तंत्रज्ञान मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 31 Jul 2020 08:30:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 तंत्रज्ञान मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 तंत्रज्ञान मराठी निबंध ! Technology Essay In Marathi | https://dailymarathinews.com/technology-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/technology-essay-in-marathi/#respond Mon, 03 Aug 2020 20:28:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=1784 आज एकविसाव्या शतकात तंत्रज्ञान जेवढे विकसित झालेले आहे तेवढे यापूर्वी कधीही झाले नव्हते. विज्ञानाचा शोध म्हणजे भौतिक अस्तित्व जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न! त्यातून ते विज्ञान ...

Read moreतंत्रज्ञान मराठी निबंध ! Technology Essay In Marathi |

The post तंत्रज्ञान मराठी निबंध ! Technology Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
आज एकविसाव्या शतकात तंत्रज्ञान जेवढे विकसित झालेले आहे तेवढे यापूर्वी कधीही झाले नव्हते. विज्ञानाचा शोध म्हणजे भौतिक अस्तित्व जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न! त्यातून ते विज्ञान कसे काय विकसित करू शकतो आणि सोयीस्कररीत्या मानवी जीवनात कसे वापरू शकतो, त्यासाठी केलेला खटाटोप म्हणजे तंत्रज्ञान!

तंत्रज्ञान माहितीसाठी काही वैज्ञानिक संकल्पना आणि मानवी भौतिक विकास कसा झाला याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान निबंध (Technology Essay In Marathi) लिहताना नेहमी अनावश्यक विस्तार टाळावा. मुद्देसूद वाक्यरचना आणि सुसंगत वैज्ञानिक माहितीची मांडणी अपेक्षित आहे.

तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे निबंध ! Technology Marathi Nibandh |

मानवी जीवनाचा आणि उत्क्रांतीचा काळ हा खूप जुना असला तरी मागील शतकात लागलेले काही महत्त्वपूर्ण भौतिक आणि वैज्ञानिक शोध माणसाच्या विकासात कारणीभूत ठरलेले आहेत. मानवी जीवन हे खूप रहस्यमयी आहे. त्यामध्ये विज्ञान हे क्रांतीचे पाऊल म्हणावे लागेल. ते विज्ञान सहजरीत्या वापरण्यासाठी अनेक कौशल्ये आणि तंत्रांचा वापर करण्यात आला.

मानवी भौतिक आयुष्य हे सोयीस्कर बनवण्यासाठी जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तंत्रज्ञान हा विज्ञानाचा कार्यभार म्हणता येईल. सर्व वैज्ञानिक नियम आणि दृष्टिकोन हे विविध तांत्रिक पद्धतीने उपयोगात कसे आणता येतील याचा अट्टाहास म्हणजेच आपण त्याला प्रगती समजतो. कोणतेही कार्य आज बसल्या बसल्या पूर्ण होऊ शकते. शारीरिक कष्टाचा कमीत कमी वापर करून माणूस गरजेची सर्व कामे चुटकीसरशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करू लागला आहे.

माणूस अन्न, पाणी, निवारा, वस्त्र याशिवाय जगू शकत नाही. तंत्रज्ञान या सर्व मूळ गरजांत देखील सहभागी होऊ लागले आहे. अन्ननिर्मितीपासून अन्नप्रक्रिया करण्यापर्यंत तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले आहे. प्रक्रिया करून आज पाणी सहज स्वच्छ स्वरूपात उपलब्ध होत आहे. तसेच नवनवीन प्रकारची घरे व इमारती बांधण्यासाठी देखील तंत्रज्ञान वापरले जात आहे.

सर्व औद्योगिक विकासासाठी तंत्रज्ञानच जबाबदार आहे. वस्तू निर्मिती प्रक्रियेचा वेग वाढत आहे. मोठमोठ्या मशिन्स आणि तांत्रिक चालक क्षमता यामुळे मानवी वापर उद्योगक्षेत्रात कमी होत आहे. संगणक आणि ऑपरेटिंग मशिन्समुळे एका क्लिकवर मोठमोठी अवजड कामे काही सेकंदात शक्य होत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान हाताळू शकणारे लोक आज उद्योगक्षेत्रात आवश्यक आहेत.

मोबाईल आणि संगणक वापरामुळे तर पूर्ण जग एका मंचावर आले आहे. विचारांची देवाणघेवाण, वैश्विक समस्या एकत्र येऊन सोडवल्या जाऊ लागल्या आहेत. तंत्रज्ञान वापरामुळे विकासाचे अनेक पर्याय खुले झाले आहेत. व्यवसाय, दळणवळण, शेती, पर्यटन ही सर्व क्षेत्रे तंत्रज्ञानाने विकसित होत आहेत. उड्डाण करून प्रवास करणे, तसेच जलप्रवास, आणि भुप्रवासही एकदम सुखकर झालेला आहे.

तंत्रज्ञानाचे फायदे हे वरवरचे भौतिक आहेत. त्याचा नियंत्रित वापर नसेल तर मात्र निसर्गाला आणि पर्यावरणाला हानी पोहचेल. वाढते प्रदूषण, तांत्रिक ऊर्जेची किरणे आणि त्याचे उत्सर्जन, जलप्रदूषण, वाढते तापमान, या सर्व समस्या
तंत्रज्ञानाची आणि विज्ञानाचीच देन म्हणावी लागेल. वाढत्या तंत्रज्ञानाचा काही अंत आहे का? या प्रश्नाचे उत्तर कोणाजवळच नाही. त्यामुळे मानवी मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मात्र बिघडत आहे.

इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांत तर कमालीची प्रगती झाली आहे. सर्व परिसर उर्जामय आणि प्रकाशित झालेला आहे. ऑटोमॅटिक तंत्रज्ञान तर सर्व माणसाची कामे करू शकते. रोबोट आणि यांत्रिक मशिन्स ही त्याची उदाहरणे म्हणता येतील. भयानक आजारांवर उपचाराकरिता देखील वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान वापरले जात आहे. माणसाच्या शरीरात घडणारे बदल सहज रेकॉर्ड केले जात आहेत.

माणसाचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न तंत्रज्ञान करत असते परंतु आज तसे पाहायला मिळत नाही. मानवी स्वार्थ आणि गरजा खूप वाढलेल्या आहेत. एक तांत्रिक प्रतिस्पर्धाही निर्माण झाली आहे. ज्यामध्ये मानवी क्षमतांची हेळसांड होत आहे. मानसिक रोगी खूप वाढले आहेत. तंत्रज्ञान हे नियंत्रित आणि नियमाने वापरले गेले तर माणसासाठी फायद्याचे असेल. निसर्गावर तंत्रज्ञान वापरून कुठलेही प्रयोग करणे चुकीचे आहे. त्याचे तात्पुरते फायदे होतील पण भविष्य मात्र अंधकारमय होईल.

तर आजच्या या तांत्रिक आणि वैज्ञानिक युगात बुद्धीच्या पलिकडे जाऊन नैसर्गिक जीवनाचा आणि मानवी अस्तित्वाचा विचार करून भविष्यात पाऊले ठेवावी लागतील. तंत्रज्ञानाचा फायदा आणि तोटा ओळखून आवश्यक असेल तेवढाच वापर करण्याचे नियम असले पाहिजेत. तरच आपण तांत्रिक प्रगती खऱ्या अर्थाने करू शकू.

तुम्हाला तंत्रज्ञान मराठी निबंध ( Technology Essay In Marathi ) कसा वाटला? याबद्दलचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा….

The post तंत्रज्ञान मराठी निबंध ! Technology Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/technology-essay-in-marathi/feed/ 0 1784