chandrayaan 2
image credit -Firstpost

काल भारताने अंतरिक्षाच्या दुनियेत चांद्रयान-२ च्या रूपाने नवीन अध्याय लिहिला आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी कामगिरी इसरो ने करून दाखवली. चांद्रयान २ हि भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो) ने सुरू केलेली मोहीम आहे. ज्याद्वारे भारत आपली दुसरी चंद्रावरील संशोधन मोहीम सुरु करेल.

चांद्रयान २ चे लाँचिंग, सतीश धवन सेंटर, श्रीहरिकोटा, आंध्रप्रदेशच्या दुसऱ्या लॉन्च पॅडमधून झाले. हे भारतातील सर्वात शक्तिशाली जीएसएलव्ही एमके-3 रॉकेटमधून लॉन्च केले गेले. आणि आता ते सुमारे 55 दिवसांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. या मोहिमेची काही आश्चर्य चकित करणारी रोचक तथ्ये आहेत, ती आपण आज पाहणार आहोत.

चांद्रयान २ ची काही रोचक तथ्ये-

१. चंद्रयान २ मधील लँडर-विक्रम आणि रोव्हर-प्रज्ञा दक्षिणेकडील ध्रुवावर उतरतील, तर ऑर्बिटर चंद्राभोवती फिरतील आणि विक्रम आणि प्रग्यान येथील सर्व माहिती इसरो च्या केंद्रापर्यंत पाठवेल.

२. या प्रकल्पाचा खर्च 1000 कोटी रुपये असल्याचा दावा केला जात आहे. जो आत्तापर्यंतचा सर्वात कमी खर्च आहे एका चंद्र मोहिमेचा.जर हि इसरो ची मोहीम यशस्वी झाली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर जाणारा आणि मोहीम यशस्वी करणारा भारत हा चौथा देश बनले.

३. यासाठी वापरलेल्या जीएसएलव्ही एमके-3 रॉकेट चे वजन 640 टन आहे, म्हणून याला तेलगू प्रसारमाध्यमांनी बाहुबली नाव दिले आहे. तर इस्रोने त्यास फॅट बॉय असे नाव दिले आहे.

४. 375 कोटी रुपयांनी तयार केलेले हे रॉकेट चंद्रयान २ ला घेऊन चंद्रा पर्यंत जाणार आहे. जो 3.8 टन वजनाचा आहे. चंद्रयान २ ची एकूण किंमत 603 कोटी आहे आणि तिची उंची 44 मीटर आहे, जी 15-मजल्याच्या इमारती इतकी आहे.

५. ह्या रॉकेट मध्ये तीन फेज इंजिन आहेत. 2022 मध्ये हे रॉकेट भारताच्या पहिल्या मानवी मिशनमध्ये वापरले जाईल. जी इसरो ची भविष्यकालीन योजना आहे आणि त्यात मानवाचा समावेश असेल.

६.चंद्रयान २ चे तीन भाग आहेत. ऑर्बिटर, लेंडर आणि रोव्हर. चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याच्या 4 दिवसांनंतर लँडर-रोव्हर आपल्या ऑर्बिटरपासून वेगळे केले जाईल. लँडर-विक्रम 6 सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवाजवळ उतरेल, जिथे त्यावर तीन वैज्ञानिक प्रयोग केले जातील.

७. त्याच वेळी चंद्रावर उतरल्यानंतर रोवर-प्रज्ञान त्याच्यापासून वेगळे होतील आणि सुमारे 14 दिवसांसाठी इतर वैज्ञानिक प्रयोग केले जातील. दुसरीकडे, संपूर्ण वर्षभर चंद्राची परिक्रमा करत ऑर्बिटर आठ प्रयोग करेल.त्यात पाण्याचा शोध देखील घेतला जाईल.

८. इस्रो चे अध्यक्ष के.सिवन यांनी सांगितले कि, या मोहिमेत 30 टक्के महिलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यात प्रकल्प संचालक एम.वनीता आणि मिशन संचालक रितु करिधाल यांचा समावेश आहे. हि देखील भारतासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे.

९. तज्ञांचा असा दावा आहे की हि मोहीम चंद्राच्या पृष्ठभागाचा नक्षा तयार करण्यात मदत करेल. याशिवाय, या मोहिमेद्वारे चंद्रावरील मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, टायटॅनियम, लोह आणि सोडियम सारख्या घटकांच्या उपस्थितीचा शोध घेतला जाईल.

१०. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या मोहिमेद्वारे चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशाच्या खड्ड्यात गोठलेल्या बर्फाविषयी माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जाईल. चंद्रयान-1 च्या मोहिमेत चंद्रावर हिमवर्षावाचे अवशेष सापडले होते.

शीला दीक्षित यांच्या बद्दल या गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती नसतील…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here