कडुलिंबाच्या पानांचे आश्चर्यकारक ५ फायदे! Neem Leaves Benefits In Marathi |

प्रस्तुत लेख हा आरोग्य संदर्भात आहे. कडुलिंबाच्या पानांचे फायदे (Benefits of Neem) या लेखात सांगण्यात आलेले आहेत. कडुलिंबाची पाने अत्यंत आरोग्यदायी आणि रोगनाशक आहेत. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरात एक नवीनच ऊर्जा संचारते. शरीरातील सर्व विषारी घटक बाहेर फेकले जातात. म्हणजेच शरीराची आतून शुद्धी करण्याचे काम कडुलिंबाची पाने करत असतात.

जाणून घ्या कडुलिंबाच्या पानांचे फायदे! Neem Benefits In Marathi |

कडुलिंबाच्या झाडाचा प्रत्येक घटक मानवी आरोग्याच्या समस्यांवर उपयोगी आहे. भारतीय आयुर्वेदात देखील कडुलिंबाचे वर्णन आढळते. जळजळ, दाह, त्वचा विकार, ऊर्जेची कमतरता, मुख दुर्गंधी, पोटाचे विकार अशा अनेक समस्यांवर कडुलिंब उपयोगी आहे.

१. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

आजार होऊच नये त्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असावी लागते. ती वाढवण्यासाठी आणि विषाणूंचा शरीरात होणारा संसर्ग रोखण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस प्यावा. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने कर्करोग, हृदयविकार, तसेच तापाचे विविध आजार यांना आपण सहज दूर ठेवू शकतो.

२. डोळ्यांचे विकार

कडुलिंब चघळल्याने डोळ्यांचे विकार दूर होऊन दृष्टी सुधारते. कडुलिंबाची पाने गरम पाण्यात उकळवून ते पाणी थंड करा. त्या थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. डोळ्यांना अतिरिक्त थकवा किंवा लालसरपणा आल्यास दूर होतो.

३. त्वचा विकार –

त्वचा विकाराची सुरुवात ही अशुद्ध रक्तामुळे होत असते. कडुलिंब हा त्वचा विकारांवर जालीम उपाय आहे. अशुद्ध रक्त शुद्ध करून रक्तप्रवाह सुरळीत करण्याचे काम कडुलिंबाची पाने करतात. त्यासाठी दररोज २ ते ३ पानांचे सेवन नक्की करावे. तुम्ही कितीतरी सौंदर्य प्रसाधने पाहिली असतील ज्यामध्ये कडुलिंबाची पाने वापरलेली असतात.

४. पचनक्रिया सुधारते.

कडूलिंबाची पाने आपल्या यकृतासाठी उपयोगी आहेत. पोटाच्या आरोग्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस प्यावा. पचनक्रिया आपोआप सुधारते. अतिरिक्त विषारी घटकांचा समूळ नायनाट होतो आणि पोट साफ राहते.

५. केसांचे आरोग्य सुधारते.

निरोगी पेशींची निर्मिती करण्यास कडुलिंब सहाय्यक आहे. त्यामुळे डोक्यावरील केसांच्या मुळांशी रुक्षपणा येत नाही आणि केसांची वाढ चांगली होते. पूर्वी पाण्यात कडुलिंबाची पाने उकळवून त्या पाण्याने डोके धुतले जायचे. केसातील कोंडा, रुक्षपणा त्यामुळे दूर होत असे.

या लेखात कडुलिंबाच्या पानांचे फायदे (Benefits of Neem leaves) सांगण्यात आलेले आहेत. फायदे आहेत म्हणून सरळसरळ पानांचे सेवन करणे टाळावे. हा लेख म्हणजे संदर्भ लिखाण असल्याने तुमचे शरीर स्वास्थ्य पाहून कडुलिंबाची पाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी.

Leave a Comment