भारताची राज्यघटना निबंध मराठी Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 17 Apr 2022 07:57:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 भारताची राज्यघटना निबंध मराठी Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 भारतीय संविधान – मराठी निबंध | Bharatiy Sanvidhan Nibandh Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7-%e0%a4%ae%e0%a4%b0/ https://dailymarathinews.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7-%e0%a4%ae%e0%a4%b0/#respond Sun, 17 Apr 2022 07:55:37 +0000 https://dailymarathinews.com/?p=3347 या निबंधात संविधान म्हणजे काय, त्याची स्थापना आणि त्याचे महत्त्व अशा विविध बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

The post भारतीय संविधान – मराठी निबंध | Bharatiy Sanvidhan Nibandh Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा भारतीय संविधान (Bharatiy Sanvidhan Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात संविधान म्हणजे काय, त्याची स्थापना आणि त्याचे महत्त्व अशा विविध बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

भारताचे संविधान निबंध | Indian Constitution Essay In Marathi |

भारतीय संविधान हे भारत देशाच्या न्याय क्षेत्रातील सामाजिक नियम व अटी आहेत. भारतीय संविधानाचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ केला गेला आणि २६ जानेवारी १९५० पासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. भारतीय संविधानालाच भारताची राज्यघटना असे देखील संबोधतात.

इ. स. १९४७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. संविधान निर्मिती करणे हे मसुदा समितीचे काम होते. अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेल्याने भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काही काळात भारतीय नागरिकत्व व निवडणुका संबंधी काही बाबी तात्पुरत्या लागू करण्यात आल्या. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान हे संपूर्णतः लागू केल्यामुळे २६ जानेवारी हा दिवस “भारतीय प्रजासत्ताक दिन” म्हणून साजरा केला जातो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी घटनेची प्रत संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सूपूर्द केली होती. भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च व पायाभूत कायदा असून तो मूलतः इंग्रजी भाषेत आहे आणि त्याची हिंदी भाषेतील प्रत हीसुद्धा कायदेशीरदृष्ट्या गृहीत धरली जाते.

राज्यघटनेत संघीय, संसदीय आणि घटनात्मक अशा तीन प्रकारच्या शासनप्रणाली आहेत. तसेच राज्य घटनेच्या कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका अशा तीन शाखा आहेत. राज्यसभा व लोकसभा या दोन वैधानिक संस्था संविधानात मान्यताप्राप्त आहेत.

भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालये अशा न्यायपालिका आहेत. संविधानाचे दस्तऐवज जतन ठिकाण संसद भवन, नवी दिल्ली येथे आहे. सामाजिक न्याय व लोकहित दृष्टीस ठेवून संविधानात दुरुस्ती शक्य होऊ शकते.

भारतीय संविधानात संपूर्ण देशाचा कारभार एकत्रितपणे चालवण्यासंबंधी सूचना व कायदे आहेत. भारतात लोकशाही कारभार असल्याने जनतेतून निवडून आलेले प्रतिनिधी मिळून सरकार स्थापन करू शकतात. संविधानात नमूद केलेल्या कायदेप्रणालीनुसार सरकारला राज्यकारभार करणे बंधनकारक आहे. 

संविधानाचा भंग होईल असे कोणतेही कायदे शासन निर्मित करू शकत नाही. नवीन कायदे निर्मिती, जुने कायदे दुरुस्ती किंवा रद्द करण्याबाबत न्यायमंडळ निर्णय घेत असते. भारतीय संविधान हे भारतासारख्या सर्वधर्मीय अशा भव्य राष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बाब आहे. संविधानामुळे भारतात सामाजिकदृष्ट्या स्थैर्य टिकून आहे.

तुम्हाला भारतीय संविधान हा मराठी निबंध (Bharatiy Sanvidhan Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post भारतीय संविधान – मराठी निबंध | Bharatiy Sanvidhan Nibandh Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7-%e0%a4%ae%e0%a4%b0/feed/ 0 3347