नदीची आत्मकथा – मराठी निबंध | Nadichi Atmakatha Essay in Marathi

नदीची आत्मकथा (Nadichi Atmkatha Marathi Nibandh) हा विषय निबंध लेखनासाठी विद्यार्थ्यांना दिला जातो. नदी काही बोलू शकत नाही, परंतु नदी बोलू लागली आणि तिने स्वतःची आत्मकथा सांगितली तर ती आत्मकथा कशी असेल, असा आशय नदीची आत्मकथा किंवा नदीचे आत्मवृत्त या निबंधात स्पष्ट करायचा असतो.

Nadichi Atmkatha – Marathi Nibandh | नदीची आत्मकथा निबंध मराठी |

माझे हितगुज आणि अडीअडचणी मी नदीला सांगत असतो. कारण मला असे वाटते की नदी शांतपणे सर्व ऐकून घेत असते. अशा नदीकिनारी मी बसलो असतानाच कुठून तरी आवाज आला. नमस्ते! असे म्हणत कोणतरी बोलले परंतु शेजारी कोणीच नसल्याने मी अगोदर घाबरलो. ‘ मी वंदिता नदी ‘ असे म्हणत नदीच माझ्याबरोबर बोलू लागली होती.

तू माझ्याबरोबर सारखा बोलत असतोस त्यामुळे मी देखील माझी आत्मकथा आज सांगणार आहे. तुझे मन साफ आहे तू माझी भावना समजून घेशील अशी आशा करते आणि माझे दुःख दूर करण्यासाठी नक्की प्रयत्न करशील, असे मला वाटते.

मी जवळजवळ सहाशे वर्ष झाली इथून वाहत आहे. माझा आकार लहान असला तरी माझा उगम आणि वाहणे सतत आहे. सह्याद्रीच्या डोंगररागांमध्ये माझा उगम आहे. तेथून वाहत येत मी कृष्णा नदीला मिळते. पूर्वी घडलेल्या या विभागातल्या सर्व कथा आणि इतिहास मी जाणून आहे. माणसाच्या मनात निसर्गाबद्दल असलेली असूया कमी होत चालली आहे त्यामुळे मला तुझ्याशी आज बोलायचे आहे. 

जेवढी गावे माझ्या किनाऱ्यावर वसलेली आहेत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पूर्वी जरी शेती हा उपजीविकेचा मार्ग असला तरी लोकसंख्या कमी असल्याने माझे पाणी प्रमाणात आणि योग्य प्रकारे वापरले जायचे. निसर्गाकडून मला सतत वरदान मिळत आले आहे. माझे पाणी वर्षभर आटत नव्हते. 

पावसाळ्यात इतका पाऊस पडायचा की सर्व प्राणी मात्रा आणि झाडे हुरळून जायची. हिरवी शाल पांघरावी अशी काही या परिसराची अवस्था व्हायची. माझे पाणी दुथडी भरून वाहत असे. या सहाशे वर्षात मी तब्बल नऊ वेळा दुष्काळाचा सामना केलेला आहे. परंतु निसर्गाची साथ होती आणि मानवी कृत्ये निसर्गाविरोधात नव्हती. 

आत्ता माझे पाणी बघतोयस किती कमी आहे. अजुन तर उन्हाळापण सुरू नाही झाला. उन्हाळयात माझे सर्व पाणी आटून जाते. पूर्वी धरण बांधण्याच्या अगोदर असे कधी होत नव्हते. मानवी विकास म्हणून तुमच्या अहंकार आणि स्वार्थासाठी तुम्ही माझा आणि अनेक नद्यांचा प्रवाह रोखला अशाने धरणाशेजारी मी डबके म्हणून जिवंत आहे. 

माझ्या शेजारी जी गावे आहेत त्यांनी आधुनिक शेती करून स्वतःचा विकास करवून घेतला परंतु माझे हाल पाहिलेत का? माझे पाणी नुसते उपसून हव्यासापोटी शेती सुरू झाली आहे. कष्टाचे आणि निसर्गाचे महत्व आज कोणी जाणत नाही. फक्त खोटी श्रीमंती मिळवण्यासाठी माझे पाणी पाटबंधारे आणि नाल्यांद्वारे इकडे तिकडे फिरवण्यात आले. परंतु माझा नैसर्गिक प्रवाह आणि नैसर्गिक पावसाचे चक्र यात बाधा आणली. 

वाहणारे पाणीच स्वच्छ असते. त्यामुळे मला वाहू द्या. मी वाहल्यावर माझे उद्दिष्ट पूर्ण होत जाईल. लोकसंख्या वाढ आणि जलप्रदूषण या गंभीर दोन समस्या आहेत ज्यामुळे माझे आणि पर्यायाने निसर्गाचे, या धरतीमातेचे नुकसान होत आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे कचरा वाढला. सुयोग्य व्यवस्थापन नसल्यामुळे सर्व कचरा आणि रसायने माझ्यात मिसळली जाऊ लागली. माझा प्रवाह रोखल्यामुळे आणि जलप्रदूषण झाल्यामुळे मी दूषित झाले आहे. 

पूर्वी माझे पाणी प्यायले जायचे. सर्व ठिकाणी पवित्र मानले जायचे पण आता बघ या पाण्याकडे! पिशील का तू? अशा पाण्यामुळे अनेक जंतू निर्माण होतात. रोग येतात. तुम्हालाच त्याचा त्रास होतो. असा त्रास सहन करायचा नसेल तर पाणी वाहू द्या. कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करा. लोकसंख्या आटोक्यात आणा. 

मी जे काही सांगितले त्याचा विचार कर. योग्य दिशेने पाऊल ठेव. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी घे. पाणी हेच जीवन आहे. असे पाणी प्रदूषित होऊ देऊ नकोस. जेव्हा गरज असेल तेव्हा मी तुझ्याशी पुन्हा बोलेनच!

नदीची आत्मकथा निबंध क्र. 2 | Nadichi Atmkatha Essay No. 2

आमच्या गावाच्या शेजारूनच “रेवती” नावाची एक नदी वाहते. सुट्टीत दररोज आम्ही त्या नदीत पोहायला जात असतो. एके दिवशी दुपारी पोहून झाल्यावर बाहेर येताना अचानक मला कोणाचा तरी आवाज आला, “थांब!” थोड्या वेळाने मला समजले की चक्क नदीच माझ्याशी बोलू पाहत आहे. नदीने आता तिची आत्मकथा सांगायला सुरुवात केली होती.

मी रेवती, माझा उगम लगबग एक हजार वर्षांपूर्वी झालेला आहे. मी या परिसरातील मानवाच्या अनेक पिढ्या बघितलेल्या आहेत तसेच नैसर्गिक बदलही अनुभवलेले आहेत. माझे पात्र हे काळानुसार वाढतच गेलेलं आहे. सध्या मी जवळजवळ पाचशे किलोमीटरचा प्रवास करून समुद्राला जाऊन मिळते.

मी ज्या ज्या ठिकाणाहून वाहत जाते तेथील लोकांना माझा उपयोग शेतीसाठी आणि पिण्यासाठी होत असतो. प्राणी – पक्षी व इतर सजीव देखील पाण्याच्या गरजेमुळे माझ्या सहवासात येत असतात. गुरे चरून झाल्यावर पाणी पिण्यासाठी माझ्याजवळ येतात. झाडांच्या विविध प्रजाती माझ्या प्रवाहामुळे माझ्या भोवतीने वाढत जातात.

पाण्याचे फायदे व गरज सर्वज्ञात असल्याने माझी काळजी सर्वजण करू लागलेले आहेत. माझ्यातील पाणी प्रदूषित होऊ न देणे व ते स्वच्छ स्वरूपात वापरता येण्यासाठी मनुष्य सध्या झगडत आहे. कचरा व्यवस्थापन व्यवस्थित नसल्याने मनुष्य घरातील आणि परिसरातील सर्व कचरा माझ्या पात्रात टाकून देत आहे.

सध्याच्या काळात नदीचे शुद्धीकरण ही देखील आवश्यक बाब बनलेली आहे. माझे शुद्धीकरण हे मी प्रवाहित असताना नैसर्गिकरित्या होत असते परंतु सध्या तरी माझ्या प्रवाहात अडथळे आणले जात आहेत. धरणे बांधून माझी गती रोखली जाते. त्यानंतर धरणातील पाणीसाठा उपयोगात आणला जातो परंतु माझे वेळेतच समुद्रास जाऊन मिळणे आता अशक्य झालेले आहे.

माझ्या पात्रातील पाणी पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असते तर उन्हाळ्यात मात्र काही ठिकाणी मी कोरडी पडलेली असते. त्याव्यतिरिक्त माझ्यातील पाणी हे मानवी कृत्यांमुळे दूषित होत आहे. माझ्यातील पाणी दूषित झाल्याने मला स्वच्छ राहून वाहता येत नाही. त्यामुळे जलप्रदूषण ही समस्या मानवाला घातक ठरतेच आहे.

मी जर स्वच्छ राहून वाहिले तर मानवाला त्याचा फायदा होईलच आणि अस्वच्छ झाले तर मानव व इतर सजीवसृष्टी त्याचे परिणाम भोगतील. मी जर अस्वच्छ राहून समुद्राला मिळाले तर समुद्रही दूषित होईल तसेच शेतीसाठी माझे पाणी वापरले गेले तर पिके आणि माती दूषित होतील.

मानवी दुष्कृत्ये व माणसाच्या जगण्यातील अराजकता यांमुळे मला होत असलेला त्रास मी आज तुझ्याजवळ व्यक्त केला. तरी माझी व्यथा आणि मानवी गरज ओळखून माझ्याप्रती थोडासा जागरूक राहा कारण आपल्या देशात नदीला आईप्रमाणे मानले जाते. तिचा प्रवाह रोखणे किंवा तिला दूषित करणे हे कधीच मानवाला हितकारक ठरणार नाही.

तुम्हाला नदीची आत्मकथा हा मराठी निबंध (Nadichi Atmkatha Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

2 thoughts on “नदीची आत्मकथा – मराठी निबंध | Nadichi Atmakatha Essay in Marathi”

Leave a Comment