महाशिवरात्री Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 19 Feb 2020 10:28:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 महाशिवरात्री Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Mahashivratri Information In Marathi | महाशिवरात्री – एक अद्भुत रात्र ! https://dailymarathinews.com/mahashivratri-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/mahashivratri-information-in-marathi/#respond Wed, 19 Feb 2020 10:28:40 +0000 https://dailymarathinews.com/?p=1417 महाशिवरात्री कित्येक वर्षांपासून साजरी करण्यात येत आहे, त्याची नोंद असणे अशक्य आहे. भारतात आणि आणि प्रामुख्याने हिंदू धर्मात भगवान शंकराचे महत्त्व अपार आहे. भारतीय कालगणनेनुसार ...

Read moreMahashivratri Information In Marathi | महाशिवरात्री – एक अद्भुत रात्र !

The post Mahashivratri Information In Marathi | महाशिवरात्री – एक अद्भुत रात्र ! appeared first on Daily Marathi News.

]]>
महाशिवरात्री कित्येक वर्षांपासून साजरी करण्यात येत आहे, त्याची नोंद असणे अशक्य आहे. भारतात आणि आणि प्रामुख्याने हिंदू धर्मात भगवान शंकराचे महत्त्व अपार आहे. भारतीय कालगणनेनुसार आणि भौगोलिक रचनेनुसार असणारी ही रात्र अध्यात्मिक महत्त्व ठेवून आहे. या दिवशी वरवरचे कर्मकांड करून दिखावा करण्यापेक्षा त्यामागची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

भारतात जे जे सण साजरे केले जातात त्यामागे एक नैसर्गिक, अध्यात्मिक, आणि भौगोलिकदृष्ट्या हेतू असतो त्यामुळे पृथ्वीवर एकच भूभाग असा आहे ज्यावर कित्येक वर्ष एकाच प्रकारची जीवनपद्धती अवलंबली गेली आहे. देवपूजा आणि भक्ती ही हिंदू संस्कृतीत महत्वाची मानली गेली आहे.

एकूण वर्षात बारा शिवरात्री येतात. त्यामध्ये फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये येणाऱ्या शिवरात्रीला खूप महत्त्व आहे. या रात्रीचा भौगोलिक आणि अध्यात्मिक संबंध आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची जी स्थिती असते त्यामुळे या रात्री मनुष्यात ऊर्जेचा संचार होऊ शकतो. अध्यात्मिक उन्नती या रात्री होऊ शकते. त्यामुळे अनेक योगी, ऋषी हे तत्व जाणून आहेत. या रात्री प्राचीन काळापासून विविध अध्यात्मिक प्रयोग केले जातात. रात्रभर जागे राहावे लागते. आपल्यातील सकारात्मक ऊर्जा पूर्ण अस्तित्वात जागृत करून उत्सव साजरा करणे हे या रात्रीचे प्रतीक आहे.

सर्व प्रकारच्या व्यक्तींसाठी हि रात्र फलदायी ठरत असते. अध्यात्मिक मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी अध्यात्मिक उत्तेजना आणि प्रगती साधण्याची ही रात्र असते. महत्वकांक्षी तसेच संसारी व्यक्तींसाठी ही रात्र त्यांच्या उन्नतीसाठी सहाय्य करते. आहे त्यापेक्षा उदात्त आयुष्याचा अनुभव या रात्री होत असतो. ही रात्र लोक भगवान शंकराच्या लग्नाचा वाढदिवस तर काही लोक शंकराने त्यांच्या शत्रूंवर मात केली म्हणून साजरी करतात. योगी आणि ऋषी ही रात्र भगवान शंकर कैलास पर्वताशी एकरूप झाले म्हणजे स्थिर झाले अशा मान्यतेने साजरी करतात.

कित्येक वर्ष ध्यान केल्यानंतर या रात्री भगवान शंकर अत्यंत स्थिर झाले. अशा स्थिर स्थितीचा अनुभव या रात्री योगी लोकांना होतच असो अशी समजूत आहे. या रात्रीला स्थैर्याची रात्र म्हणून देखील ओळखले जाते. कित्येक समजुती काळानुसार बदलत जातील परंतु जे वैश्विक सत्य आहे ते कधी बदलणार नाही. आज आपल्या संस्कृतीत वैज्ञानिक दृष्टिकोन देखील विकसित झाल्याने या गोष्टी आपण मान्य करू शकतो की आकाशगंगा, विविध बल, आणि ऊर्जा जे पृथ्वीला सांभाळून आहेत त्या ऊर्जा मानवी ऊर्जेला गतिमान करण्यासाठी सहाय्य करत असतात. त्यामुळे असे काही दिवस आणि सण आपल्या संस्कृतीत साजरे केले जातात, त्यांचे अध्यात्मिक महत्त्व आणि स्थान वेगळेच आहे.

भगवान शंकराला आवडणाऱ्या वस्तू, आणि त्यांचे शारीरिक अस्तित्व समजून घेऊन त्यांची मनोभावे पूजा या पूर्ण दिवसभर आणि रात्री करत असतो. कोणतीही पदार्थवाचक ऊर्जा आपल्या शरीरात अतिरिक्त ऊर्जा निर्माण करत असते परंतु या दिवशी उपवास करावा आणि उपजत ज्या सकारात्मक ऊर्जा शरीरात वास करत असतात त्यांना जागृत करावे. उत्सव साजरा करून अस्तित्वात हर्षोल्लास जागा करावा.

The post Mahashivratri Information In Marathi | महाशिवरात्री – एक अद्भुत रात्र ! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/mahashivratri-information-in-marathi/feed/ 0 1417