मृदा प्रदूषण १० ओळी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 12 May 2022 09:56:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 मृदा प्रदूषण १० ओळी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 मृदा प्रदूषण १० ओळी निबंध | Mruda Pradushan 10 Oli Nibandh | https://dailymarathinews.com/mruda-pradushan-10-oli-nibandh/ https://dailymarathinews.com/mruda-pradushan-10-oli-nibandh/#respond Thu, 12 May 2022 09:56:18 +0000 https://dailymarathinews.com/?p=3718 मृदा प्रदूषण (Soil Pollution) ही मागील काही वर्षांत उद्भवलेली खूपच गंभीर अशा स्वरूपाची समस्या आहे. मृदा प्रदूषण होत असल्याने जमिनीचा

The post मृदा प्रदूषण १० ओळी निबंध | Mruda Pradushan 10 Oli Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
मृदा प्रदूषण (Soil Pollution) ही मागील काही वर्षांत उद्भवलेली खूपच गंभीर अशा स्वरूपाची समस्या आहे. मृदा प्रदूषण होत असल्याने जमिनीचा कस हरवत चाललेला आहे. जमिनी नापीक बनत चालल्या आहेत.

मृदा प्रदूषण या १० ओळींच्या निबंधात (Mruda Pradushan 10 Oli Nibandh) मृदा प्रदूषण म्हणजे काय, मृदा प्रदूषणाची कारणे, मृदा प्रदूषण टाळण्यासाठी कोणते उपाय असू शकतील अशा विविध बाबींची चर्चा अत्यंत मुद्देसूद स्वरूपात करण्यात आलेली आहे.

मृदा प्रदूषण १० ओळी मराठी निबंध | Soil Pollution 10 Lines Essay In Marathi |

१. मृदा प्रदूषण हे जमीन व मातीचे होणारे अत्यंत गंभीर असे प्रदूषण आहे.

२. शेतजमिनीत रासायनिक खतांचा वापर आणि औद्योगिक व सार्वजनिक कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट यांमुळे मृदा प्रदूषण होत असते.

३. मृदा प्रदूषणास जलप्रदूषण व वायुप्रदूषण हे देखील अप्रत्यक्षरित्या जबाबदार आहेत.

४. मृदा प्रदूषित झाल्याने जमीन हळूहळू तिची पोषकतत्त्वे गमावून नापीक बनत जाते.

५. प्रदूषित जमिनीतून उत्पादित केलेले अन्न हे प्रदूषितच असते.

६. जमीन नापीक झाल्याने वृक्षलागवड व शेती या बाबी जवळजवळ अशक्य बनून जातात.

७. मृदा प्रदूषणामुळे जमिनीतील जीवजंतू व कीटक यांचे आयुष्य धोक्यात येते.

८. मृदा प्रदूषण रोखण्यासाठी आपल्याला जल, वायू, प्रकाश अशा प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणावर आळा घालावा लागेल.

९. रासायनिक पदार्थ व कचरा यांची विल्हेवाट अत्यंत योग्य पद्धतीने करावी लागेल जेणेकरून जमिनीचे कोणतेही नुकसान होणार नाही.

१०. मृदा प्रदूषण रोखण्यासाठी सामाजिक व वैयक्तिक पातळीवर जनजागृती व सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.

मृदा प्रदूषण १० ओळी निबंध (Mruda Pradushan 10 Oli Nibandh) हा लेख वाचण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…

The post मृदा प्रदूषण १० ओळी निबंध | Mruda Pradushan 10 Oli Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/mruda-pradushan-10-oli-nibandh/feed/ 0 3718