घोडा मराठी माहिती Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Mon, 25 Oct 2021 04:44:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 घोडा मराठी माहिती Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 घोडा – मराठी माहिती | Horse Information in Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/ https://dailymarathinews.com/%e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/#respond Mon, 25 Oct 2021 03:03:30 +0000 https://dailymarathinews.com/?p=2753 प्रस्तुत लेख हा घोडा या प्राण्याविषयी मराठी माहिती आहे. घोड्याची शरीररचना, त्याचे राहणीमान अशा मूलभूत स्वरूपाची माहिती

The post घोडा – मराठी माहिती | Horse Information in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा घोडा या प्राण्याविषयी मराठी माहिती (Horse Information in Marathi) आहे. घोड्याची शरीररचना, त्याचे राहणीमान अशा मूलभूत स्वरूपाची माहिती या लेखात देण्यात आलेली आहे.

घोडा प्राणी माहिती | Ghoda Marathi Mahiti |

आपण आत्तापर्यंत घोड्यांच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. प्राचीन इतिहासात त्याची वर्णने वाचलेली आहेत. चित्रपट, मालिका यांमधून सुध्दा घोडा हा प्राणी पाहायला मिळतो.

लहान मुलांना घोडा खूप आवडतो. त्यांच्याकडे घोडा हे खेळणे असतेच. जिवंत घोडा पाहण्यासाठी लहान मुले नेहमीच आतुर असतात. घोड्याची सवारी करणे सर्वजण पसंद करतात. लग्न समारंभ, मिरवणूक अशा प्रसंगी घोड्याचा उपयोग होत असतो.

घोडा हा ईक्विडी कुळातील सस्तन प्राणी आहे. त्याचे शास्त्रीय नाव ईक्वस फेरस कॅबॅलस असे आहे तर इंग्रजीमध्ये त्याला horse (हॉर्स) असे म्हटले जाते.

वाहतूक, पूर्वीच्या काळातील युद्ध, विविध खेळ यासाठी घोड्यांचा वापर केला जात असे. सर्व प्रगत देशांमध्ये फक्त शर्यतीसाठी त्याचा उपयोग करतात. घोडा हा ८ तासात १४०० किमी अंतर धावू शकतो. पूर्वी धावत्या इंजिनवर चालणाऱ्या गाड्या नसताना “घोडागाडी” हा प्रवासासाठी उत्तम प्रकार आपल्याला पाहायला मिळायचा.

घोड्याची शरीररचना –

घोड्यांच्या शरीराची लांबी ही सुमारे ३०० सेमी इतकी असते. त्याचे शेपूट ९० सेमी इतके लांब असते. घोड्याचे वजन सरासरी ३५० कि.ग्रॅ. असते. शरीराच्या मानाने त्याचे डोके हे आकाराने मोठे असते व ते त्याच्या रंगाहून गडद असते. घोड्याचे कान मात्र लहान असतात.

काही घोड्यांचा रंग पांढरा असतो तर काही घोड्यांचा रंग काळा असतो. काही घोडे तपकिरी रंगाचे सुद्धा असतात. त्याच्या अंगावर हिवाळ्यात दाट केस येतात आणि उन्हाळ्यात विरळ होतात. परंतु शेपूट आणि आयाळीतील केस कधीच दाट किंवा विरळ होत नाहीत ते तेवढेच राहतात.

घोडयामध्ये ऐकण्याची व गंध घेण्याची क्षमता चांगली असते. घोडे हे जंगलात असल्यावर कळपाने राहतात. घोडा हा सतर्क प्राणी आहे, त्याचे सतत आजूबाजूला लक्ष असते. त्याच्या कळपातील नर घोडा हा त्या सर्वांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो.

घोड्याचे राहणीमान –

घोडा हा शाकाहारी प्राणी आहे. तो गवत खातो. घोड्याला हरभरा खायला जास्त आवडतो. घोड्याच्या पिल्लाला शिंगरू असे म्हणतात. दोन वर्ष झाली की शिंगरू त्याच्या आईपासून वेगळे होते. घोडा हा २०‒३० वर्षे जगू शकतो.

घोडा हा प्राणी कष्टाळू स्वभावाचा आहे तसाच तो चपळही आहे. जगातील वेगवेगळ्या हवामानात तो राहू शकतो व गवतात चरून जगू शकतो. त्यामुळे त्याचा उपयोग मानवाला प्राचीन काळापासूनच होत आलेला आहे. अंधारात देखील त्याला दिसते म्हणून कदाचित राजे महाराजे युध्दात आणि प्रवासासाठी घोड्यांचा वापर करत होते.

आधुनिक काळात व्यापारी घोड्यांच्या सहाय्याने मालाची ने – आण करणे, युध्दात घोड्यांचा वापर करणे, मनोरंजनासाठी घोड्यांच्या शर्यतींचे आयोजन करणे यासाठी घोड्यांचा वापर होत असतो.

घोडा का बसत नाही?

प्रत्येक सजीवाकडे एक प्रकारची शरीररचना असते.या रचनेप्रमाणेच प्रत्येक सजीव काम करत असतो. आपण इतर प्राणी म्हणजे कुत्रा, बैल यांना बसताना पाहिले आहे. परंतु घोड्याला कधीही बसताना पाहिलेले नाही, असे का?

त्याचे कारण असे की कुत्रा, बैल हे त्यांचे गुडघे दुमडू शकतात परंतु घोड्याचे पाय दुमडू शकत
नाहीत. त्याला कुत्रा व बैलासारखे पायात दुमडणारे सांधेच नसतात.

लेखन सौजन्य – प्रिती पवार

तुम्हाला घोडा मराठी माहिती (Horse Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post घोडा – मराठी माहिती | Horse Information in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80/feed/ 0 2753