इंटरनेट नसते तर मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 09 Dec 2021 03:54:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 इंटरनेट नसते तर मराठी निबंध Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 इंटरनेट नसते तर – मराठी निबंध | Internet Naste Tar Marathi Nibandh | https://dailymarathinews.com/internet-naste-tar-marathi-nibandh/ https://dailymarathinews.com/internet-naste-tar-marathi-nibandh/#respond Wed, 26 May 2021 04:30:53 +0000 https://dailymarathinews.com/?p=2305 सध्या इंटरनेट हे मोबाईल आणि संगणकासाठी अतिशय आवश्यक आहे. जगभरातील ज्ञान प्राप्तीचे आणि माहितीचे आदानप्रदान करण्याचे माध्यम म्हणजे इंटरनेट! हे इंटरनेट नसते तर… अशा कल्पनेचा ...

Read moreइंटरनेट नसते तर – मराठी निबंध | Internet Naste Tar Marathi Nibandh |

The post इंटरनेट नसते तर – मराठी निबंध | Internet Naste Tar Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
सध्या इंटरनेट हे मोबाईल आणि संगणकासाठी अतिशय आवश्यक आहे. जगभरातील ज्ञान प्राप्तीचे आणि माहितीचे आदानप्रदान करण्याचे माध्यम म्हणजे इंटरनेट! हे इंटरनेट नसते तर… अशा कल्पनेचा विस्तार इंटरनेट नसते तर या मराठी निबंधात (Internet Naste Tar Marathi Nibandh) करायचा असतो.

इंटरनेट नसते तर | Internet Naste Tar Essay In Marathi

सध्या मोबाईल आणि संगणकाचा वापर पाहता इंटरनेट आवश्यक आहेच. सर्व जगभरातील माहिती आणि ज्ञान इंटरनेटवर उपलब्ध आहेच. ही माहिती आपल्याला मिळालीच नाही तर… इंटरनेट नसतेच तर… असे विचार आजच माझ्या डोक्यात घुमू लागले कारण आजच माझ्या इंटरनेटची वैधता संपली होती.

इंटरनेट हे माध्यम सर्व व्यक्तींना जोडणारे माध्यम बनले आहे. तुमच्याकडे फक्त मोबाईल असायला हवा. तुम्ही जगातील कोठेही बसलेल्या व्यक्तीशी आणि नातेवाईकांशी संपर्क साधू शकता. इंटरनेट नसेल तर हे इंटरनेटचे फायदे आपल्याला मिळणार नाहीत.

इंटरनेट नसते तर आत्ता ज्या सुविधा आपल्याला सहज मिळत आहेत त्या मिळणार नाहीत. जसे की ऑनलाईन चॅटिंग, ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन शिक्षण आणि व्हिडिओ कॉलिंग आपण करू शकणार नाही. मोबाईलचा वापर हा फक्त संवाद साधण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी, आणि व्हिडिओ, फोटो पाहण्यासाठी होईल.

इंटरनेटमुळे आपल्याला काही समस्यादेखील निर्माण झालेल्या आहेत. मोबाईल व सोशल मीडियाचा गैरवापर होताना दिसतो. मुलं खूप वेळ फक्त मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असतात. त्यामुळे वास्तविक जगाशी त्यांचा संपर्क तुटत चालला आहे. इंटरनेटमुळे होणारे हे सर्व तोटे इंटरनेट नसल्याने आपल्याला होणार नाहीत.

आजचे मोबाईल आणि संगणक तंत्रज्ञान हे फक्त इंटरनेटमुळे अतिविकसित झाले आहे. विविध सॉफ्टवेअर्स आणि ऍप्लीकेशन्स निर्माण झालेले आहेत. त्या सर्वांचा वापर हा फक्त इंटरनेटमुळे शक्य झाला आहे. इंटरनेट नसेल तर तो वापर आणि सुविधा आपल्याला मिळणार नाहीत.

इंटरनेट बंद झाले तर किंवा इंटरनेट नसते तर आपल्याला आज एवढी माहिती उपलब्ध आहे ती मिळणार नाही. आजचा लोकांचा संवाद हा इंटरनेटवरच होत आहे. विविध देशांतील लोकांशी संवाद साधणे सहज शक्य आहे. तो संवादच नाहीसा होईल.

इंटरनेटमुळे शिक्षणात खूप प्रगती झालेली आहे. यूट्यूब, गूगल अशा माध्यमांद्वारे कोणत्याही क्षेत्रातील कोणताही प्रश्न व त्याचे उत्तर आपल्याला सहज मिळत आहे. ती उत्तरे आणि ज्ञान जर इंटरनेट नसते तर आपल्याला मिळाले नसते.

इंटरनेटमुळे संपूर्ण जग एका स्तरावर उपलब्ध झाले आहे खरे पण मनातील आणि नात्यातील दुरावा मात्र सहज जाणवतो. त्यामुळे इंटरनेट नसते तर खऱ्या वास्तविक अर्थाने लोक एकत्र येतील. एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतील. आजकाल इंटरनेट असल्याने सण-उत्सव हे ऑनलाईनच साजरे होत आहेत.

इंटरनेट असण्याचे जसे फायदे आणि तोटे आहेत तसेच इंटरनेट नसण्याचे देखील फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे इंटरनेटचा आपण कसा आणि किती वापर करतो तसेच त्याचे फायदे – तोटे जाणून, त्यानुसार आपण आपली जीवनशैली ठरवू शकतो. तोच एकमेव इंटरनेट वापराचा सुयोग्य मार्ग आहे.

म्हणजेच एकंदरीत विचार करता इंटरनेट नसते तर शिक्षण आणि ज्ञानात थोडी कमतरता जाणवली असती, पण लोक खऱ्या अर्थाने एकमेकांच्या जवळ आले असते. एकमेकांचा जिव्हाळा, स्नेह, संगत खरोखर मिळाली असती. कौटुंबिक नात्यांचे महत्त्व समजले असते. लोक निवांत पण एका खोल अर्थाने जगले असते.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला इंटरनेट नसते तर हा निबंध (Internet Naste Tar Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post इंटरनेट नसते तर – मराठी निबंध | Internet Naste Tar Marathi Nibandh | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/internet-naste-tar-marathi-nibandh/feed/ 0 2305