दम बिर्याणी मराठीमध्ये Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 27 Dec 2019 04:53:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 दम बिर्याणी मराठीमध्ये Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Chicken Dum Biryani Recipe in Marathi | आस्वाद घेऊन तर पहा. https://dailymarathinews.com/chicken-dum-biryani-recipe-in-marathi/ https://dailymarathinews.com/chicken-dum-biryani-recipe-in-marathi/#respond Fri, 27 Dec 2019 04:53:19 +0000 https://dailymarathinews.com/?p=1139 Chicken dum Biryani Recipe खूपच स्वादिष्ट, पौष्टिक आणि खमंग असते. कमीत कमी वेळेत जास्त पैसे खर्च न करता घरच्या घरी तुम्हीही बनवण्याचा प्रयत्न करू शकता. ...

Read moreChicken Dum Biryani Recipe in Marathi | आस्वाद घेऊन तर पहा.

The post Chicken Dum Biryani Recipe in Marathi | आस्वाद घेऊन तर पहा. appeared first on Daily Marathi News.

]]>
Chicken dum Biryani Recipe खूपच स्वादिष्ट, पौष्टिक आणि खमंग असते. कमीत कमी वेळेत जास्त पैसे खर्च न करता घरच्या घरी तुम्हीही बनवण्याचा प्रयत्न करू शकता. याचा पुरेपूर विचार करून आम्ही घेऊन आलो आहोत Chicken Dum Biryani Recipe in Marathi. चला तर मग बघुयात कशी बनवली जाते ही बिर्याणी.

Dum Biryani Recipe in Marathi

लागणारा वेळ: एक ते दीड तास

चिकन दम बिर्याणी साहित्य:

चिकन ग्रेव्ही साठी साहित्य

  • चिकन ५०० ग्रॅम
  • तमालपत्र २
  • वेलदोडे २
  • लवंग ४
  • दालचिनी २
  • काळ्या मिऱ्या ४
  • मीठ चवीनुसार
  • लिंबू
  • आले लसूण पेस्ट २ चमचे
  • २ चमचे लाल तिखट
  • दही ४ चमचे
  • २ कांदे बारीक चिरून
  • तेल ३ चमचे
  • हिरव्या मिरच्या – ३

भातासाठी साहित्य:

  • उत्तम प्रतीचा तांदूळ – ५०० ग्रॅम
  • जायपत्री
  • काळी मिरी
  • बडीशेप
  • लवंग
  • दालचिनी
  • मीठ
  • तमालपत्र
  • तेल – १ चमचा

दम बिर्याणी साहित्य:

  • चिकन ग्रेव्ही.
  • तयार भात.
  • केशर
  • दूध – १०० मिली
  • तूप – ४ चमचे.
  • टोमॅटो बारीक चिरलेले – २
  • कोथिंबीर.

How to make Chicken Dum Biryani in Marathi । दम बिर्याणी कशी बनवाल?

कृती: 

चिकन ग्रेव्ही कृती: 

१. तांदूळ आणि चिकन वेगवेगळे स्वच्छ धुवून घ्यावे.

२. चिकन मॅरीनेट करू शकता. म्हणजे भांड्यात दही, तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद, लिंबाचा रस घेऊन त्यात चिकन टाकून एक ते दीड तास मॅरीनेट करू शकता.

३. एका भांड्यामध्ये तेल टाकून त्यात हळद, थोडी आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, मिरच्या, जिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलदोडे टाकून चागले परतून घ्यावे. कांदा करपणार नाही याची काळजी घ्यावी.

४. नंतर त्यामध्ये चिकन टाका. आता पाणी टाकून तुम्ही चिकन शिजवू शकता. सर्व तयार झालेली चिकन ग्रेव्ही बाजूला ठेवा.

भात कृती:

१. एका स्वच्छ कापडावर काळी मिरी, दालचिनी, लवंग, बडीशेप आणि जायपत्री ठेवून त्या कापडाला गाठ मारावी.

२. उकळत्या पाण्यात स्वच्छ तांदूळ, मीठ, तमालपत्र, गाठ मारलेले मसाले, १ चमचा तेल (भात सडसडीत व्हावा म्हणून) घालून भात अर्धाकच्चा शिजवावा. भात शिजल्यावर त्यातील गाठ मारलेले मसाल्याचे कापड बाहेर  काढावे. 

बिर्याणी थर:

१. मोठ्या भांड्यात २ चमचे तूप घ्यावे. त्यावर भाताचा एक थर देऊन त्यातच कोथिंबीर , बारीक टोमॅटो पसरावा. त्यावर चिकन ग्रेवीचा एक थर पसरावा. 

२. पुन्हा भाताचा एक थर. आता त्यात थोडे केशर दूध मिसळावे. नंतर चिकन ग्रेविचा थर लावावा. सर्वात वरून भाताचा शेवटचा थर देऊन राहिलेले केशर दूध व थोडा टोमॅटो एकदम बारीक करून टाकावा. २ चमचे तूप वरून सोडावे. 

३. झाकण ठेवून बारीक आचेवर बिर्याणी ३० मिनिटे ‘दम’ करावी.

टीप:

१. Chicken dum biryani करताना कूकर देखील वापरू शकता. जेणेकरून भात योग्य प्रकारे मिसळला जाईल व शिजेल.

२. कोथिंबीर बरोबर पुदिना देखील वापरू शकता.

तर कशी वाटली तुम्हाला आमची हि Chicken Dum Biryani Recipe in Marathi. आम्हाला कंमेंट करून जरूर काळवा.

हे हि वाचा- Chicken Biryani Recipe in Marathi |चिकन बिर्याणी कशी बनवावी?

The post Chicken Dum Biryani Recipe in Marathi | आस्वाद घेऊन तर पहा. appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/chicken-dum-biryani-recipe-in-marathi/feed/ 0 1139