दवाखान्यात एक तास - मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 17 Nov 2022 06:21:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 दवाखान्यात एक तास - मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 दवाखान्यात एक तास – मराठी निबंध | Davakhanyat Ek Taas Nibandh Marathi | https://dailymarathinews.com/davakhanyat-ek-taas-marathi-essay-davakhanyat-ek-taas-nibandh-marathi/ https://dailymarathinews.com/davakhanyat-ek-taas-marathi-essay-davakhanyat-ek-taas-nibandh-marathi/#respond Thu, 17 Nov 2022 06:19:32 +0000 https://dailymarathinews.com/?p=5127 दवाखान्यात व्यतित केलेला एक तास कसा काय होता आणि तो आपल्याला काय अनुभव देऊन गेला याचे विस्तृत वर्णन या निबंधात करावयाचे असते.

The post दवाखान्यात एक तास – मराठी निबंध | Davakhanyat Ek Taas Nibandh Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा दवाखान्यात एक तास (Davakhanyat Ek Taas Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. दवाखान्यात व्यतित केलेला एक तास कसा काय होता आणि तो आपल्याला काय अनुभव देऊन गेला याचे विस्तृत वर्णन या निबंधात करावयाचे असते.

दवाखान्यात एक तास निबंध मराठी | Davakhanyat Ek Taas Nibandh Marathi

मी सुधीर पाटील. माझा मित्र संदेश हा आजारी असल्याने मी त्याच्यासोबत शाळा सुटल्यावर दवाखान्यात गेलो. तेथे खूप गर्दी असल्याने आम्हाला एक तासभर तरी थांबावे लागणार होते. आम्ही उपचारासाठी क्रमांक लावला आणि मी संदेशला प्रतिक्षा कक्षात बसवले.

उपचारासाठी आमच्यापुढे दहा क्रमांक होते. त्यामुळे मी प्रतिक्षा कक्षातून बाहेर आलो आणि दवाखान्यात फेरफटका मारू लागलो. दवाखान्यात कमालीची स्वच्छता दिसत होती. स्वच्छता राखण्याची जबाबदारी दोन समवयस्क लोक अगदी नेटाने पार पाडत होते.

उपचार क्रमांक लिहण्यासाठी लेखनिक म्हणून एक स्त्री काम करत होती. तिच्यासोबत एक परिचारिका होती जी रुग्णांना काही समस्या जाणवल्यास तातडीने मदत करण्यासाठी हजर होती. त्यांचे काम हे अगदी महत्त्वपूर्ण असल्याचे जाणवत होते कारण त्यांची तत्परता आणि कामाप्रती समर्पित भाव बघताक्षणी दिसत होता.

रुग्णांची सेवा होण्यासाठी तेथे चार रूग्णकक्ष होते. चारही रुग्णकक्ष रुग्णांनी भरलेले होते. काही रुग्णांना सलाईन चढवली होती तर काही रुग्ण तेथे दीर्घ उपचारासाठी भरती झाले होते. रुग्णांचे नातेवाईक देखील तेथे उपस्थित असल्याने आजार – अपघात – डॉक्टर – उपचार अशा सर्व विषयांच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.

दवाखान्यातील वातावरण हे काही ठिकाणी उर्जादायी तर काही ठिकाणी निराशाजनक असे जाणवत होते. मी अपघात कक्षात गेलो आणि तेथील रुग्णांची दयनीय स्थिती पाहून मला अत्यंत वाईट वाटू लागले. त्यांचे नातेवाईक हे दुःखी – कष्टी असलेले जाणवले. त्या कक्षात भयानक अशी स्मशान शांतता जाणवत होती.

पुढील कक्ष म्हणजे मेडिकल! तेथे सर्व प्रकारची औषधे मिळत होती. त्याला लागूनच प्रथमोपचार कक्ष होता जेथे तातडीने आणि वरचेवर उपचार होत होता. दवाखान्यात लगबग दहा जण पूर्णवेळ काम करत होते. त्यापैकी दोन डॉक्टर, चार परिचारिका आणि चार अन्य मदतनीस होते.

आपले आरोग्य सांभाळण्याचे महत्त्वपूर्ण काम दवाखान्यात होत असते. योग्य प्रकारच्या उपचारांनी काहीजणांच्या आयुष्यात एक नवीन उमेद जागृत होते. तर जीव वाचवण्याची अंतिम आशा म्हणून देखील आपण दवाखान्यातच जात असतो. त्यामुळे आपले प्राण वाचवणारे डॉक्टर हे आपल्याला देवासमान भासत असतात.

आता संदेशचा उपचार क्रमांक आल्याने मी त्याच्यासोबत उपचार कक्षात गेलो. संदेशला खोकला आणि सर्दी झाली असल्याने त्यासंबंधित औषधे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन आम्ही दोघेही बाहेर पडलो. दवाखान्यातील हा एक तास मला आरोग्य आणि जीवनाविषयी अत्यंत अंतर्मुखी करून टाकणारा होता.

तुम्हाला दवाखान्यात एक तास हा मराठी निबंध (Davakhanyat Ek Taas Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post दवाखान्यात एक तास – मराठी निबंध | Davakhanyat Ek Taas Nibandh Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/davakhanyat-ek-taas-marathi-essay-davakhanyat-ek-taas-nibandh-marathi/feed/ 0 5127