अशोका वृक्षाची माहिती Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sat, 12 Nov 2022 10:12:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 अशोका वृक्षाची माहिती Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 अशोक वृक्ष – मराठी माहिती – Ashok Vruksh Marathi Mahiti | https://dailymarathinews.com/ashoka-tree-information-ashok-vruksh-marathi-mahiti/ https://dailymarathinews.com/ashoka-tree-information-ashok-vruksh-marathi-mahiti/#respond Sat, 12 Nov 2022 00:41:03 +0000 https://dailymarathinews.com/?p=5115 अशोक वृक्षाचे वर्णन, त्याचे फायदे आणि उपयोग अशा विविध बाबींची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

The post अशोक वृक्ष – मराठी माहिती – Ashok Vruksh Marathi Mahiti | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा अशोक वृक्षाविषयी माहिती (Ashok Vruksh Marathi Mahiti) देणारा लेख आहे. अशोक वृक्षाचे वर्णन, त्याचे फायदे आणि उपयोग अशा विविध बाबींची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

अशोक झाडाची माहिती मराठी | Ashok Zadachi Mahiti Marathi |

अशोक झाड हे पुष्प, ताम्रपल्लव, पिंडपुष्प, गंध पुष्प अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या वृक्षाला मराठीमध्ये अशोका असे संबोधले जाते. तसेच त्याला शास्त्रीय भाषेत ‘सराका इंडिका’ या नावाने ओळखले जाते. हे वृक्ष मुख्यतः दक्षिण आणि पूर्व भारतात तसेच श्रीलंकेत आढळतात.

सीतामातेच्या सानिध्याने पवित्र झाल्यामुळे हिंदू धर्मामध्ये या वृक्षाला महत्व दिले जाते. त्यामुळे त्याला सीतेचा वृक्ष असेही म्हंटले जाते. गौतम बुद्धांचा जन्म या वृक्षाखाली झाल्याचे मानले जाते म्हणुन बुद्ध धर्मातही या वृक्षाला पवित्र मानले जाते.

मुख्यतः भारतात अशोका वृक्षाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे वृक्ष बारा महिने हिरवेगार असते. त्यामुळे या वृक्षाची गणना सदाहरित वृक्षामध्ये केली जाते. हे वृक्ष गर्द असतात त्यामुळे त्यांची सावली दाट असते. शक्यतो ही वृक्षे बागेत, शाळेच्या, कार्यालयाच्या तसेच मंदिरांच्या परिसरात पहावयास मिळतात.

अशोक वृक्ष – संरचना

अशोकाची वृक्षाची उंची साधारणतः सहा ते दहा मीटर असते. ही झाडे सरळ उंच वाढत जातात.

अशोक झाडाची पाने संयुक्त प्रकारची असून पंधरा ते वीस सेंटिमीटर लांबीची असतात.

अशोक वृक्षाची फुले मध्यम आकाराची असून त्यांचा रंग सहसा नारंगी किंवा नारंगी – पिवळा असतो.

अशोका वृक्षाला फळाच्या स्वरुपात चपट्या, लांबट गोलाकार आकाराच्या शेंगा असतात.

• अशोक वृक्ष – उपयोग

अशोकाचे लाकूड हलके पण मजबूत असते. त्यामुळे त्याचा उपयोग अनेक प्रकारच्या लाकडी वस्तू बनवण्यासाठी होतो.

अशोका झाडाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. या वृक्षाच्या सालीपासून ते फुलापर्यंत सगळ्या घटकांचा औषधी उपयोग होतो.

सालीमध्ये विविध प्रकारची खनिजे आणि सेंद्रिय घटक असतात. अशोकाच्या झाडाच्या सालीपासून बनवलेल चूर्ण हाडे बळकट करण्यासाठी वापरतात.

सालीची पेस्ट सांधेदुखीसाठी उपयुक्त ठरते. पोटदुखी, स्त्रीरोग, अतिसार, कृमी, सूज, जळजळ, पित्तदोष अशा विविध आजारांवर या वृक्षाच्या सालीपासून उपचार केला जातो.

तुम्हाला अशोक वृक्ष – मराठी माहिती (Ashok Vruksh Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post अशोक वृक्ष – मराठी माहिती – Ashok Vruksh Marathi Mahiti | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/ashoka-tree-information-ashok-vruksh-marathi-mahiti/feed/ 0 5115