लालबहादूर शास्त्री - मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Mon, 20 Sep 2021 04:45:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 लालबहादूर शास्त्री - मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 लालबहादूर शास्त्री – मराठी निबंध ! Lal Bahadur Shastri Essay In Marathi | https://dailymarathinews.com/lal-bahadur-shastri-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/lal-bahadur-shastri-essay-in-marathi/#respond Wed, 22 Jul 2020 08:48:57 +0000 https://dailymarathinews.com/?p=1730 लालबहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, थोर देशभक्त आणि स्वातंत्र्यसेनानी होते. माझा आवडता नेता या प्रकारात त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना आणि प्रसंग यांचा ...

Read moreलालबहादूर शास्त्री – मराठी निबंध ! Lal Bahadur Shastri Essay In Marathi |

The post लालबहादूर शास्त्री – मराठी निबंध ! Lal Bahadur Shastri Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
लालबहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, थोर देशभक्त आणि स्वातंत्र्यसेनानी होते. माझा आवडता नेता या प्रकारात त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना आणि प्रसंग यांचा उल्लेख करावयाचा असतो.

विद्यार्थीदशेत असताना लिहाव्या लागणाऱ्या अनेक निबंधापैकी एक म्हणून लालबहादूर शास्त्री मराठी निबंध ( Lal Bahadur Shastri Essay In Marathi ) लिहणे अपेक्षित असते. चला तर मग पाहूया, कसा लिहायचा “लालबहादूर शास्त्री” यांच्या जीवनावर निबंध!

माझा आवडता नेता – लालबहादूर शास्त्री ! Majha Awadta Neta – Marathi Nibandh |

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सेनानी, कार्यकर्ते, राष्ट्रभक्त, भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी बनारसजवळील मोगलसराई या रेल्वे वसाहतीत झाला. त्यांच्या आईचे नाव रामदुलारी तर वडिलांचे नाव शारदाप्रसाद असे होते.

शास्त्री यांचे वडील सुरुवातीला शिक्षक होते नंतर ते शासकीय लिपिक झाले. लालबहादूर लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंब बनारसजवळ रामनगर येथे स्थायिक झाले.

शास्त्री हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये शिकत असताना महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर सखोल परिणाम झाला. ते महात्मा गांधींच्या असहकार विचाराने प्रभावित झाले. त्यांना पुढे महात्मा गांधींचा सहवास देखील लाभला.

शास्त्री यांनी 1925 मध्ये काशी विद्यापीठातून तत्त्वज्ञान या विषयात शास्त्री ही पदवी मिळवली. विद्यार्थिदशेत डॉ. भगवानदास, गोपालशास्त्री या अध्यापकांचा आणि नंतर पुरुषोत्तमदास टंडन व लाला लजपत राय या महान व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव पडला.

लाला लजपत राय यांनी स्थापन केलेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ द पीपल’ या संस्थेत ते सेवक म्हणून रुजू झाले आणि त्यांच्या पुढच्या जीवनाचे वास्तव्य अलाहाबाद या ठिकाणी झाले. 1927 मध्ये त्यांचा विवाह ललितादेवी यांच्याशी झाला. पुढे त्यांना चार मुलगे आणि दोन मुली झाल्या.

अलाहाबाद येथे वास्तव्य असताना लाल बहादुर शास्त्री यांना पंडित नेहरूंचे मार्गदर्शन लाभले. सामाजिक पातळीवर अनेक संस्था आणि सरकारी
कार्यालयात त्यांनी काम पाहिले. कार्यकारिणीचे सदस्य व महासचिव इ. पदे देखील भूषविली.

स्वातंत्र्य चळवळीत असताना त्यांना सात वेळा अटक झाली. त्यांनी यावेळी एकूण नऊ वर्षांचा कारावास भोगला. 1942 च्या चळवळीत त्यांना अटक झाली तेव्हा त्यांनी तुरुंगात कांट, हेगेल, रसेल, हक्स्ली इ. विचारवंतांचे ग्रंथ अभ्यासले. मादाम क्यूरीच्या चरित्राचे त्यांनी हिंदीत भाषांतर केले.

1946 मध्ये काँग्रेस पक्षातर्फे उत्तरप्रदेश विधानसभेवर ते निवडून आले. गोविंदपंतांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे गृह आणि दळणवळण खाते देण्यात आले. पंडित नेहरूंनी 1950 मध्ये त्यांना अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव केले.

लाल बहादूर शास्त्री यांची पक्षनिष्ठा आणि कार्यशील वृत्ती पाहून पंडित नेहरू यांनी त्यांना राज्यसभेचे सभासद बनवून केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे आणि वाहतूक खात्याचे मंत्री केले. 1956 मध्ये केरळमध्ये घडलेल्या अरियालूरच्या भीषण रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

1957 मध्ये पुन्हा लोकसभेवर ते निवडून आले. त्यांनी 1957 ते 1964 या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिमंडळात संचार व परिवहन, उद्योग व व्यापार, गृह इ. खाती व्यवस्थितरीत्या सांभाळली. पंडित नेहरू यांच्या निधनानंतर काँग्रेस संसदीय सभेने 9 जून 1964 रोजी लाल बहादुर शास्त्री यांची पंतप्रधान पदावर एकमताने नियुक्ती केली.

पंतप्रधान असताना घेतलेले निर्णय हे त्यांची समर्थता दर्शवतात. भारत-पाक या देशांमध्ये रशियाच्या मध्यस्थीने ताश्कंदला वाटाघाटी होऊन नऊ कलमी ताश्कंद करारावर आयुबखान व शास्त्री यांच्या 10 जानेवारी 1966 रोजी सह्या झाल्या. त्या मध्यरात्रीच म्हणजे 11 जानेवारी 1966 रोजी शास्त्रींचे हृदयविकाराने निधन झाले.

भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान केला. उत्तम कार्यप्रणाली, संघटन कौशल्य आणि मानसिक कणखरता त्यांच्या पूर्ण आयुष्यात दिसून येते. त्यांनी दिलेला “जय जवान, जय किसान” हा नारा आजही तेवढाच प्रसिध्द आहे.

लालबहादूरांनी केलेली सेवा ही प्रत्येक वेळी योग्यच ठरली. अनेक सामाजिक सेवाभावी संस्थांत विनावेतन किंवा गरजेपुरता अल्प मोबदला घेऊन काम केले. त्यामुळे आयुष्यभर त्यांना हलाखीचे आयुष्य जगावे लागले. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा त्यांचा साधी राहणी आणि शांततापूर्ण जीवनावर जास्त भर होता.

तुम्हाला लालबहादूर शास्त्री – मराठी निबंध ( Lal Bahadur Shastri Essay In Marathi ) कसा वाटला? नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post लालबहादूर शास्त्री – मराठी निबंध ! Lal Bahadur Shastri Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/lal-bahadur-shastri-essay-in-marathi/feed/ 0 1730