ऑक्टोपस Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 15 Feb 2020 14:28:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 ऑक्टोपस Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 Octopus Information In Marathi | अष्टपाद म्हणजेच ऑक्टोपसबद्दल संपूर्ण माहिती! https://dailymarathinews.com/octopus-information-in-marathi/ https://dailymarathinews.com/octopus-information-in-marathi/#respond Sat, 15 Feb 2020 14:28:43 +0000 https://dailymarathinews.com/?p=1408 मृदुकायकवची या वंशाचा “ऑक्टोपस” हा एक जलचर प्राणी आहे. ऑक्टोपसच्या जवळजवळ ५० प्रजाती आहेत. साधारणतः खोल पाण्यात हा प्राणी आढळतो. ऑक्टोपस लहानात लहान २.५ सेमी ...

Read moreOctopus Information In Marathi | अष्टपाद म्हणजेच ऑक्टोपसबद्दल संपूर्ण माहिती!

The post Octopus Information In Marathi | अष्टपाद म्हणजेच ऑक्टोपसबद्दल संपूर्ण माहिती! appeared first on Daily Marathi News.

]]>
मृदुकायकवची या वंशाचा “ऑक्टोपस” हा एक जलचर प्राणी आहे. ऑक्टोपसच्या जवळजवळ ५० प्रजाती आहेत. साधारणतः खोल पाण्यात हा प्राणी आढळतो. ऑक्टोपस लहानात लहान २.५ सेमी तर सर्वात जास्त ९.५ ते १० मी. एवढे उंच असतात. मराठीत याला अष्टपाद म्हणून ओळखतात. आठ पायांच्या या प्राण्याला तीन ह्रदये असतात आणि शरीरभर निळे रक्त असते. हे रक्त तीन ह्रदयांच्या मार्फत संपूर्ण शरीरभर फिरवले जाते.

ऑक्टोपस हा प्राणी स्वतःच्या आठ भुजांनी छोटे मासे, खेकडे, आणि विविध मांसल समुद्री प्राणी यांची शिकार करतो. कधीकधी स्वतःच्या बचावासाठी किंवा शिकारीसाठी हा प्राणी विषारी द्रव्य बाहेर सोडतो. शिकार करताना किंवा शिकार होताना या द्रव्याचा खूप उपयोग होतो. पुढच्या प्राण्याला नियंत्रणात ठेवण्याचे काम हे द्रव्य करते. अडचणीच्या ठिकाणी देखील असलेली शिकार करण्यासाठी आठ भुजांचा विकास झाला असावा अशी निष्कर्ष आहे. या प्राण्याचा जबडा पक्ष्यांच्या चोचीप्रमाणे असतो. भक्ष्य त्याच्या आठ भुजांमार्फत चोचीत पकडले जाते नंतर त्या भक्ष्याचा तो खात्मा करतो.

ऑक्टोपस हा प्राणी पळ काढण्यात खूप निपुण आहे. मोठे मासे जसे शार्क, डॉल्फिन आणि इल या ऑक्टोपसची शिकार करतात. अशावेळी वाचण्यासाठी तो एक विषारी काळे द्रव्य पिचकारी प्रमाणे बाहेर सोडतो ज्यामुळे शिकारी माश्याला काही दिसत नाही आणि ऑक्टोपस पळ काढण्यात यशस्वी होतो. अनेक वेळा त्याचे पाय म्हणजेच त्याच्या भुजा जर संकटसमयी तुटल्या तरी त्याचे शरीर त्या दोन भुजा पुन्हा निर्माण करते. हवेत जेट विमान जसे उडते त्याच पद्धतीने पाण्यात ऑक्टोपस पोहत असते.

ऑक्टोपस मादा दोन लाखाच्या वर अंडी देते. ज्यांचे संरक्षण करून त्यातून पिल्ले बाहेर काढणे असे महत्वाचे काम करीत असताना ती काहीच खात नाही. कदाचित कधीकधी पिल्ले बाहेर आल्यानंतर तिचा मृत्यूदेखील ओढवतो. ऑक्टोपस एकटे राहायला पसंत करतात. दिसायला थोडा विचित्र असणारा हा प्राणी निसर्गाची किमयाच आहे.

The post Octopus Information In Marathi | अष्टपाद म्हणजेच ऑक्टोपसबद्दल संपूर्ण माहिती! appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/octopus-information-in-marathi/feed/ 0 1408