इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामना Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 03 Feb 2024 12:27:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामना Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत संपुष्टात – Ind vs Eng 2nd Test https://dailymarathinews.com/englands-first-test-253-runs-confirmed-ind-vs-eng-2nd-test/ https://dailymarathinews.com/englands-first-test-253-runs-confirmed-ind-vs-eng-2nd-test/#respond Sat, 03 Feb 2024 11:06:42 +0000 https://dailymarathinews.com/?p=6204 जसं की आपण सर्व जण जाणतो की इंग्लंडचे फलंदाज हे धडाकेबाज खेळी करत असतात. त्याचाच नमुना पुन्हा एकदा आजच्या डावात दिसून आला. क्रोली आणि डकेट ...

Read moreइंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत संपुष्टात – Ind vs Eng 2nd Test

The post इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत संपुष्टात – Ind vs Eng 2nd Test appeared first on Daily Marathi News.

]]>
जसं की आपण सर्व जण जाणतो की इंग्लंडचे फलंदाज हे धडाकेबाज खेळी करत असतात. त्याचाच नमुना पुन्हा एकदा आजच्या डावात दिसून आला. क्रोली आणि डकेट यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर ५९ धावसंख्येवर डकेट (२१) कुलदीप यादवचा शिकार ठरला.

इंग्लंडतर्फे क्रोलीने तुफान फटकेबाजी केली. त्याने अवघ्या ७८ चेंडूत ७६ धावा काढल्या. त्याचा अडथळा अक्षर पटेलने दूर केला. श्रेयस अय्यरने त्याचा झेल टिपला. इंग्लंडचा स्टार फलंदाज रूट (५) आणि त्यासोबत भन्नाट फॉर्ममध्ये असलेला पोप (२३) आणि बेयरस्टो (२५) या तिघांचा अडथळा जसप्रीतने दूर केला. 

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेले फोक्स (६) आणि रेहान (६) यांना कुलदीपने फिरकीच्या जाळ्यात अडकवले. रेहान बाद झाला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर १८२ – ७ असा होता. रेहान बाद झाल्यानंतर स्टोक्स आणि हार्टली यांनी आठव्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. पुन्हा एकदा जसप्रीत गोलंदाजीसाठी आला आणि त्याने स्टोक्स (४७), हार्टली (२१) व अँडरसन (६) यांचा अडथळा दूर केला.

जसप्रीत बूमराहने या सामन्यात सहा बळी टिपले आणि सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. इंग्लंड देखील पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारेल असे वाटले असतानाच भारताची गोलंदाजी मात्र अप्रतिम अशी झाली. त्यामध्ये बूमराह आणि कुलदीप यांनी मोलाचा वाटा उचलला.

भारताचा दुसरा डाव

इंग्लंडचा डाव आटोपल्यावर भारताच्या दुसऱ्या डावातील ५ षटकांचा खेळ झाला ज्यामध्ये भारताने बिनबाद २८ धावा बनवल्या.

The post इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत संपुष्टात – Ind vs Eng 2nd Test appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/englands-first-test-253-runs-confirmed-ind-vs-eng-2nd-test/feed/ 0 6204
भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर संपुष्टात https://dailymarathinews.com/indias-first-innings-was-confirmed-with-396-runs/ https://dailymarathinews.com/indias-first-innings-was-confirmed-with-396-runs/#respond Sat, 03 Feb 2024 08:41:26 +0000 https://dailymarathinews.com/?p=6201 जमेची बाजू म्हणजे यशस्वी जैस्वालने शानदार द्विशतक झळकावले. भारताच्या पहिल्या डावात ३९६ धावा झालेल्या आहेत.

The post भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर संपुष्टात appeared first on Daily Marathi News.

]]>
नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय यशस्वी जैस्वाल या उदयोन्मुख डावखुऱ्या फलंदाजाने रास्त ठरवला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय संघ सर्व बाद झाला खरा परंतु जमेची बाजू म्हणजे यशस्वी जैस्वालने शानदार द्विशतक झळकावले. भारताच्या पहिल्या डावात ३९६ धावा झालेल्या आहेत.

पहिल्या दिवशी भारताने ६ खेळाडूंच्या मोबदल्यात ३३६ धावा जमवल्या होत्या. त्या धावसंख्येवरून पुढे खेळाला सुरुवात झाली. जैस्वाल पहिल्या दिवशी १७९ धावांवर नाबाद खेळत होता. त्याने आज द्विशतक झळकावले आणि २९० चेंडूंचा सामना करत २०९ धावा पटकावल्या. 

आश्विन (२०) हा मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. त्यानंतर भारताची तळातील फलंदाजी लगेच बाद झाली आणि भारताला ३९६ धावांवर समाधान मानावे लागले. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असतानाही भारतीय फलंदाजी मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. 

संपूर्ण पहिल्या डावात फक्त यशस्वी जैस्वालचाच डंका वाजत होता. इंग्लंडतर्फे बशीर, अँडरसन आणि रेहान या गोलंदाजांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले तर हार्टलीने एक बळी टिपला.

The post भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर संपुष्टात appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/indias-first-innings-was-confirmed-with-396-runs/feed/ 0 6201