वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन भाषण Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 05 Feb 2023 04:54:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन भाषण Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 वार्षिक स्नेहसंमेलन – उद्घाटन भाषण – Annual Function Welcome Speech https://dailymarathinews.com/annual-function-welcome-speech/ https://dailymarathinews.com/annual-function-welcome-speech/#respond Sun, 05 Feb 2023 04:51:48 +0000 https://dailymarathinews.com/?p=5475 आज या व्यासपीठावर जमलेले सर्व शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक तसेच सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक अशा सर्वांना माझा नमस्कार!

The post वार्षिक स्नेहसंमेलन – उद्घाटन भाषण – Annual Function Welcome Speech appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा वार्षिक स्नेहसंमेलन ( Annual Function) कार्यक्रमावेळी करण्यात येणारे उद्घाटन भाषण (Welcome Speech) आहे. एक मुद्देसूद स्वरूपाचे आणि सामाईक असे हे भाषण आहे. प्रसंगानुरूप तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता…

उद्घाटन भाषण • Welcome Speech (Annual Day Speech)

आज या व्यासपीठावर जमलेले सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक तसेच सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक अशा सर्वांना माझा नमस्कार!

कार्यक्रमाची सुरुवात करताना मला खूपच उत्साह जाणवत आहे. असा भव्यदिव्य कार्यक्रम हा प्रत्येक वर्षी आपल्या शैक्षणिक संकुलात आयोजित केला जातो याचा आपल्या सर्वानाच रास्त अभिमान आहे.

संपूर्ण कार्यक्रम हा अगदीच सांस्कृतिक स्वरूपाचा असेल. ज्यामध्ये वक्तृत्व, संगीत, नृत्य, नाट्य असे विविध कलाविष्कार विद्यार्थी सादर करतील.

त्याशिवाय यावर्षी विविध क्षेत्रांत, स्पर्धा परीक्षांत, क्रीडा स्पर्धांत ज्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले त्यांचा सत्कार देखील आयोजित करण्यात आलेला आहे.

वार्षिक स्नेहसंमेलन हा कार्यक्रम म्हणजे फक्त विद्यार्थ्यांचा कलाविष्कार नसून सर्व पालक, शिक्षक, गावचे नागरिक अशा सर्वांचाच सहभाग असलेला सांस्कृतिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे असे म्हणावे लागेल.

आपला पाल्य शैक्षणिक वर्षात कशी प्रगती करतो आहे याची जाणीव पालकांना व्हावी व त्यांनी शिक्षकांना व शालेय कर्मचाऱ्यांना त्याबद्दल विचारणा करावी असाही उद्देश्य या कार्यक्रमाचा आहे.

पालकांना व नागरिकांना शिक्षणाबद्दल काही सूचना करावयाच्या असतील तर ते करू शकतात. तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हा सर्वांचा निरोप घेतो आणि कार्यक्रमाला सुरुवात व्हावी अशा सूचना देतो. धन्यवाद!

तुम्हाला वार्षिक स्नेहसंमेलन – उद्घाटन भाषण (Annual Function Welcome Speech In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post वार्षिक स्नेहसंमेलन – उद्घाटन भाषण – Annual Function Welcome Speech appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/annual-function-welcome-speech/feed/ 0 5475