अपरा एकादशी पूजन Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Wed, 25 May 2022 08:17:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 अपरा एकादशी पूजन Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 अपरा एकादशी – मराठी माहिती | Apara Ekadashi Marathi Mahiti | https://dailymarathinews.com/apara-ekadashi-mahiti-marathi/ https://dailymarathinews.com/apara-ekadashi-mahiti-marathi/#respond Wed, 25 May 2022 07:42:39 +0000 https://dailymarathinews.com/?p=3953 या लेखात अपरा एकदशीचे महत्त्व आणि ती कशी साजरी केली जाते याविषयी संपूर्ण विश्लेषण करण्यात आलेले आहे.

The post अपरा एकादशी – मराठी माहिती | Apara Ekadashi Marathi Mahiti | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा अपरा एकादशी (Apara Ekadashi information in Marathi) या दिनावर आधारित मराठी माहिती आहे. या लेखात अपरा एकदशीचे महत्त्व आणि ती कशी साजरी केली जाते याविषयी संपूर्ण विश्लेषण करण्यात आलेले आहे.

अपरा एकादशी २०२२ – Apara Ekadashi 2022

• प्रत्येक एकादशीस वेगवेगळे विधी आणि विविध देवांची पूजा केली जाते. एकादशीस विशेषकरून उपवास पकडला जातो ज्यामध्ये कोणत्याही एका दैवी शक्तीची उपासना करण्यात येते. त्यामुळे प्रत्येक एकादशीचे नाव आणि महत्त्व वेगवेगळे असते.

• वैशाख कृष्ण एकादशीला अपरा एकादशी असे संबोधले जाते. अपरा एकादशीला श्रीविष्णू देवाची पूजा केली जाते. जीवनातील विघ्ने दूर करण्यासाठी श्री विष्णुंचे पूजन केले जाते अशी मान्यता आहे.

• भगवान विष्णु हे सृष्टीचे पालनकर्ता आहेत. त्यांची पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी नांदते असे मानले जाते.

अपरा एकादशी २०२२ कधी आहे?

या वर्षी गुरुवार, दिनांक २६ मे २०२२ रोजी अपरा एकादशी आहे.

एकादशी प्रारंभ – २५ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजून ३२ मिनिटे.

एकादशी समाप्ती – २६ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजून ५४ मिनिटे.

टीप – भारतात सूर्योदयाची तिथी मानली जात असल्याने अपरा एकादशी २६ मे रोजी साजरी केली जाणार आहे.

अपरा एकादशीचे कार्य / व्रत –

• अपरा एकादशीला लोक जागरण करतात. भजन – कीर्तन केले जाते. सकाळी स्नानादी क्रिया उरकून भगवान विष्णूंचे अधिष्ठान मांडले जाते. त्यामध्ये त्यांच्या विशेषतः वामन अवताराची पूजा केली जाते. आपण पूर्ण करू शकतो असा एखादा संकल्प केला जातो अथवा व्रत पकडले जाते.

• व्रत काळात अपशब्द बोलणे टाळावे. भगवंताचा सहवास करावा. मौन धारण केल्यास अतिउत्तम असेल.

• अपरा एकादशीला केल्या जाणाऱ्या गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे.

• अपरा एकादशीला त्याग व समर्पणाची भावना जोपासली जाते. त्यामुळे पुरुष व स्त्रिया या दोघांसाठी देखील या एकादशीला अध्यात्मिक मूल्य असते.

अपरा एकादशीचे पूजन –

नियमित कामे आटोपल्यानंतर श्री विष्णुंची पूजा सुरू करावी. श्री विष्णुंचे आवाहन केल्यानंतर त्यांच्या मूर्तीची अथवा प्रतिमेची स्थापना करावी. नैवेद्य म्हणून पंचामृत ठेवावे. त्यानंतर अक्षता, गंध, तुळशीची पाने, पाच पालवी, फुले – फळे अर्पण करावीत. त्यानंतर धूप – दीप लावून ठेवावे आणि आरतीस सुरुवात करावी. आरती संपल्यानंतर नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटप करावे.

तुम्हाला अपरा एकादशी – मराठी माहिती (Apara Ekadashi Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post अपरा एकादशी – मराठी माहिती | Apara Ekadashi Marathi Mahiti | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/apara-ekadashi-mahiti-marathi/feed/ 0 3953