माझे कुटुंब मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 31 Jul 2020 09:19:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 माझे कुटुंब मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 माझे कुटुंब मराठी निबंध ! My Family Essay In Marathi | https://dailymarathinews.com/my-family-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/my-family-essay-in-marathi/#respond Wed, 05 Aug 2020 21:18:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=1797 स्वतःचे पालक हेच आपले कुटुंब असते. एका घरात राहणाऱ्या व्यक्ती ह्या नात्यांनी बांधलेल्या असतात. त्यामुळेच त्यांचे सहजीवन हे सुंदर बनत असते. असे प्रत्येकाचे कुटुंब प्रत्येकाला ...

Read moreमाझे कुटुंब मराठी निबंध ! My Family Essay In Marathi |

The post माझे कुटुंब मराठी निबंध ! My Family Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
स्वतःचे पालक हेच आपले कुटुंब असते. एका घरात राहणाऱ्या व्यक्ती ह्या नात्यांनी बांधलेल्या असतात. त्यामुळेच त्यांचे सहजीवन हे सुंदर बनत असते. असे प्रत्येकाचे कुटुंब प्रत्येकाला प्रिय असते. स्वतःच्या कुटुंबाबद्दल सर्व माहिती असणे तसेच राहणीमान आणि दिनचर्या या सर्वांची चर्चा माझे कुटुंब या निबंधात करायची असते.

विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेत असताना हा निबंध लिहावा लागतो. प्रत्येक कुटुंब सदस्याची वैयक्तिक माहिती आणि तो कुटुंबासाठी काय करतो याचे विश्लेषण या निबंधात करायचे असते. माझे कुटुंब निबंध ( My Family Essay In Marathi ) म्हणजे कुटुंबातील एकत्र सदस्यांची कर्तव्ये जाणवून देणारा निबंध आहे. चला तर मग जाणून घेऊ कसा लिहायचा हा निबंध !

महत्वाचे मुद्दे – Important Points :

• घर आणि कुटुंब सदस्य माहिती
• वास्तववादी दिनक्रम
• सर्वांचा कुटुंबातील सहभाग
• कुटुंबातील नैतिक मूल्ये आणि संस्कार
• खेळ, मज्जा करणे, एकत्र फिरायला जाणे अशा घटना.

खाली दिलेला निबंध हा कल्पनात्मक आहे. सर्व नावे काल्पनिक आहेत. तुम्ही त्यांचा आधार घेऊन स्वतः बद्दल माहिती लिहू शकता….

माझे कुटुंब निबंध | Majhe Kutumb Marathi Nibandh |

माझे नाव केशव अनंत पाटील आहे. मी आनंदनगर शहरात राहतो. तेथे आमचे सर्व नातेवाईक देखील राहतात. माझे कुटुंब एकत्र कुटुंब आहे आणि कुटुंबात एकूण चौदा सदस्य आहेत. माझे आजी – आजोबा, त्यांची तीन मुले, तीन सूना, त्या तीन मुलांची प्रत्येकी दोन – दोन मुले असे आमचे खूप मोठे कुटुंब आहे. आमचे घर म्हणजे एक प्रशस्त वास्तू आहे.

मला तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. मी आमच्या कुटुंबात सर्वात मोठा मुलगा आहे. माझ्यापेक्षा माझे भाऊ – बहीण लहान असल्याने मला थोडे जबाबदारीने वागावे लागते. माझे आजोबा पूर्वी गावी शेती करत असत. त्यांना शेतीची खूप आवड आहे. पूर्वी माझे वडील आणि दोन चुलते हेही गावीच राहत असत. त्यांचे शिक्षण देखील गावीच झालेले आहे.

आता पाच वर्षांपूर्वी माझे वडील आणि दोन चुलत्यांनी मिळून हे नवीन मोठे घर बांधले आणि आजी – आजोबांनाही आमच्यासोबत राहण्यासाठी घेऊन आले. माझे वडील शिक्षक आहेत आणि दोन्ही चुलते कापडाचा व्यवसाय करतात. माझे वडील आणि दोन चुलते यांचे नेहमीच एकत्र राहण्याचे स्वप्न होते. ते स्वप्न आता आम्ही सर्वजण जगत आहोत.

माझी आई घरकाम करते. तिला गायनाची आणि वाचनाची प्रचंड आवड आहे. तिची कामे दिवसभर संपत नाहीत. घरकाम झाल्यावर तिने तिचे छंद सांभाळले आहेत. माझे वडील खूप करारी स्वभावाचे आहेत. त्यांना घरात नेहमी शिस्त आवडते. वडील शिक्षक असल्याने शिक्षणाचे संस्कार माझ्यावर आणि सर्व भावंडांमध्ये रुजलेले आहेत. आम्हीही वाचन आणि अभ्यासात निपुण बनलो आहोत.

सकाळी उठल्याबरोबर प्रातःविधी उरकल्यानंतर घरी सर्वांनाच प्रार्थना म्हणावी लागते. प्रार्थना झाल्यावर आपापले जेवण, नाश्ता उरकून आपापल्या कामात सर्वजण व्यस्त होऊन जातात. आम्ही मुले शाळेत जातो. दिवसभर जे काही काम आहे ते प्रामाणिकपणे करायचं हा आणखी एक नियम आहे. आम्ही शाळेतून घरी गेल्यावर एकत्र एक तास खेळायचे आणि नंतर अभ्यासाला बसायचे असा उपक्रम असतो.

रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्व कुटुंबीय एकत्र दिवसभराच्या गप्पा मारत बसतात. आजी आम्हाला गोष्ट सांगते. गोष्ट ऐकता ऐकताच मी तर झोपूनच जातो. माझी लहान बहिण कुसुमला गोष्टी ऐकायला खूप आवडते. सकाळी उठल्यावर तीच आम्हाला राहिलेली गोष्ट सांगते. आम्हा भावंडात नेहमी भांडणे होत असतात पण भांडणानंतर आजोबा आम्हाला व्यवस्थित समजावून सांगतात. घरातील वातावरण शिस्तीचे असल्याने आम्हीच आपोआप शांत होऊन जातो.

माझ्या कुटुंबातील सदस्य नेहमी खेळीमेळीत जगत असतात. सर्वजण हास्यविनोद करण्यात पटाईत आहेत. कधीकधी सुट्टीत माझे वडील आणि आजोबा बुद्धिबळ खेळतात. मला तर काही समजत नाही पण ते तासनतास एकत्र बसलेले असतात. आम्ही सुट्टीत क्रिकेट आणि कॅरम खेळतो. आई आम्हा सर्वांना गायनही शिकवते. आठवड्यातून एकदा तरी आम्ही सर्वजण मिळून बागेत फिरायला जातो.

कुटुंबाबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास एक संस्कारक्षम असे माझे कुटुंब आहे. आजोबा आणि आजी हे दोन खंबीर स्तंभ आमच्या कुटुंबाला लाभलेले आहेत. तसेच सर्वजण शिस्तप्रिय असल्याने वादविवाद जास्त होत नाहीत. एकत्र राहताना पाळावे लागणारे सर्व नियम सगळेच पाळतात त्यामुळे हसतखेळत आम्ही जगत राहतो. आमचे भविष्य आणि जीवन घडवण्यासाठी माझे कुटुंब सदैव तत्पर असते.

तुम्हाला माझे कुटुंब मराठी निबंध ( My Family Essay In Marathi ) कसा वाटला? नक्की कमेंट करून कळवा…धन्यवाद!

The post माझे कुटुंब मराठी निबंध ! My Family Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/my-family-essay-in-marathi/feed/ 0 1797