मांजर Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 03 Jun 2020 05:31:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 मांजर Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Cat Essay in Marathi | माझा आवडता प्राणी – मांजर | Marathi Nibandh ! https://dailymarathinews.com/cat-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/cat-essay-in-marathi/#respond Thu, 26 Mar 2020 00:53:22 +0000 https://dailymarathinews.com/?p=1579 मांजर पाळणे हा खूप जणांचा छंद असतो. मांजर घरी असले की त्याचा खूप लाड येतो. मांजर हे घरातील प्रत्येकाचे आवडते असते. अशा मांजरावर निबंध लिहणे ...

Read moreCat Essay in Marathi | माझा आवडता प्राणी – मांजर | Marathi Nibandh !

The post Cat Essay in Marathi | माझा आवडता प्राणी – मांजर | Marathi Nibandh ! appeared first on Daily Marathi News.

]]>
मांजर पाळणे हा खूप जणांचा छंद असतो. मांजर घरी असले की त्याचा खूप लाड येतो. मांजर हे घरातील प्रत्येकाचे आवडते असते. अशा मांजरावर निबंध लिहणे हे कोणाला नाही आवडणार? शाळेत असताना प्राथमिक कक्षेत हा निबंध लिहावा लागतो. चला तर मग पाहूया कसा लिहायचा हा निबंध!

Essay on Cat in Marathi | Marathi Nibandh | My favourite animal – Cat |

आमच्या घरी मांजर आणण्याअगोदर घरात काही उंदरे बाहेरून यायची. उंदीर मारण्याचे औषध आणले तरी काही फायदा होत नव्हता. शेवटी त्या उंदरांसाठी उपाय म्हणून आम्ही घरी मांजर आणले. त्याचे नाव ‘ चिकू ‘ ठेवले. काही दिवसानंतर काय आश्चर्य! सर्व उंदरे गायब! 

मांजर घरी असणे हे किती आनंददायक असते याचा प्रत्यय ज्यांच्या घरी मांजर आहे त्यांना आलेलाच असतो. मांजर अंगावर घेणे आणि त्याला कुरवाळणे हे माझे नित्यनियमाचे काम झाले आहे. आमच्या घरी पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे मांजर आहे. 

मांजर हे आकाराने छोटे असते. त्याच्या अंगावर केस असतात त्यामुळे त्याचे शरीर आपल्याला मऊ लागते. त्याला चार पाय आणि एक शेपटी असते. मांजर ती शेपटी कशीही हलवू शकते. मांजराला दोन सुंदर डोळे असतात. त्या डोळ्यांनी मांजर रात्रीदेखील पाहू शकते. 

मांजराचे कान आणि डोळे खूपच तीक्ष्ण असतात. मांजराचे कान कुठलीही हालचाल सहज ओळखतात. मांजराचे नाक खूप छोटे असते. कानाप्रमाणे मांजराचे नाकही संवेदनशील असते. किटक, उंदीर, मांस आणि मच्छी जर कुठे असेल तर मांजर ते लगेच शोधून काढते. 

मांजराला अंघोळ घालण्यात मला विशेष आनंद वाटतो. परंतु मांजराला अंघोळ आवडत नसावी. मी कधीच त्याला पाण्यात जाताना बघितले नाही. ते स्वतःचे शरीर जिभेने आणि तोंडाने साफ करत असते. मांजराला स्वच्छता खूप आवडते. 

मांजराला पंजे असतात ज्याद्वारे ते शिकार घट्ट पकडून ठेवते. पंजाला तीक्ष्ण नखे असतात. झाडावर, भिंतीवर, घरावर कुठलेही मांजर सहज चढू शकते. त्याचा तळपाय मऊ गादीसारखा असतो ज्यामुळे त्याला कितीही उंचीवरून फेकले तरी इजा होत नाही. मांजराचे शरीर नैसर्गिकरित्या गुरुगुर करीत असते.

 मांजराचे दात टोकदार असतात. कुठलाही पदार्थ अत्यंत सावधपणे खाणे हे मांजराचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मांजर खूप आवडीने मांसाहारी पदार्थ खाते. तसेच ते सतत दूध पित राहते, कधीतरी पाणी पिते. मांजर अन्न खाऊन झाल्यावर जिभळ्या चाटत राहते. भूक लागली किंवा कुठले संकट समोर आल्यास मांजर फक्त म्याऊँ.. म्याऊ.. असेच ओरडते. 

मांजराच्या विविध प्रजाती विविध देशांत आढळतात. मांजर वाघ, चित्ता, बिबट्या या प्राण्यांच्या मूळ कुळातील पाळीव प्राणी आहे. परंतु बहुतांश गुण आणि शरीर वाघासारखे  असल्याने तिला “वाघाची मावशी” असे म्हणतात. तसेच नर मांजराला बोका असे म्हणतात. महाराष्ट्रात सर्वत्र मांजराला मनी , माऊ, मनीम्याऊ असे लाडाने संबोधतात.

मांजराचे चालणे आणि बसणे खूपच ऐटीत असते. मांजराची झोप पूर्ण झाल्यानंतर एका विशिष्ट पद्धतीने ते आळस देते. तो आळस पाहण्यासारखा असतो. मांजर घरात नसेल तर मला काहीतरी चुकल्यागत वाटत राहते. असे हे काहीही न करणारे प्रेमळ, सोज्वळ मांजर मला खूप आवडते.  

The post Cat Essay in Marathi | माझा आवडता प्राणी – मांजर | Marathi Nibandh ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/cat-essay-in-marathi/feed/ 0 1579