2021 00:18:23 +0000 https://dailymarathinews.com/?p=1891 महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रातील एक मोठा सणच आहे.

The post शिवजयंती माहिती मराठी | Shivjayanti Information In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
अशा सणाबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल किशोर पिढी, तरुण पिढी आणि इतर सर्व घटकांना माहिती होणे अत्यावश्यक आहे. त्याचाच विचार करून आम्ही या लेखामध्ये शिवजयंती माहिती (Shivjayanti Information in Marathi) दिलेली आहे.

महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रातील एक मोठा सणच आहे.

शिवजयंती उत्सव | शिवजन्मोत्सव | Shivjayanti Utsav Mahiti Marathi |

शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रासाठी एका उत्सवाप्रमाणे आहे. सर्व स्तरांतून शिवजयंती साजरी होताना प्रत्येक जण आपापल्या परीने शिवरायांना मानवंदना देत असतो. काहीजण त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात तर काहीजण सार्वजनिक मिरवणूक काढतात. कलापथके त्यांच्या कलेमार्फत शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून सांगतात. त्यासाठी नृत्य, संगीत, वादन, अभिनय अशा विविध कलांचा उपयोग केला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्मदिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचा क्षण असतो. छ. शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाला शिवजयंती (Shivjayanti), शिवजन्मोत्सव (Shiv Janmotsav) असेही म्हणतात.

शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष होते. त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व, स्वराज्य स्थापना तसेच राज्य कारभार असे सर्व बोध समाज मनाला होण्यासाठी शिवजयंती प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून साजरी केली जात असते.

शिवजयंती तारीख ( Shivjayanti Date )

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. त्यांच्या जन्म तारखेबद्दल पूर्वी खूप वाद होते. आजही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी वैशाख शुद्ध तृतीया (६ एप्रिल १६२७) आणि मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया (१९ फेब्रुवारी १६३०) हे दोन दिवस शिवरायांचे जन्मदिवस म्हणून मानले जातात.

महाराष्ट्र सरकारने २००१ मध्ये या वादावर निर्णय घेत फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख स्वीकारली. सर्व सरकारी – खाजगी शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि उद्योगांना या दिवशी सुट्टी असते. सर्व लोक मोठ्या प्रेरणेने आणि उत्साहात शिवजयंती साजरी करतात.

शिवजयंतीची सुरुवात –

शिवजयंती प्रथम कोणी साजरी केली? किंवा शिवजयंतीची सुरुवात कशी झाली? असे अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्यांची आपल्याला माहिती असणे अत्यावश्यक आहे. रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर एक एक पोवाडा लिहिला.

शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आणि नेतृत्व कसे होते हे लोकांपर्यंत पोहचवण्याचे सर्वप्रथम काम महात्मा जोतीराव फुले यांनी १८७० साली शिवजयंती साजरी करून केले. तीच महाराजांची पहिली शिवजयंती होती आणि तो सर्व कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यांच्या व्यतिरिक्त लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

वाचकांसाठी थोडेसे –

तुम्हाला शिवजयंती माहिती (Shivjayanti Information In Marathi) कशी वाटली? याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की आम्हाला कळवा. शिवजयंती साजरी करताना शिवरायांचे विचार आणि कर्तृत्व रुजवण्याचा प्रयत्न असू द्या… धन्यवाद!

The post शिवजयंती माहिती मराठी | Shivjayanti Information In Marathi appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shivjayanti-information-in-marathi/feed/ 1 1891