जेवढा महान उद्देश्य तेवढे महान जीवन Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 11 Apr 2021 01:57:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 जेवढा महान उद्देश्य तेवढे महान जीवन Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 जेवढा महान उद्देश्य तेवढे महान जीवन | Importance of Purpose In Life | https://dailymarathinews.com/purpose-in-life-marathi/ https://dailymarathinews.com/purpose-in-life-marathi/#respond Mon, 12 Apr 2021 01:55:00 +0000 https://dailymarathinews.com/?p=2155 स्वतःला आपण जसे समजतो तसेच आपण असतो, आणि तसेच बनतो जसे स्वतःला मनातल्या मनात मानतो की बनू शकतो. त्यामुळे स्वतःची प्रगती आर्थिक किंवा भौतिक श्रीमंतीवर ...

Read moreजेवढा महान उद्देश्य तेवढे महान जीवन | Importance of Purpose In Life |

The post जेवढा महान उद्देश्य तेवढे महान जीवन | Importance of Purpose In Life | appeared first on Daily Marathi News.

]]>
स्वतःला आपण जसे समजतो तसेच आपण असतो, आणि तसेच बनतो जसे स्वतःला मनातल्या मनात मानतो की बनू शकतो. त्यामुळे स्वतःची प्रगती आर्थिक किंवा भौतिक श्रीमंतीवर न ठरवता मानसिक विकासावर ठरवावी. जीवनात उद्देश्य महान असेल तर मानसिक विकास सहज शक्य आहे.

मानसिक विकास घडताना एक गोष्ट लक्षात घ्यावी की सर्वांचा विकास हाच स्वतःचा विकास असतो. आसपासचे सर्व लोक ज्या महत्त्वकांक्षेने प्रेरित असतील तशीच आपली इच्छा पण घडत जाते. त्यामुळे सर्वांच्या भल्याची इच्छा आणि त्या दिशेने केले जाणारे प्रयत्न आपला उद्देश्य निश्चित करत असतात.

जीवनात जर उद्देश्य नसेल तर जगण्यातील मूर्खपणाच सतत झळकतो. गरजा पूर्ण करणे आणि त्यांचा हव्यास करणे, मोह धरणे, आणखी मिळावे असे वाटणे, असे सतत घडत राहते. त्यामुळे काम करण्यामागील उद्देश्य जर निश्चित आणि योग्य असेल तर आपल्याला जीवन उत्साहाने जगण्याची प्रेरणा मिळत राहते.

लहान मुलांना आपण सतत एक प्रश्न विचारतो की मोठे झाल्यावर कोण बनणार? त्याचे उत्तर हे समाजाच्या वासनेनुसार आणि इच्छेनुसार असले पाहिजे हेच अपेक्षित असते. त्या मुलाचे कलागुण कसे विकसित होतील आणि स्वतः साठी उत्तम ध्येय तो स्वतःच कसा ठरवू शकतो हे विचारात घेतले जात नाही.

अशा परिस्थितीचा विचार केल्यास कळेल की मानवी चेतनेचा, जीवनाचा विकास हा उद्देश्य समोर न ठेवता माणूस फक्त कारकून बनण्याकडे आणि विलासी जीवन जगण्याकडे झुकत आहे.

त्याचाच परिणाम आहे की, सध्याच्या सामाजिक संरचनेनुसार मानवी मूल्यांची पातळी कमी होत आहे. त्यामुळे उद्देश्य निकृष्ट आणि अमानवीय असेल तर जीवन अत्यंत संकुचित होऊन जाते.

शिक्षणज्यातून माणूस अतिउच्च जीवनाच्या नीती मुल्यांकडे झुकत गेला पाहिजे त्यातून तो फक्त आयुष्यभर काम करण्याकडे कलत जातो. त्यानंतर सरकार आणि सामाजिक उद्योगधंदे असे आहेत की त्यात भ्रष्टाचार न करणारा मूर्खच समजला जातो.

जीवन जर अशा प्रकारे घडत गेले तर जीवनात फक्त विफलताच हाती लागते. त्यातून मग मानवी मुल्यांकडे थोडेसुद्धा लक्ष दिले जात नाही आणि परिणामी आपण दुःखी – कष्टी आयुष्य जगत राहतो. यावर पर्याय म्हणजे बौद्धिक विकास घडवत जाणे. तो विकास फक्त जीवनाचा उद्देश्य ठरवल्यावर होऊ शकतो.

उद्देश्य कसा ठरवावा? How to decide a Purpose In Life?

जीवन तसे जगण्याची प्रक्रिया आहे पण इतर नातेसंबंध आणि व्यवहारी आयुष्यात उद्देश्य असला की जीवन एकमार्गी बनते आणि खऱ्या स्वरूपाचे यश मिळवता येते. त्यामुळे ज्या उद्देश्याने स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे भले होणार आहे तो उद्देश्य चांगला असतो असे मानावे.

काहीवेळा उद्देश्य चांगला असूनदेखील काम निकृष्ट निवडले जाते. तसे करणेसुद्धा योग्य नाही. एका व्यक्तीचे काम खूप बदनाम आहे आणि तो दान करत असेल तरी त्याचा उद्देश्य पूर्ण होऊ शकत नाही. कारण दान कोणाला आणि कसे करावे याची समज देखील अत्यंत खोल वैचारिक मंथनातून आणि अनुभवातून प्राप्त होत असते.

पैसा हा जर जीवनाचा उद्देश्य ठेवला तर आपल्याला आपले काम आवडणार नाही आणि सतत पैशाचे विचार मनात येतील. याउलट जर सर्वांचे सुख, समाधान, शांती हा जर उद्देश्य ठेवला तर आपण नीतीवान बनत जाऊ आणि आपल्या हातून चुकीचे काम होणारच नाही.

उद्देश्य म्हणजे जीवन जगण्याचा हेतू! एखादा उद्देश्य हा आपले जीवन चालवण्यासाठी इंधनाचे काम करत असतो. त्यामुळे जेवढा महान उद्देश्य तेवढा महान व्यक्ती घडत जातो. याउलट जो व्यक्ती स्वकेंद्रित असतो आणि त्याचा उद्देश्य फक्त अहंकार पूर्ण होईल असा असतो तो परिणामी स्वार्थी आणि दुःखीच बनत जातो.

  • खाली काही उद्देश्य दिलेले आहेत त्यांचा पाठलाग केला तर सकारात्मक जीवन बनेलच शिवाय मानवी जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.

१. स्वतःचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास घडवणे. (छंद, वाचन, कला, खेळ, व्यायाम, योगा, ध्यान याद्वारे स्वतःचे जीवन उन्नत बनवत जाणे.)

२. कुटुंब व समाजाला कोणताही त्रास होईल असे कर्म न करणे. यामध्ये व्यसन, भांडण, चोरी, लबाडी, भ्रष्टाचार न करणे असे उद्देश्य असू शकतील.

(उदा. जर कोणी दारूचे दुकान टाकले तर त्यामुळे कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त होतील त्यामुळे तेथे नुसते पैसे कमावून काय उपयोग होणार आहे? त्या कामाचे परिणाम तर वाईटच होणार आहेत.)

३. आजकाल आरोग्याच्या समस्या खूप भेडसावत आहेत त्यामुळे तुम्ही जर एक निरोगी जीवनशैली विकसित केली आणि आरोग्य शिक्षण घेऊन आरोग्यसंस्था अथवा क्लिनिकच्या माध्यमातून समाजकार्य करत राहिलात, लोकांवर उपचार केले आणि आरोग्याच्या संदर्भात जनजागृती केली तर तुमच्या या चांगल्या उद्देश्यामुळे नक्कीच मानवी विकास घडू शकेल.

४. मानसिक रोग तज्ञ – मानसिक वैफल्याचा परिणाम शरीरावर होत असतो. त्यामुळे तुम्ही स्वतः मानसिक रोग तज्ञ झालात तर समाजातील अनेक व्यक्तींचे मानसिक रोग दूर करू शकाल.

५. योगा हे पूर्ण जीवन तत्वज्ञान आहे. स्वतः योगा शिकून जर योगसंस्था निर्माण केलीत तर मानवी विकास नक्कीच घडून येईल.

६. शिक्षण क्षेत्र जर निवडले तर नुसता पैसा हा उद्देश्य न ठेवता मुलांना योग्य शिक्षण देऊन भावी पिढी घडवणे असा उद्देश्य ठेवला जाऊ शकतो.

७. सरकारी क्षेत्र जर निवडले, तर तेही मानवी सेवेसाठीच आहे हे सर्वप्रथम लक्षात आले पाहिजे. भ्रष्टाचार न करता निस्वार्थ सेवा करणे असा उद्देश्य जर तुम्ही ठेवलात तर नक्कीच तुमच्या हातून समाजसेवा घडेल यात शंकाच नाही.

वरील सर्व पर्याय हे प्रथम स्वतःचा विकास दर्शवतात आणि नंतर समाजाचा! त्यामुळे उद्देश्य ठरवताना सामाजिक विकास हाच मुद्दा पुढे असला पाहिजे मग व्यक्तिगत स्वार्थ न पाहता स्वतःच्या गरजा व्यवस्थित पूर्ण करून आपण निस्वार्थ सेवा करण्यात मग्न होऊन जातो. तेव्हाच आपले जीवन सार्थक होण्याच्या मार्गावर असते.

जसा उद्देश्य तसे जीवन!

संपूर्ण लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! आशा आहे कि जेवढा महान उद्देश्य तेवढे महान जीवन (Importance of Purpose In Life) हा लेख तुम्हाला आवडला असेल… तुम्हाला जर जीवनातील आणखी काही उदात्त उद्देश्य माहीत असतील तर त्या उद्देश्याची नक्की कमेंट करा..

The post जेवढा महान उद्देश्य तेवढे महान जीवन | Importance of Purpose In Life | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/purpose-in-life-marathi/feed/ 0 2155