कोरोना - मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Fri, 18 Dec 2020 02:13:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 कोरोना - मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 कोरोना – मराठी निबंध | Corona Essay In Marathi | Covid 19 Essay | https://dailymarathinews.com/corona-essay-in-marathi/ https://dailymarathinews.com/corona-essay-in-marathi/#comments Fri, 18 Dec 2020 02:13:55 +0000 https://dailymarathinews.com/?p=1867 कोरोना निबंध (Corona Nibandh) कसा लिहायचा, त्याची प्राथमिक माहिती, विस्तार कसा असू शकतो याचे सविस्तर विश्लेषण या निबंधात केलेले आहे. कोरोना हा विषाणू कसा प्रसारित ...

Read moreकोरोना – मराठी निबंध | Corona Essay In Marathi | Covid 19 Essay |

The post कोरोना – मराठी निबंध | Corona Essay In Marathi | Covid 19 Essay | appeared first on Daily Marathi News.

]]>
कोरोना निबंध (Corona Nibandh) कसा लिहायचा, त्याची प्राथमिक माहिती, विस्तार कसा असू शकतो याचे सविस्तर विश्लेषण या निबंधात केलेले आहे. कोरोना हा विषाणू कसा प्रसारित झाला तसेच त्या विषाणूंमुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे, त्याचे दुष्परिणाम, घ्यावयाची काळजी, अशी सर्व माहिती कोरोना किंवा कोविड – 19 या निबंधात लिहायची असते. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा कोरोना हा निबंध!

कोरोना निबंध | Corona Marathi Nibandh |

कोरोना हा एक प्रकारचा विषाणू आहे. संपूर्ण जगच त्याच्या विळख्यात सापडले आहे. परंतु खूप परिश्रमानंतर त्यावर आता लस शोधण्यात आलेली आहे. कोरोना नावाचा विषाणूंचा गट आहे. त्याचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या आजारास कोविड 19 असे नाव दिलेले आहे. 2019 मध्ये हा रोग मनुष्यात आढळल्याने कोरोना व्हायरस 19 म्हणजेच कोविड 19 (Covid 19) असे नाव देण्यात आले.

1960 च्या दशकात सर्वप्रथम मनुष्याला श्वसन मार्गात संसर्ग होणाऱ्या कोरोना व्हायरसचा त्रास आढळून आला. या आजारात कोरोना विषाणूंचे श्वसन मार्गात भयंकर संक्रमण आढळून आले होते. त्यानंतर 2019 मध्ये चीनच्या वुहान या शहरात कोरोना विषाणू संक्रमण झाल्याचे आढळले. सुरुवातीला वुहानमध्ये पसरलेला हा आजार संपूर्ण चीनमध्ये पसरला आणि त्यांनतर संपूर्ण जगभरात त्याने थैमान मांडले आहे.

ताप, कोरडा खोकला, श्वसन मार्गात आणि घशात अडथळा, शारीरिक थकवा अशी लक्षणे या आजारात आढळून येतात. याव्यतिरिक्त इतर दीर्घ आजार ज्या व्यक्तींना असतील त्यांना त्याच आजारात वाढ झाल्याचे आढळून आले. स्वस्थ व्यक्तींना संक्रमण झाले तरी वरील लक्षणे दिसून येत नव्हती परंतु इतरत्र संसर्ग होऊन तोच आजार पसरू नये म्हणून आता सर्वत्र तपासण्या चालू आहेत. स्वयंसेवक, कर्मचारी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासण्या करत आहेत.

रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, आणि इतर दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना आजारापासून जास्त धोका संभवतो. त्यांना या आजाराची लागण झाल्यास उपचार घेणे सक्तीचे ठरते. साधारण खोकला, ताप किंवा घशात खवखवणे असे आजार असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोरोना संक्रमण होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने हा संसर्गजन्य आजार आपण काही व्यक्तिगत सवयी पाळल्याने आणि काळजी घेतल्याने आपल्यापासून दूर ठेवू शकतो.

कोविड 19 आजार संसर्गजन्य असल्याने आणि आजाराची वेगळी स्पष्ट अशी लक्षणे नसल्याने या आजारात एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, बाहेर जाताना, फिरताना तोंडावर मास्क घालून जाणे अशी व्यक्तिगत काळजी आपण घेऊ शकतो. खोकताना किंवा शिंकताना तर रुमालाचा वापर करणे अत्यावश्यकच आहे. बाहेर गेल्यावर कोणत्याही पृष्ठभागाला अनावश्यक स्पर्श करणे टाळावे कारण कोरोना हा विषाणू दिसूनही येत नाही आणि लवकर नष्टही होत नाही.

नियमित बोलताना तीन फुटांचे अंतर ठेवावे. आंबट चवीच्या पदार्थांचा, फळांचा आहारात समावेश करावा. कोणतेच औषध शंभर टक्के उपचार देणारे नसल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा एकच पर्याय आपल्यापुढे आहे त्यामुळे फळे, कडधान्ये, सुका मेवा, आणि जास्तीत जास्त “व्हिटॅमिन सी” चे आहारात सेवन करणे गरजेचे आहे.

कोरोना आजारात सरकारने संचार बंदी लागू केली होती जेणेकरून हा विषाणू पसरला जाऊ नये. निमशहरी आणि शहरी भागात कोविड 19 सेंटर्स उभारून त्यावर कोरोना लागण झालेल्या व्यक्तींना उपचार देण्यात आले. सर्व स्तरांवर काळजी घेण्याची सूचना देण्यात आली. भारतात जवळजवळ चार महिने सर्व उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प पडून होते. रोजच्या लागणाऱ्या दैनंदिन वस्तू, सुविधा घरपोच पुरवल्या जात होत्या.

कोरोना काळात संपूर्ण जगभरात माणसांचे राहणीमान बदलले. खूप सारे लोक घरी बसून असल्याने विविध कला आणि मनोरंजन तसेच व्यायाम, योगा शिकण्यात व्यस्त होते. स्वयंरोजगार ही संकल्पना खूप लोकांनी अंगिकारली. कोरोना आजाराच्या सुरुवातीस संचार बंदी असताना पोलिस आणि डॉक्टर्स यांचा सहभाग आणि सहयोग हा खूपच बहुमूल्य होता.

कोरोना विषाणूवर लस शोधण्यात यश आले आहे. फायझर, मॉडर्ना, कोविशिल्ड, स्पूत्निक व्ही, कोवक्सिन अशा काही लसी 90 ते 95 टक्के प्रभावी आहेत. तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोणतीही लस ही 100 टक्के उपचार देणारी नाहीये. तरी सर्वत्र मान्यता मिळून योग्य प्रकारे सर्वांना लस मिळेपर्यंत योग्य काळजी घेऊन स्वतःला सशक्त बनवणेच योग्य मार्ग आहे.

तुम्हाला कोरोना निबंध (Corona Essay In Marathi) कसा वाटला? त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की आम्हाला कळवा. तसेच कोरोना निबंध आणखी काही keywords वापरून देखील नेटवर शोधला जातो. त्याचे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. त्यांचा तुम्ही नक्की वापर करा :

Corona Virus Essay for students
Covid – 19 Essay In Marathi
Corona Virus Marathi Nibandh
Corona Nibandh
Corona Marathi Essay
Corona disease Information In Marathi

The post कोरोना – मराठी निबंध | Corona Essay In Marathi | Covid 19 Essay | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/corona-essay-in-marathi/feed/ 3 1867