अक्रोड खाण्याचे फायदे Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Sun, 27 Nov 2022 00:06:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 अक्रोड खाण्याचे फायदे Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 अक्रोड खाण्याचे फायदे – माहित आहेत का? https://dailymarathinews.com/akrod-khanayache-fayde/ https://dailymarathinews.com/akrod-khanayache-fayde/#respond Fri, 25 Nov 2022 04:14:06 +0000 https://dailymarathinews.com/?p=5151 अक्रोड खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. अक्रोड खाल्ल्याने शरीरातील सर्व जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघत असते.

The post अक्रोड खाण्याचे फायदे – माहित आहेत का? appeared first on Daily Marathi News.

]]>
• अक्रोड खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. अक्रोड खाल्ल्याने शरीरातील सर्व जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघत असते.

• प्रस्तुत लेख हा अक्रोड खाण्याचे काय फायदे आहेत याविषयी माहिती देणारा लेख आहे. तुम्ही संपूर्ण लेख वाचला तर नक्कीच तुम्हाला फायदेशीर माहिती जाणून घेता येईल.

अक्रोड खाण्याचे फायदे – Health Benefits of walnuts in Marathi

१) अक्रोडमध्ये मेंदूला गती देणारे सर्व प्रकारचे घटक असल्याने अक्रोड सेवनाने आपल्या मेंदूला चालना मिळते. आपली स्मरणशक्ती चांगली बनते.

२) थायरॉईडची समस्या असणाऱ्या लोकांना अक्रोड खाणे ही फायदेशीर गोष्ट आहे.

३) अक्रोडमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, मॅग्नेशियम, ओमेगा 3 फॅटी एसिड असे घटक असतात. त्यामुळे शारिरीक झीज देखील भरून निघत असते.

४) अक्रोडमध्ये पॉलीफेनॉल इलाजिटानिन्स हे घटक आढळतात जे तुम्हाला कॅन्सर होण्यापासून वाचवतात.

५) अक्रोड रिकाम्या पोटी सेवन केल्याने मधुमेहाचा धोका टाळता येतो.

६) अक्रोडमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने अक्रोड सेवन करणाऱ्याचे वजन नियंत्रणात राहते.

७) सुका मेवा (dryfruits) या प्रकारात अक्रोडचा समावेश होत असतो. त्यामुळे त्याचे पचन व्यवस्थित होते आणि अक्रोड नियमित सेवन केल्यास कोणताच शारिरीक धोका उद्भवत नाही.

८) अक्रोडमध्ये ओमेगा 3 हे फॅटी एसिड असल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राहते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते व परिणामी ह्रदयाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.

९) अक्रोडमध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिडमुळे हाडांचे आणि दातांचे आरोग्य सुधारते तसेच शारिरीक ऊर्जा सुद्धा वाढते.

१०) अक्रोडमध्ये प्रथिने आणि खनिजांचा समावेश असल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहते.

तुम्हाला अक्रोड खाण्याचे फायदे (Akrod Khanyache Fayde) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post अक्रोड खाण्याचे फायदे – माहित आहेत का? appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/akrod-khanayache-fayde/feed/ 0 5151