माझा शाळेचा पहिला दिवस Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 20 May 2022 14:18:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 माझा शाळेचा पहिला दिवस Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 शाळेचा पहिला दिवस – मराठी निबंध | Shalecha Pahila Divas Nibandh Marathi | https://dailymarathinews.com/shalecha-pahila-divas-nibandh/ https://dailymarathinews.com/shalecha-pahila-divas-nibandh/#respond Fri, 20 May 2022 14:15:43 +0000 https://dailymarathinews.com/?p=3874 उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळा सुरू होत असते. तेव्हा नवीन वर्गातील पहिल्या दिवसाचे वातावरण अगदीच वेगळे भासत असते.

The post शाळेचा पहिला दिवस – मराठी निबंध | Shalecha Pahila Divas Nibandh Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा शाळेचा पहिला दिवस (Shalecha Pahila Divas Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळा सुरू होत असते. तेव्हा नवीन वर्गातील पहिल्या दिवसाचे वातावरण अगदीच वेगळे भासत असते. त्याचेच वर्णन आपल्याला या निबंधात करायचे असते.

माझा शाळेचा पहिला दिवस – मराठी निबंध | First Day in School Essay In Marathi

उन्हाळ्याची सुट्टी खूपच मजेत व्यतित केल्याने शाळा सुरू होताच मला थोडेसे अस्वस्थ वाटले होते. परंतु पुढच्या इयत्तेत म्हणजेच आता सातवीत गेल्याने मला थोडासा हुरूप आला होता. आमची शाळा सातवीपर्यंत असल्याने आमचे शाळेतील हे शेवटचे वर्ष होते. त्यामुळे या वर्षातील पहिला दिवस हा अत्यंत मजेशीर जावा असे मला मनोमन वाटत होते.

आमच्या शाळेची वेळ ही सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत असते. सकाळी लवकर उठून मी शाळेसाठी तयार झालो. शाळेत पोहचल्याबरोबर सर्व वर्गमित्र एकत्र जमा झाले आणि आम्ही सुट्टीतील घडलेले प्रसंग एकमेकांना सांगू लागलो. थोड्या वेळातच प्रार्थनेसाठी सर्वांना मैदानात बोलावले गेले.

प्रार्थना संपल्यावर आम्ही नवीन वर्गात बसलो. आमचे नवीन वर्गशिक्षक बी. एस. पाटील यांनी आम्हाला नवीन हजेरी क्रमांक दिला आणि सर्व विद्यार्थ्यांची वैयक्तिक ओळख करून घेतली. त्यानंतर नवीन इयत्तेतील सर्व पुस्तके आम्हाला देण्यात आली. पाटील सर आम्हाला यावर्षी विज्ञान विषय शिकवणार होते.

विज्ञानाचा तास संपल्यावर आमचा मराठी व इतिहास या विषयांचा तास झाला. आता आमची जेवणाची सुट्टी झाली होती. जेवणाच्या सुट्टीत आम्ही सर्व वर्गमित्र आमच्या नवीन वर्गाबद्दल गप्पा मारत होतो. जेवणानंतर काही वेळातच आम्ही पुन्हा एकदा आपापल्या बेंचवर जाऊन बसलो.

सुट्टीनंतर गणित व इंग्रजी हे विषय शिकवण्यात आले. विषयांची ओळख करून घेताना आम्हाला थोडा जास्तच अभ्यासक्रम असल्याचे जाणवत होते. अशावेळी उपक्रम व प्रकल्प पूर्ण करायचे असल्याने तर अजूनच तणाव वाटू लागला. आता ठीक दुपारी अडीच वाजता खेळाची सुट्टी झाली.

शाळेच्या पहिल्याच दिवशी खेळायला मिळाल्याने आम्ही तासातील सर्व ताणतणाव विसरून गेलो. मनसोक्त खो – खो खेळल्यानंतर शेवटी एका तासात हिंदी व परिसर अभ्यास या विषयांचे तास झाले. शेवटच्या एका तासात आम्ही खूप एकाग्र व प्रसन्न मनाने दोन्ही विषय शिकलो.

आमच्या वर्गात यावर्षी नवीन पाच विद्यार्थी आले होते. त्यांच्याशी मी ओळख करून घेतली. आम्हाला नवीन वर्गाचे ओळखपत्र देण्यात आले. शाळेतील पहिला दिवस हा काही विषयांच्या तासांत मला भीतीदायक वाटला तर काही तासांत मला अत्यंत प्रसन्न असा अनुभव आला.

शाळेचा पहिला दिवस हा आठवणीत राहणारा होता. नवीन दप्तर, नवीन वह्या – पुस्तके, नवीन वर्ग, नवीन शिक्षक यांमुळे शिक्षण पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन माघारी आल्याचे जाणवत होते. जुने – नवीन मित्र भेटल्याने तर अत्यंत आनंद झाला. पहिला दिवस छान व्यतित झाल्याने पूर्ण वर्ष आता चांगले जाणार अशी समजूत माझी मीच काढली.

तुम्हाला शाळेचा पहिला दिवस हा मराठी निबंध (Shalecha Pahila Divas Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post शाळेचा पहिला दिवस – मराठी निबंध | Shalecha Pahila Divas Nibandh Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/shalecha-pahila-divas-nibandh/feed/ 0 3874