पाऊस निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 19 Jun 2021 05:02:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 पाऊस निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 पाऊस – मराठी निबंध! Essay On Rain In Marathi | https://dailymarathinews.com/essay-on-rain-in-marathi/ https://dailymarathinews.com/essay-on-rain-in-marathi/#respond Sat, 19 Jun 2021 05:02:13 +0000 https://dailymarathinews.com/?p=2341 पाऊस पडणे हे सर्वांसाठीच गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. पाऊस कसा पडतो, पाऊसाचे महत्त्व आणि पाऊसाची किमया विद्यार्थ्यांना माहीत होण्यासाठी पाऊस हा मराठी निबंध (Essay On ...

Read moreपाऊस – मराठी निबंध! Essay On Rain In Marathi |

The post पाऊस – मराठी निबंध! Essay On Rain In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
पाऊस पडणे हे सर्वांसाठीच गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. पाऊस कसा पडतो, पाऊसाचे महत्त्व आणि पाऊसाची किमया विद्यार्थ्यांना माहीत होण्यासाठी पाऊस हा मराठी निबंध (Essay On Rain In Marathi) लिहावा लागतो. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा हा निबंध!

ये रे ये रे पाऊसा – मराठी निबंध ! Paus – Marathi Nibandh

पाऊस सुरू झाला की सर्वत्र विशिष्ट प्रकारचे चैतन्य पसरते. त्या चैतन्याने सर्व सजीवसृष्टी न्हाऊन निघते. उन्हाळा सहन केल्यानंतर पृथ्वी ओलाव्यासाठी आसुसलेली असते. त्याचीच परिणीती म्हणून पाऊस सुरू होतो आणि सर्व निसर्ग आणि सजीव सृष्टी सुखावते.

पाऊसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूर्ण पृथ्वीवर पाण्यामुळेच जीवन आहे त्यामुळे पाण्याला पंचतत्वांपैकी सर्वात महत्त्वाचे समजले जाते. पृथ्वीवरील पाणीच पुन्हा प्रत्येक वर्षी पाऊसाच्या रूपाने ताजेतवाने होऊन परत पडत असते.

पाण्याने झाडे, प्राणी, पक्षी आणि मानव देखील आनंदीत होत असतो. भारतात तर पाऊसाला देवकृपा समजली जाते. संपूर्ण देशात शेती केली जात असल्याने शेतीसाठी पाऊसाचे पाणी किती आवश्यक आहे, हे इथला प्रत्येक नागरिक जाणतो.

पाऊसाचे पाणी शेतीसाठी उपयोगात आणून तसेच जलसंवर्धन करून माणूस वर्षभर खाण्यासाठी धान्य पिकवत असतो. त्याशिवाय वनराई, जंगले, झाडे झुडुपे यांसाठी पाऊस हा वरदानच ठरतो. त्यांची वाढ पावसाळ्यात उत्तम प्रकारे होत असते.

पाऊसाचे पाणी हे नद्या, सरोवरे आणि तलावात साठत असते. नद्यांमार्फत ते पाणी समुद्राला जाऊन मिळत असते. त्या नद्यांतील आणि इतर जे स्त्रोत आहेत त्यामधील पाणी माणूस दैनंदिन जीवन आणि शेतीसाठी वापरतो.

पाऊसामुळेच जलचक्र शक्य आहे. त्या जलचक्रामुळे पृथ्वीवर प्रत्येक वर्षी पाऊस पडतो. त्यानुसार पृथ्वीचे तापमान आणि वातावरण व्यवस्थित ठेवले जाते. परंतु वृक्षतोड, वन्यजीवन विस्कळीत होणे आणि प्रदूषण यामुळे कधीकधी आपल्याला अवकाळी पाऊस आणि प्रचंड पर्जन्यवृष्टी पाहायला मिळते.

प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की शाळा सुरू होत असते त्यामुळे पावसाळ्यातील एक वेगळीच अनुभूती शाळेत शिकताना येत असते. शाळा सुरू झाली की दप्तर आठवत नाही पण छत्री आणि रेनकोट मात्र आठवतो. त्यातच पाऊसावर कविता आणि गोष्टी ऐकल्याने तर पाऊस आणखीनच आवडू लागतो.

चित्रपट, मालिका यांमधून काही वेळा पाऊसाचे चित्रण दाखवले जाते. त्यातून आपल्याला स्वतःचा पाऊसाबद्दलचा अनुभव आठवतो. वास्तविक पाहता सकाळ किंवा सायंकाळचा पाऊस अनुभवताना गरमागरम चहा आणि नाश्ता असेल तर पाऊसाची अनुभूतीच निराळी!

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला पाऊस हा मराठी निबंध (Essay On Rain In Marathi) आवडला असल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नोंदवा…

The post पाऊस – मराठी निबंध! Essay On Rain In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/essay-on-rain-in-marathi/feed/ 0 2341