Water Chestnut in marathi | शिंगाडा – आहार मूल्ये आणि उपयोग !

शास्त्रीय नाव: इलेओकरिस डल्सिस ( Eleocharis dulcis )

शिंगाडा (water chestnut) ही आशिया खंडात प्रामुख्याने आढळणारी वनस्पती आहे. ही एक पाणथळ जागेत वाढणारी तृण वनस्पती आहे. या वनस्पतीचे कंद खाद्य म्हणून वापरले जाते. किंचितसे गोड असे गरयुक्त असे हे फळ असते. शिंगाडा अनेक पौष्टिक मूल्यांची कमतरता भरून काढतो. शिंगाड्यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. त्याची शेती उत्तर भारतात व विदर्भात मोठ्या प्रमाणावर केली जाते. मध्यप्रदेशात देखील याची शेती केली जाते.

Water chestnut as food
खाद्य म्हणून उपयोग –

शिंगाड्याचे कंद महाराष्ट्रात उपवासात खाल्ले जातात. कंद असल्याने त्यांना उकडून खाल्ले जाते. तसेच पीठ देखील बनवले जाते. या पिठापासून अनेक रेसिपीज बनवल्या जातात. हा कंद आपण कच्चा, भाजून किंवा उकडून खाऊ शकतो. शिंगाड्याच्या पिठापासून लाडू, रवा, उपिट, चिप्स असे नानाविध खाद्य प्रकार बनवले जातात.

Water Chestnut benefits
शिंगाडा खाण्याचे फायदे व औषधी गुणधर्म :

आयुर्वेदात याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. आयुर्वेदात पित्तशामक आणि शक्तिवर्धक अशी विशेषणे यासाठी वापरली गेलेली आहेत. याचप्रमाणे मुत्रासंबंधी कुठल्या व्याधी किंवा त्रास असल्यास शिंगाडा उपयुक्त ठरतो. शरीरातील सूज आणि अति रक्तस्राव शिंगाडा कमी करू शकतो.

अत्यंत कमी कॅलरीज आणि फॅट्स असणारा शिंगाडा खूप साऱ्या आजारांत उपयोगी आहे. शरीरातील पाण्याची व जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढत असल्याने त्याचा उपयोग डीटॉक्सीफिकेशन मध्ये केला जातो.

उष्णतेचा दाह कमी होऊ शकतो त्यामुळे याचे सेवन उन्हाळ्यात नियमित करावे. तसेच डोळ्यांची जळजळ, त्वचाविकार, हातापायांची आग यामध्येदेखील शिंगाडा गुणकारी आहे.

शिंगाडा सेवनाने संसर्गजन्य रोग होत नाहीत. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

अगोदर सांगितल्याप्रमाणे त्वचा आरोग्य राखले जाते. त्यामुळे अनेक त्वचाविकार व त्याच्या औषधांमध्ये शिंगाड्याचा वापर केला जातो.

शिंगाडा सेवनाने सगळी जीवनसत्त्वे पूर्ण होत असल्याने केस अकाली पांढरे होत नाहीत. केसांच्या आरोग्यासाठी देखील उत्तम आहे.

पोटॅशियम आणि आयोडिन चे प्रमाण जास्त असल्याने वजन व शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मज्जासंस्था आणि मांसपेशी बळकट होतात.

एका प्रयोगानंतर असे आढळले की शिंगाड्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे त्वचा, थायरॉईड, फुफ्फुस आणि हाडांच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ दडपण्यास मदत झाली.

खेळाडू व कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी हा उपयुक्त असा आहार आहे.

गर्भवती महिलांनी तर जरूर याचे सेवन करावे. अतिरिक्त पौष्टिक मूल्ये बाळाच्या विकासासाठी कारणीभूत ठरतात.

अनेक आयुर्वेदीक कल्प, बुटी व रसायन यामध्ये शिंगाडा असतो. शरीराची कांती उजळण्याचे काम शिंगाड्यामार्फत होते.

अनेक आजारांमध्ये शरीराची झीज होते. ती झीज भरून काढण्याचे काम शिंगाडा करतो.

असा हा शिंगाडा खूप आयुर्वेदिक, औषधी गुणधर्म असणारा आहे. याचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. तसेच वेगवेगळ्या प्रकारे रेसिपीज बनवून शिंगाडा आणखीनच स्वादिष्ट बनवू शकता.