चंद्रग्रहण – मराठी माहिती | Chandragrahan Mahiti Marathi

प्रस्तुत लेख हा खग्रास चंद्रग्रहण (Khagras Chandragrahan Mahiti Marathi) या विषयावर मराठी माहिती देणारा लेख आहे. चंद्रग्रहण म्हणजे काय आणि त्याचे प्रकार या मुद्द्यांची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

चंद्रग्रहण म्हणजे काय | Chandragrahan mhanje kay

• पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती सुद्धा प्रदक्षिणा घालत असते. तर चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो.

• प्रदक्षिणा होत असताना अनेकवेळा दोन स्थिती संभवतात. कधीकधी सूर्य – पृथ्वी आणि चंद्र हे एका रेषेत येतात किंवा सूर्य – चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत येत असतात. म्हणजेच सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते किंवा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो.

• सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र किंवा अन्य ग्रह आल्यास सूर्यग्रहण होत असते तर सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी आल्यास चंद्रग्रहण होत असते.

• चंद्र पृथ्वीमुळे किती झाकोळला गेला यावरून चंद्रग्रहणाचे खग्रास, खंडग्रास व उपछाया (छायाकल्प) असे प्रकार ठरवण्यात आलेले आहेत.

• चंद्र हा पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत आला असल्यास खग्रास चंद्रग्रहण होते. याउलट चंद्राचा काही भाग सावलीखाली आणि काही भाग उघडा असल्यास खंडग्रास चंद्रग्रहण होत असते. चंद्र पृथ्वीच्या विरळ सावलीत असल्यास त्याला ‘छायाकल्प चंद्रग्रहण’ म्हणतात.

• पौर्णिमेशिवाय चंद्रग्रहण होऊच शकत नाही म्हणजेच चंद्रग्रहण जेव्हा असते त्यावेळी पौर्णिमा देखील असतेच. परंतु प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण असतेच असे नाही.

खग्रास चंद्रग्रहण – Khagras Chandragrahan mhanje kay

• खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १ तास ४२ मिनिटे किंवा १ तास ४४ मिनिटे असतो. खग्रास चंद्रग्रहण दुर्मिळ आहे. ते दोन वर्षांच्या अंतराने घडते. मात्र खंडग्रास चंद्रग्रहण वर्षातून दोन वेळा दिसू शकते.

तुम्हाला खग्रास चंद्रग्रहण – मराठी माहिती (Khagras Chandragrahan Mahiti Marathi) हा लेख आवडल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment