लंगडी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 28 Jan 2023 12:20:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 लंगडी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 लंगडी – मराठी निबंध • Langdi Nibandh Marathi • https://dailymarathinews.com/langdi-marathi-essay-langdi-nibandh-marathi/ https://dailymarathinews.com/langdi-marathi-essay-langdi-nibandh-marathi/#respond Sat, 28 Jan 2023 07:30:20 +0000 https://dailymarathinews.com/?p=5404 कोणत्याही संसाधनांचा वापर न करता खेळले जाणारे विविध खेळ आजही या भूमीत खेळले जातात. लंगडी हा देखील त्यापैकीच एक खेळ!

The post लंगडी – मराठी निबंध • Langdi Nibandh Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
माझा आवडता खेळ या निबंध प्रकारात लंगडी या खेळाचा समावेश केला जातो. माझा आवडता खेळ – लंगडी हा मराठी निबंध (Majha Avadta Khel – Langadi Nibandh) लिहायचा असल्यास लंगडी या खेळाची प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे आवश्यक आहे.

माझा आवडता खेळ लंगडी मराठी निबंध | Majha Avadta Khel Langadi Nibandh Marathi |

पूर्वीपासून भारतात अनेक खेळ प्रसिध्द आहेत. कोणत्याही संसाधनांचा वापर न करता खेळले जाणारे विविध खेळ आजही या भूमीत खेळले जातात. लंगडी हा देखील त्यापैकीच एक खेळ! ग्रामीण भागात खेळला जाणारा हा खेळ आता स्पर्धेच्या नियमावलीत बसवून प्रत्येक शाळा व महाविद्यालयात खेळला जात आहे.

लंगडी या शब्दाचा जसा अर्थ आहे त्याप्रमाणेच आपल्याला एक पाय गुडघ्यात वाकवून एकाच पायावर पळावे लागते आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना पकडावे लागते. या खेळात कमालीची गति, चपळता आणि प्रसंगावधान आवश्यक असल्याने लंगडी हा माझा आवडता खेळ आहे.

पूर्वी फक्त मुलीच हा खेळ खेळत असत. परंतु शिक्षण व खेळाचा जसजसा प्रसार होत गेला तसतसा या खेळाचा समावेश स्पर्धेत करण्यात आला. सध्या शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर खो-खो, कबड्डी या खेळांप्रमाणेच लंगडीचा देखील समावेश केला जातो.

लंगडी या सांघिक खेळासाठी एका चौरसाकृती मैदानाची गरज असते. साधारणपणे नऊ वर्षांच्या खालील मुलांसाठी ९.१५ चौमी, ११ वर्षांखालील मुलांसाठी १०.६७ चौमी व १३ वर्षांखालील मुलांसाठी १२.१९ चौमी अशी मैदानाची मापे असतात.

लंगडी खेळात एक धावणारा व दुसरा लंगडी घालून पकडणारा असे दोन संघ असतात. त्यासाठी लंगडी व पळती असे दोन शब्द आहेत. लंगडी हा खेळ एकूण २० मिनिटांचा असतो. पहिली दहा मिनिटे एक संघ लंगडी घालतो तर दुसरा संघ तेव्हा धावत असतो.

खेळाच्या एका डावानंतर चार मिनिटांची विश्रांती असते. त्यानंतर दुसरा संघ लंगडी घालतो व पहिला संघ धावत असतो. प्रत्येक संघात ९ खेळाडूंचा समावेश असतो. या खेळात लंगडी घालून प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना स्पर्श करायचा असतो.

एकेका खेळाडूने मैदानात लंगडी घालत प्रवेश करून धावणाऱ्या दुसऱ्या संघातील खेळाडूंना बाद करायचे असते. जो संघ विशिष्ट कालावधीत सर्वाधिक खेळाडू बाद करेल तो विजेता ठरत असतो. लंगडी घालणाऱ्या खेळाडूने प्रतिस्पर्धी खेळाडूंना हाताने स्पर्श करणे बंधनकारक असते.

वीस मिनिटांत प्रत्येक खेळाडूला आव्हानात्मक भूमिका स्वीकारायची असल्याने हा खेळ खूपच रंगतदार बनत असतो. हा खेळ खेळताना शारिरीक क्षमतेचा कस लागत असल्याने प्रत्येक खेळाडूचे शारिरीक व मानसिक आरोग्य सुधारते. लंगडी हा खेळ माझा आवडता खेळ असल्याने मी दररोज शाळेत तो खेळ खेळतोच.

तुम्हाला माझा आवडता खेळ – लंगडी हा मराठी निबंध (Majha Avadta Khel Langadi Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा… धन्यवाद!

The post लंगडी – मराठी निबंध • Langdi Nibandh Marathi • appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/langdi-marathi-essay-langdi-nibandh-marathi/feed/ 0 5404