मराठी बोधकथा Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 27 Oct 2021 02:11:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 मराठी बोधकथा Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 व्यायामाचे महत्त्व – मराठी बोधकथा | Marathi Bodhkatha | https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-2/ https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-2/#respond Wed, 27 Oct 2021 02:04:01 +0000 https://dailymarathinews.com/?p=2777 व्यायाम केल्याने आपल्या जीवनात कसे बदल घडून येऊ शकतात अशा आशयाची व्यायामाचे महत्त्व ही मराठी बोधकथा आहे.

The post व्यायामाचे महत्त्व – मराठी बोधकथा | Marathi Bodhkatha | appeared first on Daily Marathi News.

]]>
बोधकथा ऐकणे अथवा सांगणे सर्वांनाच आवडते. त्यातून होणारा बोध हा आपल्या जीवनातील सुद्धा अनुभव असू शकतो.

व्यायाम केल्याने आपल्या जीवनात कसे बदल घडून येऊ शकतात अशा आशयाची व्यायामाचे महत्त्व ही मराठी बोधकथा (Marathi Bodhkatha) आहे.

व्यायामाचे महत्त्व | Marathi Bodhkatha | Marathi Moral Story |

कुणाल इयत्ता बारावीत शिकणारा मुलगा पण शरीराने खूपच रुष्ट आणि बारीक दिसायचा. तो अभ्यासात मात्र हुशार होता. त्याचे वर्गमित्र आणि घरचे नेहमीच त्याला ‘सुका बोंबील’ म्हणून चिडवायचे. अभ्यासात हुशार असणारा कुणाल असे टोमणे ऐकून पुरता कंटाळला होता.

कुणाल कोणताच मैदानी खेळ खेळत नसे अथवा त्याला शारिरीक कष्टाची देखील आवड नव्हती. व्यायाम करण्याची सुप्त इच्छा त्याला असायची पण लहानपणापासून तशी सवय नसल्याने कशी काय सुरुवात केली पाहिजे हे त्याला समजत नव्हते.

बारावीची परीक्षा झाल्यावर त्याने प्रणच घेतला. अत्यंत हळुवार पद्धतीने व्यायाम सुरू केला. पहाटे उठून पळायला जाऊ लागला. सुरुवातीला पायाला गोळे आले होते परंतु त्याने हार मानली नाही. सातत्याने 1 महिना धावल्यानंतर त्याने आहारात मोठा बदल केला. पूर्ण पोषण आहार घेण्यास सुरुवात केली. दोन मोकळ्या रंगांच्या डब्यात सिमेंट भरून वजन तयार केले. ते वजन तो रोज उचलू लागला.

लगबग 3 महिन्यानंतर कुणाल आता धष्टपुष्ट दिसू लागला होता. त्याचा दिवसभराचा दिनक्रम असा असायचा की त्यामध्ये 1 तास व्यायाम आणि 2 km धावणे हे असायचेच. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी त्याने मला सांगितली, तो म्हणायचा, “शारिरीक बदल महत्त्वाचे आहेतच, ते केल्यानेच माझ्या attitude मध्ये आणि माझ्या स्वभावात फरक पडलेला आहे.”

बोध / तात्पर्य –

कुणालला आलेला अनुभव हा कित्येक लोकांचा अनुभव असू शकतो. व्यायाम सुरू केल्यावर अगदी नको नको होत असते. सर्व अंग भरून येते. व्यायाम करताना अत्यंत वेदना जाणवतात. मनाला वेदनेची सवय नसल्याने मन नको म्हणत असते. पण सुरुवातीच्या कष्टातून तुम्ही पार झालात की त्यानंतर एक अत्यंत सुखदायी अनुभव आपले शरीर अनुभव करत असते.

एका स्वस्थ शरीरात एक स्वस्थ मन वास करत असते असे म्हणतात, ते खरेच आहे. कुणालला जाणवलेला स्वभावातील बदल हा स्वस्थ मनाचेच लक्षण आहे. खूप जण फक्त विचार करत राहतात की व्यायाम करायचा आहे पण सुरुवात करत नाहीत. काहीजण सुरुवात करतात आणि लगेच बंद करतात.

व्यायामात सर्वात जास्त कोणती गोष्ट महत्त्वाची असेल तर ती म्हणजे “सातत्य”! रोज ठरवलेला व्यायाम करणे हे मनाला पटत नाही. मन सवयींचे गुलाम असते. लहानपणापासून लागलेल्या सवयी आपल्याला नवीन काही बदल करून देत नाहीत. इथेच आपल्या इच्छाशक्तीचा वापर करणे गरजेचे आहे.

समजा, कोणी लहान असल्यापासून व्यायाम करत असेल त्याच्यासाठी व्यायाम करणे ही अत्यंत सहज गोष्ट आहे, कारण त्याची ती सवय बनलेली आहे. जे लोक व्यायाम करत नाहीत त्यांनी फक्त एवढेच समजले पाहिजे की त्यांना व्यायामाची सवय नाहीये. सुरुवातीला एक आठवडा, त्यानंतर एक महिना, सहा महिने असे सातत्याने काहीतरी नियोजन करून सुरुवात करणे गरजेचे आहे.

व्यायामानंतर जे बदल जाणवतात ते शब्दात व्यक्त करता येत नाही. असे म्हणू शकतो की जेवढा व्यायाम किंवा शारिरीक कष्ट जास्त तेवढाच आरोग्यदायी अनुभव जास्त! व्यायाम करणाऱ्या व्यक्ती तुम्हाला कधीच आजारी किंवा रोगट दिसणार नाहीत, हे वास्तव आहे. स्वतःच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे कधीही हितावह असते.

व्यायाम या विषयावर जेवढे बोलू तेवढे कमीच होईल; काही गोष्टी अशा असतात, ज्या करण्यात धन्यता मानावी. व्यायामसुद्धा त्यापैकीच एक आहे.

तुम्हाला व्यायामाचे महत्त्व ही मराठी बोधकथा (Marathi Bodhkatha) आवडली असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post व्यायामाचे महत्त्व – मराठी बोधकथा | Marathi Bodhkatha | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-2/feed/ 0 2777
आळशी कबुतर – मराठी बोधकथा | Marathi Moral Stories |Marathi Bodhkatha | https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be/ https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be/#respond Wed, 20 Oct 2021 08:32:30 +0000 https://dailymarathinews.com/?p=2713 प्रस्तुत मराठी बोधकथा ही एका आळशी कबुतराची कथा आहे. त्याच्या आळशी स्वभावामुळे त्याला जीवनात संकटांना कसे सामोरे जावे लागते याचे

The post आळशी कबुतर – मराठी बोधकथा | Marathi Moral Stories |Marathi Bodhkatha | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत मराठी बोधकथा (Marathi Bodhkatha) ही एका आळशी कबुतराची कथा आहे. त्याच्या आळशी स्वभावामुळे त्याला जीवनात संकटांना कसे सामोरे जावे लागते याचे सुंदर वर्णन या कथेत आहे.

मराठी बोधकथा – आळशी कबुतर | Marathi Bodhkatha |

कोरबा जंगलात पिका नामक एक कबुतर राहत असे. त्याला एकच जवळचा कबुतर मित्र होता, त्याचे नाव चिका होते. चिका हा प्रामाणिक आणि कष्टाळू होता तर पिका मात्र अति कामचुकार आणि आळशी होता.

दोघेही दिवसभर अन्न गोळा करत असत त्यामध्ये चिकाचा वाटाच जास्त असे. पिका हा चिकासोबत नुसती हजेरी लावत असे. कधीतरी अन्न गोळा केले तर केले, अशी त्याची धारणा असायची.

पिका हा आळशी आणि कामचुकार असल्याने त्याचे जास्त मित्र नव्हते. ऐटीत आणि थाटात जीवन जगण्याची नुसती कल्पना करण्याची त्याला सवयच जडली होती. वास्तवात मात्र तो कधीही अडचणीत सापडू शकत होता.

त्याचे कुटुंबीय आणि सर्व जंगलातील वयोवृद्ध पक्षी त्याला समजावून थकले होते मात्र पिका हा काही ऐकणाऱ्यातील नव्हताच मुळी! सकाळी खूप उशिरा उठणे, अरेरावी करून अन्न मिळवणे, चिका व अन्य मित्रांसोबत निरर्थक वेळ घालवणे आणि जंगलात भटकत राहणे असा त्याचा दिनक्रम ठरलेला असायचा.

असा हा पिका कबुतर होता. त्याच्या आळशी स्वभावामुळे त्यासोबत भविष्यात काहीतरी अघटीत घडणार हे सर्वजण जाणून होते, मात्र पिकाला हे समजत नव्हते.

एक दिवस घडले देखील तसेच! उन्हाळ्याचे दिवस होते. पावसाळ्यातील अन्नाची सोय म्हणून पिकाचे कुटुंबीय अन्न गोळा करण्यासाठी दूरदेशी निघून गेले होते. दोन महिने तरी त्यांचे माघारी येणे शक्य नव्हते.

पिकावर स्वतःच्याच अन्न पाण्याची जबाबदारी पडली होती. तरीही तो संपूर्णतः चिकावर अवलंबून होता. अन्न नाहीतर नाही, काहीवेळा तो उपाशी देखील झोपायचा, पण अन्न मिळवण्याचे कष्ट त्याला नको होते.

त्यावर्षी निसर्गाची अवकृपा म्हणून की काय, पाऊस खूप लवकर सुरू झाला. जंगलातील सर्व प्राणी आणि पक्ष्यांची निवारा शोधण्यासाठी लगबग सुरू झाली. काहीजण असलेला निवारा वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागले. सर्व जंगलात एकच धांदल उडाली होती.

अशा संकटसमयी आपल्याला निवारा आहे म्हणून पिका निवांत होता. परंतु त्याचा निवारा हा काही सुरक्षित नव्हता. दुसरा निवारा तयार करण्यासाठी त्याने काहीही प्रयत्न केले नाहीत. त्याचा मित्र चिकाने मात्र दुसरा निवारा शोधून ठेवला होता.

सुरुवातीच्या काही दिवसांत पाऊस एकदम कमी प्रमाणात होता. एक आठवड्यानंतर पावसाची चांगलीच बारी सुरू झाली. एके दिवशी अचानक रात्री पाऊसाने हजेरी लावली. सर्व प्राणी पक्षी गाढ झोपी गेले होते.

अचानक मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, सुसाट वारा, झाडांचे उन्ममळून खाली कोसळणे, सर्वत्र पाणीच पाणी, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. सर्व प्राणी पक्षी आपापल्या परीने पाऊसाचा सामना करण्यास तयारीस लागले होते.

पिका मात्र आता पुरता घाबरला होता. त्याचे मोठे घरटे मोडकळीस आले. त्याचे सर्व छप्परच उडून गेले. पिका त्या रात्री घरट्याला वाचवू शकला नाही. त्याला अशा संकटसमयी काय करावे, हेच कळेनासे झाले. तो ढसाढसा रडू लागला.

त्याच्या मदतीला कोणीही येणे शक्य नव्हते कारण सर्व जण स्वतःचा जीव आणि घर वाचवण्यात व्यस्त होते. रात्रभर पाऊस सुरू होता. पाऊसाने कोरबा जंगलात हाहाकार माजवला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस ओसरला. सर्व प्राणी पक्षी आपापल्या घरातून बाहेर येऊ लागले. पिका खूप नाराज दिसत होता. झाडाच्या फांदीवर बसून तो सर्वांना पाहत होता. त्याला कळून चुकले होते की संकटसमयी आपल्याला तयार राहायला हवे होते.

घरटे नष्ट झाल्याने त्याला राहण्यासाठी जागा नव्हती. चिकाने त्याच्या जुन्या घरट्यात जागा करून दिली, यावेळी मात्र पिका हा चिकाला मदत करत होता. चिकाचे जुने घरटे संपूर्णतः राहण्यायोग्य बनवले गेले. पिकाची राहण्याची पुरती सोय झालेली होती.

त्या रात्रीच्या भयानक अनुभवाने पिकाला चांगलाच धडा शिकवला होता. स्वतःच्या आळशी आणि कामचुकार स्वभावाची त्याला लाज वाटू लागली होती.

पिकाचे कुटुंबीय जे काही दिवसानंतर माघारी येणार होते त्यांच्यासाठी निवाऱ्याची सोय करायची होती. स्वतःच्या अन्नाची सोय करायची होती. पिका आता सुधारला होता. त्याने कष्ट करायला सुरुवात केली. त्याचा मित्र चिकाने देखील त्याला खूप मदत केली.

जंगलातील सर्व प्राणी पक्षी पिकासाठी खूष होते. पिकाचे कुटुंबीय देखील माघारी परतले होते. त्यांना पिकाचा स्वभाव पाहून विश्र्वासच बसला नाही. सर्व शेजारी प्राणी व पक्षांनी घडलेली घटना सांगितल्यावर कुटुंबीय पुरते सुखावले.

पिकाचे कुटुंबीय घरटे मोडले म्हणून दुःख व्यक्त करत बसले नाहीत तर पिकामध्ये जो अमुलाग्र बदल घडून आला त्याबद्दल सर्वजण आनंदात होते.

तात्पर्य – आळशी व्यक्ती कामचुकार असल्याने संकटांचा सामना करण्यास तो सक्षम नसतो.

तुम्हाला वरील मराठी बोधकथा (Marathi Bodhkatha) आवडल्यास तुमचे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला अशाच आणखी कथा माहीत असल्यास नक्की आम्हाला खालील पत्त्यावर संपर्क साधू शकता… तुमच्या नावासहीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

निरंजन पवार – niranjn1002@gmail.com

The post आळशी कबुतर – मराठी बोधकथा | Marathi Moral Stories |Marathi Bodhkatha | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be/feed/ 0 2713