मानवता हाच खरा धर्म - मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 18 Dec 2022 07:07:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 मानवता हाच खरा धर्म - मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 मानवता हाच खरा धर्म – मराठी निबंध | Manavta Hach Khara Dharm Nibandh https://dailymarathinews.com/humanity-hach-u200bu200bkhara-dharma-marathi-essay-manavta-hach-u200bu200bkhara-dharm-nibandh/ https://dailymarathinews.com/humanity-hach-u200bu200bkhara-dharma-marathi-essay-manavta-hach-u200bu200bkhara-dharm-nibandh/#respond Sun, 18 Dec 2022 07:04:55 +0000 https://dailymarathinews.com/?p=5217 या निबंधात मानवतेचे गुण स्पष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यांचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे.

The post मानवता हाच खरा धर्म – मराठी निबंध | Manavta Hach Khara Dharm Nibandh appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा मानवता हाच खरा धर्म आहे (Manavta Hach Khara Dharm Marathi Nibandh) या सुविचारावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात मानवतेचे गुण स्पष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यांचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे.

मानवता हाच खरा धर्म आहे – निबंध | Manavta Hach Khara Dharm Ahe Essay in Marathi |

मानव हा इतर सर्व सजीवांपेक्षा बुध्दीने विकसित झालेला प्राणी आहे. त्यामुळे स्वहित आणि सामाजिक हित या बाबी मनुष्य चांगल्या प्रकारे जाणतो. तसेच मनुष्य हा संवेदनशील व भावनाशील देखील असल्याने मनुष्याला नैतिकतावादी जीवन जगता येते.

मनुष्य हा विचारांनी आणि कर्मांनी स्वतःसाठी आणि इतरांसाठी उत्तम भविष्य निर्माण करू शकतो. म्हणजेच जीवनाचा अतिउत्तम अनुभव घेण्याची क्षमता ही मनुष्यात असल्याने इतर सजीवांपेक्षा मनुष्य हा खूप जाणीवपूर्वक जगू शकतो. म्हणजेच संवेदनशील जागरुकता हीच मानवतेला स्पष्ट करणारी असू शकते.

धर्म म्हणजे प्रकृतीचे शाश्वत नियम! त्यानुसार मानवी जीवनातील अत्युच्च संभावनेचा विचार करून मनुष्याचे जगणे जसे असू शकते त्यावरून मानवतेची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. जो व्यक्ती संवेदनशील आहे आणि जागृत आहे, तो व्यक्ती उत्तम प्रकारे मानवता दर्शवतो.

मानवी जीवनात अनेक प्रसंग घडत असतात. त्या सर्व प्रसंगांत मनुष्य हा प्रतिसाद देत असतो. प्रतिसाद दिला म्हणजेच तो व्यक्ती योग्य वागला की अयोग्य वागला याची शहानिशा होत असते. त्यावरून त्याचे कृत्य हे मानवीय होते की अमानवीय होते हे दिसून येते.

मनुष्य हा शारिरीक स्तरावर इतर प्राण्यांसारखा असल्याने अमानवीय गुण देखील त्यामध्ये समाविष्ट असतात. तशाच गुणांनी तो जगत राहिल्यास जीवनात दुःख अनुभव करतो. उदाहरणार्थ क्रोध, काम, मत्सर, लोभ यांचा जीवनात केलेला सातत्याने उपयोग हा जीवन दुःखदायी बनवत असतो.

मनुष्य हा इतरांची मदत करू शकतो. कौटुंबिक व सामाजिक स्थिरता निर्माण करू शकतो. संवेदनशील राहिल्यास मैत्री, प्रेम, करुणा अशा गुणांनी तो जीवनात विकसित देखील होऊ शकतो. त्यामुळे मानवतेच्या अपेक्षित सर्व गुणांनी वागल्यास मनुष्य जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो.

व्यक्तीचा विकास आणि आनंद या दोन बाबी मानवतेला धरून आहेत. त्यानुसारच सर्व मानवीय असणारी कृत्ये अशा व्यक्तीच्या हातून आपोआप घडत असतात. असा हा सर्व गुण संपन्न व्यक्ती सर्वांना हवाहवासा वाटतो. त्या व्यक्तीमुळे जीवनात आशा आहे असे वाटू लागते.

मनुष्य जीवनात शक्य असणाऱ्या सर्व विधायक घटनांना स्पर्श करणारी मानवता ही मनुष्याला किती आवश्यक आहे हे आपल्याला समजते. त्यामुळेच माणसाने माणसाप्रमाणे व्यवहार करून विकास साधणे व आनंद निर्माण करून घेणे हाच खरा धर्म असल्याचे स्पष्ट होत जाते.

तुम्हाला मानवता हाच खरा धर्म हा मराठी निबंध (Manavta Hach Khara Dharm Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post मानवता हाच खरा धर्म – मराठी निबंध | Manavta Hach Khara Dharm Nibandh appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/humanity-hach-u200bu200bkhara-dharma-marathi-essay-manavta-hach-u200bu200bkhara-dharm-nibandh/feed/ 0 5217