मी दप्तर बोलतोय Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 09 May 2021 12:22:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 मी दप्तर बोलतोय Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 दप्तराची आत्मकथा मराठी निबंध – Daptarachi Atmkatha Marathi Nibandh | https://dailymarathinews.com/daptarachi-atmkatha-marathi-nibandh/ https://dailymarathinews.com/daptarachi-atmkatha-marathi-nibandh/#respond Mon, 10 May 2021 12:20:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=2244 सदर निबंध हा दप्तराचे मनोगत किंवा मी दप्तर बोलतोय अशा आशयाने देखील विचारला जातो. शालेय मुले लहानपणापासून दप्तर वापरत असतात. त्याची संपूर्ण माहिती स्वतः दप्तराच्या ...

Read moreदप्तराची आत्मकथा मराठी निबंध – Daptarachi Atmkatha Marathi Nibandh |

The post दप्तराची आत्मकथा मराठी निबंध – Daptarachi Atmkatha Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
सदर निबंध हा दप्तराचे मनोगत किंवा मी दप्तर बोलतोय अशा आशयाने देखील विचारला जातो. शालेय मुले लहानपणापासून दप्तर वापरत असतात. त्याची संपूर्ण माहिती स्वतः दप्तराच्या शब्दांत “दप्तराची आत्मकथा” (Daptarachi Atmkatha Marathi Nibandh) या मराठी निबंधात मांडायची असते.

दप्तराची आत्मकथा मराठी निबंध – Daptarachi Atmkatha Essay In Marathi |

मी दप्तर बोलतोय.. ऐकून थोडंस नवल वाटेल पण हो, ते खरंय! माझा वापर आत्तापर्यंत जवळजवळ सर्वांनी केलेलाच आहे. जसा हवा तसा केलेला आहे. प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक शाळेत केलेला आहे. त्यामुळे माझा एवढा वापर होत असताना मला काय वाटते?, माझ्या भावना काय आहेत? हे नक्कीच मला आज सांगावेसे वाटते.

प्रत्येक मूल लहानपणी शाळेत जाताना मला परिधान करतेच. माझ्यात सर्व शालेय साहित्य, जेवणाचा डबा, आणि पाण्याची बाटली ठेवली जाते. मला अडकवण्यासाठी दोन बंध असतात. त्या बंधांनी मला बरोबर पाठीवर अडकवले जाते.

माझे शरीर आयताकृती असते. ते उभ्या किंवा आडव्या पद्धतीने तयार केले जाते. शाळेतल्या प्रत्येक इयत्तेतील मुलांना मी आकर्षक असावे असे वाटते. लहान मुलांना माझ्यावर कार्टून्स, गेम्सची चित्रे असलेली आवडतात तर मोठ्या मुलांना एखाद्या सुपरहिरोचे किंवा गाडीचे चित्र असलेले आवडते.

शाळा, ऑफिस काहीही असो, माझे अनेक फायदे आहेत. मला सहलीला किंवा प्रवासाला जाताना देखील सोबत घेतले जाते. सर्व सामान, कपडे माझ्यात ठेवली जातात. आजकाल तर सर्व लोक कामावर जाताना मला घेऊनच जातात. कारण पिशवी किंवा ऑफिस बॅगपेक्षा माझा वापर सुयोग्य ठरतो.

आधुनिक प्रकारे मला आज तयार केले जाते. वेगवेगळी डिझाईन आणि नक्षीकाम देखील माझ्यावर केले जाते. मी स्वतः वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतो. ज्याला जो रंग आणि डिझाईन आवडत असेल त्या पद्धती त तो मला विकत घेतो.

जीवनात आपल्याला ज्या गोष्टी उपयोगी पडतात त्यांच्याबद्दल आदर दाखवणे गरजेचे आहे. तसेच माझ्याबद्दल देखील आहे. काहीजण मला खूपच अनपेक्षित पद्धतीने वापरतात. मला सरळसरळ टाकून देतात. त्यांना मी एक निरुपयोगी वस्तू वाटतो.

माझा वापर नीट केला तर मी अनेक वर्ष व्यवस्थित राहू शकेन. तुमच्या उपयोगी येऊ शकेन. मला झेपेल एवढेच शालेय किंवा इतर सामान माझ्यात भरले जावे. त्यामुळे माझी चैन, बटणं आणि बंध खराब होणार नाहीत. मला काळजीने वापरले तर माझा रंग आणि नक्षीकामही उडून जाणार नाही.

मीही शेवटी मर्यादित वापराचीच वस्तू आहे. त्यामुळे जेवढा वापर होऊ शकेल तेवढा काळजीपूर्वक करा. मला हळूच कपाटात किंवा जमिनीवर ठेवा. माझ्यात जास्तीत जास्त सामान भरू नका. निरुपयोगी आणि मला ईजा होईल असे साहित्य ठेवू नका. एवढीच माझी नम्रविनंती!

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला दप्तराची आत्मकथा (Daptarachi Atmkatha Marathi Nibandh) हा मराठी निबंध आवडल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post दप्तराची आत्मकथा मराठी निबंध – Daptarachi Atmkatha Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/daptarachi-atmkatha-marathi-nibandh/feed/ 0 2244