ट्रेडिंग म्हणजे काय Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 21 Jul 2021 04:58:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 ट्रेडिंग म्हणजे काय Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 ट्रेडिंग की गुंतवणूक! Trade or Invest – सर्वोत्तम पर्याय कोणता? https://dailymarathinews.com/trade-or-invest-in-marathi/ https://dailymarathinews.com/trade-or-invest-in-marathi/#comments Wed, 21 Jul 2021 04:58:13 +0000 https://dailymarathinews.com/?p=2407 ट्रेडिंग करणे योग्य की गुंतवणूक करणे योग्य या प्रश्नाचे उत्तर ही ज्याची त्याची निवड आहे. त्यासाठी बरेच निकष पडताळणे आवश्यक आहे. प्रस्तुत लेखात ट्रेडिंग की ...

Read moreट्रेडिंग की गुंतवणूक! Trade or Invest – सर्वोत्तम पर्याय कोणता?

The post ट्रेडिंग की गुंतवणूक! Trade or Invest – सर्वोत्तम पर्याय कोणता? appeared first on Daily Marathi News.

]]>
ट्रेडिंग करणे योग्य की गुंतवणूक करणे योग्य या प्रश्नाचे उत्तर ही ज्याची त्याची निवड आहे. त्यासाठी बरेच निकष पडताळणे आवश्यक आहे. प्रस्तुत लेखात ट्रेडिंग की गुंतवणूक (Trade or Invest in Marathi) या दोन्ही पर्यायांचा सखोल विचार करण्यात आलेला आहे.

ट्रेडिंग की गुंतवणूक – सर्वोत्तम पर्याय कोणता? Trade or Invest in Stocks in Marathi

सर्वप्रथम व्यापार (ट्रेडिंग) आणि गुंतवणूक म्हणजे काय हे पहिले पाहिजे. त्यातील फरक बारकाईने जाणून घेतल्यास आपल्याला दोन्हीतील सर्वोत्तम पर्याय कोणता असू शकेल हे समजेल.

गुंतवणूक म्हणजे काय? What is Investment in Marathi |

स्टॉक, म्युच्युअल फंड, बॉण्ड्स तसेच गुंतवणुकीच्या इतर क्षेत्रात पैसे गुंतवून त्याचा भविष्यात होणारा लाभ पाहणे. सुरुवातीला खरेदी असते आणि त्यावर होल्ड ठेवून भविष्यात त्याची रक्कम वाढल्यावर त्याचा लाभ प्राप्त करणे.

भविष्यात असणारे खर्च, महागाई आणि सुविधा यांचा विचार करून केली जाणारी गुंतवणूक हा एक चांगला पर्याय आहे. परंतु यामध्ये तुम्हाला खूप संयमी राहावे लागते.

सध्या गुंतवणूक करवून देणारे अनेक दलाल आणि त्या प्रकारच्या कंपन्या आहेत जे तुमच्या फायद्यातील काही टक्के रक्कम स्वतःला ठेवतात आणि तुम्हाला नक्की फायदा करवून देतात.

गुंतवणूक कोठे करायची हा संपूर्णतः त्यांचा प्रश्न असतो. त्याच्या व्यवस्थापनाची काळजी तुम्हाला करणे गरजेचे नसते.

ट्रेडिंग म्हणजे काय? What is Trading In Marathi |

व्यापार (ट्रेडिंग) म्हणजे कोणतीही वस्तू किंवा सेवा कमी किंमतीत विकत घेणे आणि नंतर जेव्हा त्या वस्तूची किंवा सेवेची किंमत वाढते तेव्हा ती विक्री करणे.

कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करुन थोड्या वेळात नफा मिळवणे हे व्यापाराचे मुख्य उद्दीष्ट आहे.

यामुळेच शेअर मार्केटमध्ये व्यापार सर्वाधिक केला जातो आणि लोक दररोज शेअर्सवर ट्रेडिंग करून पैसे कमावतात.

यामध्ये वस्तूंची, स्टॉक्सची संख्या महत्त्वपूर्ण ठरते. कारण त्यानुसारच तुम्हाला होणारा फायदा हा अतिरिक्त असतो. यामध्ये वेळेचे बंधन राहते.

ट्रेडिंगमध्ये मुख्यत्वे तीन प्रकार आहेत. इंट्राडे ट्रेडिंग (Intraday Trading), स्कॅल्पिंग ट्रेडिंग (Scalping Trading) आणि स्विंग ट्रेडिंग (Swing Trading) असे ते तीन प्रकार आहेत. कमीत कमी वेळेपासून जास्तीत जास्त काळापर्यंत ट्रेडिंग चालू ठेवण्यासाठी हे तीन प्रकार उपलब्ध आहेत.

ट्रेडिंग की गुंतवणूक? (Trade or Invest)

अल्प मुदतीसाठी केले जाणारे ट्रेडिंग हे नेहमीच धोकादायक असते. म्हणूनच गुंतवणूकीपेक्षा व्यापारामध्ये जास्त धोका संभव आहे.

व्यापार केला जात असताना तोटा होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. व्यवस्थित निरीक्षण आणि अभ्यास करूनच ट्रेडिंग केले तरच फायद्यात राहाल.

शेअर बाजारात सक्रिय सहभाग नसल्यास अल्प प्रमाणात गुंतवणूक हा पर्याय योग्य राहील. व्यापाराची त्यावेळी निवडदेखील करू नका.

तुम्हाला दोन्हीही पर्याय योग्य वाटत असतील तर दोन्हींसाठी किती रक्कम आवश्यक आहे त्याचे विभाजन करावे. बचतीची रक्कम वेगळी ठेवून ट्रेडिंग आणि गुंतवणूक असे दोन्ही पर्याय तुम्ही निवडू शकता.

महत्त्वपूर्ण सूचना –

ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करताना आपण फक्त नफ्याचा विचार करत आहोत. परंतु तोटा झाल्यास तो सहन करण्यासारखा असेल का? त्यानुसार अत्यंत अल्प रकमेपासून ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करावी.

आपली बचत ही गुंतवणूक केल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा अत्यंत जास्त प्रमाणात असणे गरजेचे आहे तर आणि तरच तुम्ही फायद्यात राहाल! नुकसान झाले तरी त्याचे तुम्हाला काहीही वाटणार नाही.

व्यापार किंवा गुंतवणूक करणे हे एखाद्याचे वय, उत्पन्नाचे स्वरूप आणि वृत्ती यावर अवलंबून असते. त्यामुळे अभ्यासक व्हा. शेअर मार्केट, व्यापार, आणि गुंतवणूक या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करूनच तुमचे पैसे गुंतवा.

तुम्हाला ट्रेडिंग की गुंतवणूक (Trade or Invest in Marathi) – सर्वोत्तम पर्याय कोणता! हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post ट्रेडिंग की गुंतवणूक! Trade or Invest – सर्वोत्तम पर्याय कोणता? appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/trade-or-invest-in-marathi/feed/ 1 2407