फाटक्या पुस्तकाची आत्मकथा – मराठी निबंध | Fatakya Pustakachi Atmkatha Nibandh |

प्रस्तुत लेख हा फाटक्या पुस्तकाची आत्मकथा (Fatakya Pustakachi Atmkatha Nibandh Marathi) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात एका जुन्या, फाटक्या पुस्तकाचे अनुभव सांगण्यात आलेले आहेत. पुस्तकाला वाटणाऱ्या भावना व विचार व्यक्त करण्यात आलेले आहेत.

फाटक्या पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी | Fatakya Pustakachi Atmkatha Nibandh Marathi |

मी एक प्रेरणादायी पुस्तक आहे. माझे प्रकाशन वीस वर्षांपूर्वी झाले होते. सुरुवातीला मी नवीन असल्याने आणि ग्रंथालयात वाचनासाठी सहज उपलब्ध असल्याने माझा वापर सातत्याने केला जात असे. काही काळापूर्वी मी खूप सुंदर व आकर्षक होतो परंतु जास्त काळ वापरात असल्याने आता माझे आवरण फाटलेले आहे आणि काही पाने बाहेर येऊ लागलेली आहेत.

माझ्यामध्ये अत्यावश्यक असे संपूर्ण ज्ञान सामावलेले आहे. म्हणून मी आजही लोकांना मार्गदर्शक ठरत आहे. माझे ग्रंथालयातील स्थान अढळ आहे परंतु माझी परिस्थिती मात्र खूप दयनीय बनलेली आहे. रोज माझी काही पाने हलकी बनतात तर काही पाने निसटतात. वाचताना प्रत्येक जण माझी पाने निष्काळजीपणे हाताळतो.

वाचक आणि ग्रंथालयातील सफाई कामगार हे माझी काही वेळा काळजी घेतात तर काही वेळा मला डावलतात. चुकीच्या वापरामुळे मी अनेक वेळा खाली जमिनीवर देखील पडलेलो आहे. ग्रंथालयातून मला काही लोक वाचनासाठी घरी देखील घेऊन जातात. घरी नेल्यावर तर मला लोक कोठेही ठेवतात.

माझी फाटण्याची वेळ तेव्हा सुरू झाली जेव्हा एका अजाण व्यक्तीने मला फक्त मज्जा म्हणून घरी नेले. त्याच्या घरी वाचन संस्कृती नसताना देखील त्याने मला अनेक दिवस त्याच्या घरी ठेवले. त्याचे इतरही नातेवाईक मला कसेही हाताळायचे आणि इकडेतिकडे फेकून द्यायचे. त्यावेळी माझी पाने आणि आवरण फाटण्यास सुरुवात झाली.

माझ्या जीवनात अनेक चांगले प्रसंग देखील आले. एक शालेय विद्यार्थी जो निराशेच्या खाईत लोटला होता त्याच्यासाठी मी एक नवीन जीवनाची उमेद म्हणून उभा राहिलो. अनेक वृध्द व्यक्तींसाठी त्यांच्या उपरोक्त जीवनात ज्ञान मार्ग ठरलो तर तरुणाईसाठी त्यांचे कर्तुत्व सिद्ध करण्यास सहाय्यक ठरलो.

माझे प्रकाशन हे आता नवीन स्वरूपात मांडण्यात आल्याने माझे महत्व आणि वापर थोडा कमी झालेला आहे. माझ्यातील पाने जीर्ण झालेली आहेत. काही पाने निसटून गेलेली आहेत. आवरण तर अत्यंत जुने वाटत आहे. माझी आकर्षकता कमी झाल्याने मला कसेही वापरले जात आहे.

माझी सद्यस्थिती जरी बरी नसली तरी माझ्यामुळे अनेक लोकांच्या जीवनात फरक पडलेला आहे. माझ्यातील ज्ञान व उपयुक्त माहिती यांमुळे अनेक लोकांचे विचार व जीवन बदललेले आहे. माझ्यातील मजकूर हा त्यांच्या जीवनाची गती आणि दिशा बनलेला आहे. त्यामुळे मला माझ्या जीवनात खूपच समाधान अनुभवास येते.

तुम्हाला फाटक्या पुस्तकाची आत्मकथा हा मराठी निबंध (Fatakya Pustakachi Atmkatha Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment