गणेश निबंध मराठी Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 16 Dec 2021 15:07:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 गणेश निबंध मराठी Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 गणपती – मराठी निबंध | Ganpati Marathi Nibandh | https://dailymarathinews.com/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/ https://dailymarathinews.com/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/#respond Thu, 16 Dec 2021 15:07:22 +0000 https://dailymarathinews.com/?p=2958 प्रस्तुत लेख हा गणपती - मराठी निबंध आहे. गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते. पुरातन काळापासून गणपतीला भक्ती, शक्ती आणि ज्ञान या सर्व क्षेत्रांत

The post गणपती – मराठी निबंध | Ganpati Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा गणपती – मराठी निबंध (Ganpati Marathi Nibandh) आहे. गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते. पुरातन काळापासून गणपतीला भक्ती, शक्ती आणि ज्ञान या सर्व क्षेत्रांत विशेष महत्त्व आहे. अशा या पूज्य देवतेविषयी या निबंधात माहिती सांगण्यात आलेली आहे.

विघ्नहर्ता गणेश – निबंध मराठी | Lord Ganesh Essay In Marathi |

गणांचा ईश म्हणजे गणेश! गण हे भगवान शिव आणि देवी पार्वतीचे सेवक होत. गणांचा प्रभू म्हणजेच गणांचा अधिपती म्हणून गणपती असे नावदेखील गणेश या देवतेचे प्रसिध्द आहे. गणपती हा भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा पुत्र आहे. त्यामुळे गणपतीचा उल्लेख शिवहर आणि पार्वतीपुत्र असा देखील केला जातो.

भारतीय संस्कृतीत तसेच अध्यात्मिक उपासनेत गणपतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातच नाही तर जगभरात गणपती या देवतेची आराधना केली जाते. गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते. तसेच सर्व विघ्नांचा हर्ता म्हणून देखील गणपतीकडे सर्व आशेच्या नजरेने पाहतात.

गणपतीच्या मूर्तीचे आपण व्यवस्थित निरीक्षण केल्यास आपल्याला आढळते की त्याने पाश, अंकुश, परशु अथवा दंत अशी शस्त्रे धारण केलेली असतात. गणपतीचे वाहन हे उंदीर आहे तर गणपतीला मोदक हा पदार्थ खूप आवडतो.

पुराण साहित्यात अनेक ठिकाणी भगवान गणेशाचा उल्लेख आढळतो. तेथे गणपतीच्या विविध रूपांनुसार त्याचे नामकरण करण्यात आलेले आहे. लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, गजानन, गणेश आणि एकदंत अशी इतरही गणपतीची नावे प्रसिद्ध आहेत.

महर्षी व्यास यांनी गणपती देवाकडून महाभारत या प्रसिध्द ग्रंथाचे लेखन करवून घेतल्याचा उल्लेख आहे. गणपतीचा देह हा मानवी शरीर आहे आणि त्याचे तोंड हे गजमुख आहे, याबद्दल एक अतिशय रंजक अशी पौराणिक कथा सांगितली जाते.

पौराणिक कथेनुसार पार्वती देवीस भेटण्यासाठी आलेल्या भगवान शंकरास अडवल्याने शंकराने गणपतीचे मानवी मुख शरीरापासून वेगळे केले. त्यानंतर पार्वती देवीच्या आक्रोशामुळे शंकरास बाल गणेशाला पुन्हा जिवंत करावे लागले. यामध्ये त्यास एका हत्तीचे तोंड बसवण्यात आले. ही कथा भारतात खूपच प्रचलित आहे.

महाराष्ट्रात गणपती पूजनाला विशेष स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर कामाचा “श्री गणेशा” करणे अशी म्हण प्रसिद्ध आहे. घरगुती किंवा सार्वजनिक मंगल प्रसंग असेल तर गणेशाचे नाव आणि प्रतिमा वापरणे शुभ समजले जाते.

लोकमान्य टिळकांनी इ. स. १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. घरोघरी केली जाणारी उपासना ही सामाजिक स्तरावर ऐक्याचे प्रतिक बनले. भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थी पासून तब्बल दहा दिवस गणेशाची भक्तिभावाने उपासना केली जाते.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणेशमुर्त्या विसर्जित केल्या जातात. गणपतीच्या उपासनेसाठी ॐ गं गणपतये नमः असा मंत्रोच्चार केला जातो. तसेच “सुखकर्ता दुःखहर्ता..” ही गणेशाची आरती देखील म्हटली जाते.

महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई अशा शहरांत सार्वजनिक गणेशोत्सव हा अत्यंत नयनरम्य सोहळा असतो. गावोगावी गणेश मंदिर नसले तरी अष्टविनायक म्हणून प्रसिध्द असलेली  गणपतीची मंदिरे ही तीर्थक्षेत्रे समजली जातात. अशी ही बुद्धी आणि भक्तीची देवता मंदिरातच नाही तर अंतरंगी देखील सतत वास करत राहो.

तुम्हाला गणपती – मराठी निबंध (Ganpati Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post गणपती – मराठी निबंध | Ganpati Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7/feed/ 0 2958