जागतिक टपाल दिन निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 29 Sep 2021 14:27:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 जागतिक टपाल दिन निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 जागतिक टपाल दिन – मराठी निबंध | World Post Day Essay In Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/ https://dailymarathinews.com/%e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/#respond Wed, 29 Sep 2021 14:16:08 +0000 https://dailymarathinews.com/?p=2598 प्रस्तुत लेख हा जागतिक टपाल दिन हा मराठी निबंध आहे. टपाल दिनाविषयी आणि टपाल सेवा संदर्भात सर्व आवश्यक

The post जागतिक टपाल दिन – मराठी निबंध | World Post Day Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा जागतिक टपाल दिन हा मराठी निबंध (World Post Day Essay In Marathi) आहे. टपाल दिनाविषयी आणि टपाल सेवा संदर्भात सर्व आवश्यक माहिती पुरवणारा असा हा निबंध आहे.

टपाल दिन – मराठी निबंध | World Post Day Marathi Nibandh |

संपूर्ण जगभरात टपाल सेवा कार्यान्वित होत्या त्यावेळी पोस्टाने पत्र घरी येणे म्हणजे एकप्रकारे उत्साहाची भावना असायची. आपला नातेवाईक दूर ठिकाणी राहत असेल तर तो नक्कीच टपाल पत्र पाठवायचा आणि ख्याली खुशाली विचारायचा.

अशाच टपाल सेवा विभागासाठी आणि त्यांच्या अनमोल कार्यासाठी जागतिक टपाल दिन किंवा वर्ल्ड पोस्ट डे हा दिन जगभरात दरवर्षी 9 ऑक्टोबरला साजरा केला जातो. 9 ऑक्‍टोबर ते 15 ऑक्‍टोबर या कालावधीत टपाल सप्ताहाचे आयोजन केले जाते.

आजच्या दिवशी म्हणजे 9 ऑक्टोबरला टपाल दिवस साजरा करण्याचा हेतू असा की टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी जनजागृती होणे. सर्व लोकांच्या मनात टपाल सेवेप्रती आदराची भावना जागृत झाली पाहिजे तसेच त्यांच्या कार्याप्रती सन्मान व्यक्त केला गेला पाहिजे.

भारतीय टपाल सेवा ही भारतातील सरकारच्या टपाल खात्यामार्फत इंडिया पोस्ट या नावाने चालवली जाते. देशभरात पसरलेल्या एक लाख 55,333 टपाल कार्यालयामार्फत चालणारा पोस्टाचा कारभार हे जगातील सर्वात मोठे जाळे म्हणता येईल.

आज आपण पाहतो की देशाच्या दूरवरच्या आणि पोहोचायला अत्यंत अवघड भागातील टपालसेवा पोहोचली आहे. भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटांची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये1852 मध्ये झाली तर 1854 पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचे प्रचलन सुरू झाले.

भारतामध्ये पहिले टपाल तिकीट 1931 साली छापले गेले. त्यानंतर पहिले स्वातंत्र्योत्तर तिकीट 1947 मध्ये निघाले आणि त्यावर भारतीय झेंडा छापण्यात आला. अगदी 25 ते 30 वर्षापूर्वी पर्यंत टपाल हेच आपल्या संवादाचे प्रमुख माध्यम होते.

सध्या संदेशाची देवाणघेवाण फेसबुक, टि्वटर, व्हाट्सऍप आणि इतर डिजिटल ॲपच्या माध्यमातून होऊ लागली आहे परंतु टपाल हे माध्यम हे कधीही न विसरणारे असे आहे. त्याला आपण तंत्रज्ञानाच्या जोडीने आधुनिक माध्यम बनवू शकतो आणि त्याचीच सध्या गरज आहे.

तुम्हाला जागतिक टपाल दिन हा निबंध (World Post Day Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post जागतिक टपाल दिन – मराठी निबंध | World Post Day Essay In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/feed/ 0 2598