किंडल बुक – मराठी माहिती | Amazon Kindle Book in Marathi

प्रस्तुत लेख हा अमेझॉन किंडल बुक (Amazon Kindle Book meaning in Marathi) विषयी मराठी माहिती आहे. यामध्ये किंडल बुक म्हणजे काय, किंडल बुकचे फायदे, उपयोग आणि तोटे अशा सर्व बाबींची चर्चा करण्यात आलेली आहे.

अमेझॉन किंडल बुक म्हणजे काय? Amazon Kindle Book meaning in Marathi

अमेझॉन किंडल बुक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. टॅब्लेट सारखे दिसणारे हे उपकरण फक्त पुस्तकाच्या वाचनासाठी बनवण्यात आलेले आहे. याच्या मदतीने आपण E-books वाचू शकतो. किंडल बुक हे अमेझॉन कंपनीचे उपकरण आहे. यामध्ये आपण पुस्तके साठवून देखील ठेवू शकतो.

पूर्वी पुस्तके विकत घेणे किंवा वाचनालयात जाऊन ती वाचणे असे काहीसे वातावरण असायचे. सध्यादेखील बहुतांश ठिकाणी हीच गोष्ट आढळते. एका नवीन पुस्तकाच्या वाचनासाठी तर कित्येक दिवस वाट पाहावी लागत असे. आज तंत्रज्ञानाच्या युगात तसे नाहीये.

सध्या प्रत्येक वस्तू ऑनलाईन उपलब्ध आहे आणि त्याची ऑनलाईन खरेदी – विक्री सुद्धा होत आहे. तसेच पुस्तकाचे प्रकाशन देखील ऑनलाईन होत आहे आणि विक्रीसुद्धा ऑनलाईनच होत आहे. त्यामुळे आपण आपल्या मोबाईल, टॅब्लेटमध्ये अशी पुस्तके साठवून ठेवू शकतो. ही पुस्तके pdf स्वरूपात असतात.

आपला मोबाईल हा असंख्य ऍप्सनी साठलेला असतो. त्यामध्ये पुस्तक वाचन हा अनुभव काही सुखद स्वरूपाचा नसतो. त्यामुळे वाचनाची गरज ओळखून आणि खऱ्या वाचक रसिकांसाठी अमेझॉन कंपनीने किंडल हे उपकरण तयार केले. ज्यामध्ये आपण एका पुस्तकालयात गेल्यासारखा अनुभव घेत असतो.

किंडल अनलिमिटेड म्हणजे काय? What is Kindle Unlimited in Marathi

किंडलवर उपलब्ध असणारी जगभरातील सर्व पुस्तके आपल्याला पुस्तकाचे मूल्य न भरता वाचता येऊ शकतात. पुस्तक वाचनासाठी कोणतीही मर्यादा त्यासाठी नसते. परंतु त्यासाठी Kindle Unlimited चे सदस्य व्हावे लागते. हे सदस्यत्व स्विकारण्यासाठी प्रत्येक महिन्याला काही शुल्क भरावे लागते. सर्व पुस्तके ebook, pdf, audiobook अशा स्वरूपात असू शकतात.

किंडल इडिशन म्हणजे काय? What is Kindle Edition in Marathi

Amazon Kindle Edition म्हणजे किंडलसाठी तयार केलेली पुस्तकाची आवृत्ती होय. किंडल या उपकरणासाठी अत्यंत उपयुक्त आणि सहजरीत्या हाताळता येणारी काही पुस्तके तयार केली जातात. त्यांना “किंडल इडिशन बुक्स” असे म्हणतात.

किंडल बुक वापराचे फायदे –

• एखाद्या ग्रंथालयात जाणे आणि तेथील सदस्य होणे आणि ठरलेल्या वेळेतच वाचन करणे, या प्रक्रियेसाठी खर्च होणारा वेळ आणि पैसा खूपच होता.

• सध्या तंत्रज्ञान आणि विशेषकरून किंडल वापरल्याने पुस्तक वाचनाचा अनुभव अत्यंत सुखद आहे. वेळ, पैसा आणि ऊर्जा यांची खूपच बचत होते. पुस्तकांच्या मूळ किंमतीपेक्षा अत्यंत स्वस्त मुल्यात आपल्याला पुस्तके मिळू शकतात.

• जगभरातील सर्व प्रसिद्ध पुस्तके ही ऑडियो आणि पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असतात त्यामुळे पुस्तकांची कागदी प्रत बाळगणे गरजेचे नसते. तसेच आपल्याला हवे असणारे पुस्तक बाजारात उपलब्ध नसेल पण किंडलवर ते मिळू शकते.

• किंडल बुक तुमच्याजवळ असल्याने तुम्हाला कोणतेही पुस्तक सांभाळण्याची गरज नाही. याशिवाय संपूर्ण ग्रंथालयच तुम्ही तुमच्या सोबत बाळगत आहात. शिवाय अशी देखील पुस्तके असतात जी मुफ्त असतात किंवा त्याचे मूल्य अत्यंत कमी असते.

• एखादे पुस्तक दुकानात जाऊन विकत घेणे ही बाबच आता नाहीशी झालेली आहे. पुस्तक ऑनलाईन प्रदर्शित झाले की लगेच आपण ते काही क्षणातच विकत घेऊन वाचू शकत असल्याने किंडलचा वापर वाढला आहे.

• किंडलमध्ये पुस्तकांव्यतिरिक्त अन्य स्वरूपाची ऍप्स, नोटीफिकेशन नसतात. त्यामुळे आपले शांततेत वाचन होऊ शकते.

किंडल बुक वापराचे तोटे –

• किंडल हे उपकरण इलेक्ट्रॉनिक असल्याने त्याचा सातत्यपूर्ण वापर हा आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो. मेंदू आणि डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता असते.

• प्रकाशित केलेले कागदी पुस्तक हे आपण सातत्याने तासनतास वाचू शकतो. त्यामुळे आरोग्याला कोणताही धोका नसतो.

• इलेक्ट्रॉनिक उपकरणे कोणत्याही कारणाने बिघडली तर तोटा सहन करावा लागतोच.

तुम्हाला अमेझॉन किंडल बुक – मराठी माहिती  (Amazon Kindle Book Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment