फायनान्स म्हणजे काय Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 15 Apr 2022 04:28:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 फायनान्स म्हणजे काय Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 फायनान्स – मराठी माहिती | Finance Marathi Mahiti | https://dailymarathinews.com/%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/ https://dailymarathinews.com/%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/#respond Mon, 11 Apr 2022 07:59:31 +0000 https://dailymarathinews.com/?p=3340 फायनान्स म्हणजे काय, फायनान्सचे प्रकार आणि फायनान्सचे महत्त्व अशा विविध बाबी या लेखात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

The post फायनान्स – मराठी माहिती | Finance Marathi Mahiti | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा फायनान्स (वित्त) या विषयावर आधारित मराठी माहिती आहे. फायनान्स म्हणजे काय, फायनान्सचे प्रकार आणि फायनान्सचे महत्त्व अशा विविध बाबी या लेखात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

फायनान्स म्हणजे काय? | Finance Information In Marathi |

• एखाद्या हेतू किंवा कारणासाठी आर्थिक व्यवस्थापन केले जाते म्हणजेच पैशांची व्यवस्था केली जाते त्याला फायनान्स (वित्त) म्हटले जाते. अशा व्यवस्था केलेल्या पैशासाठी आपल्याला व्याज द्यावे लागते.

• आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी जास्त पैशांची गरज असते. अशावेळी वित्त कामी येते. आपल्याला व्याजरुपी जास्त किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु हा व्यवहार कधीच नुकसानकारक ठरत नाही आणि आपला उद्योगही वेळेवर सुरू होत असतो.

• व्यक्ती, संस्था अथवा सरकार या तिन्ही स्तरांवर आर्थिक व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी भविष्यात होणारे फेरबदल तसेच निर्माण होणाऱ्या गरजा आणि समस्या पाहून पैशांची गुंतवणूक आणि व्यवस्था केली जाते.

फायनान्सचे प्रकार – Types of Finance in Marathi

वित्त पुरवठा हा सार्वजनिक, वैयक्तिक आणि समूह (निगम) या प्रकारांत केला जाऊ शकतो. तिन्ही प्रकारच्या वित्तीय क्षेत्रांत आर्थिक व्यवस्थापन वेगवेगळ्या प्रकारे केले जाते.

१. वैयक्तिक वित्त (पर्सनल फायनान्स)
२. निगम वित्त (कॉर्पोरेट फायनान्स)
३. सार्वजनिक/लोक वित्त (पब्लिक फायनान्स)

१) वैयक्तिक वित्त – (Personal Finance)

वैयक्तिक वित्त म्हणजे सोप्या भाषेत आपण त्याला पर्सनल फायनान्स म्हणतो. वैयक्तिक फायनान्स मध्ये वैयक्तिक स्तरावर केले जाणारे पैशांचे व्यवस्थापन व नियंत्रण असते.

२) निगम वित्त – (Corporate Finance)

निगम वित्त या प्रकारात एखादी संस्था अथवा उद्योग समूहाचे आर्थिक व्यवस्थापन असते. त्यामध्ये उत्पन्न, खर्च, गुंतवणूक अशा बाबींचे नियोजन कॉर्पोरेट पातळीवर केले जाते.

३) सार्वजनिक (लोक) वित्त – (Public Finance)

सार्वजनिक वित्त हे सरकार सांभाळत असते. असे वित्त व्यवस्थापन हे सामाजिक क्षेत्रातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित असते. सामाजिक मालमत्ता अथवा व्यवहार हा कोणा एकाची मक्तेदारी नसल्याने त्याची जबाबदारी सरकार घेत असते.

मायक्रोफायनान्स म्हणजे काय? Micro Finance Information In Marathi

• मायक्रोफायनान्स ही एक आर्थिक सेवांची श्रेणी आहे. या श्रेणीत बँकिंग व त्यासंबंधी सेवांमध्ये प्रवेश नसलेल्या व्यक्तींना व छोट्या व्यवसायांना लाभ दिला जातो.

• मायक्रोफायनान्समध्ये मायक्रोक्रेडिट म्हणजेच गरीब ग्राहकांना देखील कर्जाची तरतूद केली जाते. ही सेवा सामान्यतः जे लोक सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या अपेक्षित असतील त्यांना सक्षम बनवण्यासाठी निर्माण झालेली आहे.

• गरीब उद्योजकांना आणि लहान व्यवसायांना सूक्ष्म कर्जाची तरतूद करणे हे उद्दिष्ट मायक्रोफायनान्समध्ये पूर्वी साध्य केले जात होते. परंतु सध्या बचत, विमा, पेमेंट सेवा आणि निधी हस्तांतरण अशा विविध प्रकारच्या सेवा देखील मायक्रोफायनान्समध्ये पुरवल्या जातात.

• मायक्रोफायनान्स संस्थांनी शाश्वत धोरणे तयार करणे गरजेचे आहे ज्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या जनतेला उत्तम सेवा वितरणाद्वारे विविध सामाजिक लाभ घेता येतील.

• मायक्रोफायनान्स हा सूक्ष्म-उद्योजकांना आर्थिक विकास आणि रोजगार वाढीस चालना देण्याचा एक मार्ग आहे. त्यांच्यासाठी पैसा आणि जोखीम व्यवस्थापन करून त्यांना योग्य ती संधी उपलब्ध करून दिली जाईल.

निष्कर्ष –

आर्थिक व्यवस्थापनाचे ज्ञान असल्याने आपल्याला आयुष्यात आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला सुविधांचा लाभ घेण्यासाठी आणि आरामदायक जीवन जगण्यासाठी पैशांची गरज भासत असते.

पैशांची गरज पूर्ण करताना आपण एकंदरीत भविष्याचा विचार केल्यास आपल्याला पैशांचे व्यवस्थापन देखील करता येऊ शकते याची समज आपल्याला येऊ लागते. अशी समज निर्माण झाल्यास आपण फायनान्स अगदी उत्तम प्रकारे करू शकतो.

तुम्हाला फायनान्स – मराठी माहिती (Finance Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

वरील लेखासाठी तुम्ही सर्च इंजिनवर विविध प्रकारे keywords वापरू शकता…

फायनान्स मराठी माहिती
• फायनान्स विषयी माहिती मराठी
• फायनान्सचे प्रकार कोणते?
• सार्वजनिक वित्त म्हणजे काय?
• निगम वित्त म्हणजे काय?
• वैयक्तिक वित्त म्हणजे काय?
• Personal Finance in Marathi
• What is Finance in Marathi
• वित्त प्रकार
• Types Of Finance In Marathi

The post फायनान्स – मराठी माहिती | Finance Marathi Mahiti | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/feed/ 0 3340