मराठी व्याकरण Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com Thu, 22 Jun 2023 02:55:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.6 https://i0.wp.com/dailymarathinews.com/wp-content/uploads/2020/11/cropped-Screenshot_20201026-143025-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 मराठी व्याकरण Archives - Daily Marathi News https://dailymarathinews.com 32 32 197191671 मराठी म्हणी संग्रह आणि अर्थ _ https://dailymarathinews.com/marathi-money-collection-and-meaning-_/ https://dailymarathinews.com/marathi-money-collection-and-meaning-_/#respond Tue, 20 Jun 2023 04:57:57 +0000 https://dailymarathinews.com/?p=5838 प्रस्तुत लेख हा मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ स्पष्ट करणारा लेख आहे. या लेखात अत्यंत प्रचलित असणाऱ्या म्हणींचा समावेश करण्यात आलेला आहे.

The post मराठी म्हणी संग्रह आणि अर्थ _ appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेख हा मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ स्पष्ट करणारा लेख आहे. या लेखात अत्यंत प्रचलित असणाऱ्या म्हणींचा समावेश करण्यात आलेला आहे. या लेखात स्पष्ट करण्यात आलेल्या म्हणी आपल्याला आयुष्यात खूपच उपयोगी ठरतील अशी आशा…

मराठी म्हणी _ Marathi Mhani _

अति तेथे माती

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे हितावह ठरत नसते.

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा

अति शहाणपण दाखवल्यास लोकोपयोगी कार्य करण्याची वृत्ती निर्माण होत नाही आणि लोकही मदत घेणे सोडून देतात मग ती परिस्थिती स्वतःसाठी नुकसानकारक ठरत असते.

असतील शिते तर जमतील भुते

आपल्याजवळ पैसे, संपत्ती, भौतिक वस्तू असतील तर लोक आपल्या शेजारी जमाव करतात आणि तसे नसेल तर मात्र दूर होतात.

अंथरूण पाहून पाय पसरावे

आपल्या ऐपतीप्रमाणे जीवन जगावे. अतिहव्यास किंवा अति खर्च करू नये.

अडला नारायण गाढवाचे पाय धरी

गरजेसमयी मोठ्या लोकांनाही मूर्खांची मनधरणी करावी लागते.

आयत्या बिळावर नागोबा

दुसऱ्याच्या मेहनतीचा लाभ स्वतः करून घेणे.

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे

आपण कार्य करत असलेल्या क्षेत्रात नेहमीच अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होत असतो.

असंगासी संग आणि प्राणाशी गाठ

दुर्जन लोकांशी संगत केल्यास आपलेच नुकसान होत असते प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.

आधी पोटोबा मग विठोबा

सर्वप्रथम शारिरीक भूक भागवली जाते आणि नंतर देवदेव केला जातो.

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

एखादे कार्य करताना उल्हास नसणे आणि ते काम न करण्यासाठी कारण सापडणे.

आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार

स्वतःजवळ नसलेल्या गोष्टी आपण इतरांना देऊ शकणार नाही.

अंगापेक्षा बोंगा मोठा

खऱ्या गोष्टीपेक्षा त्याचे अवडंबरच मोठे करून सांगितले जाते.

आपला हात जगन्नाथ

मेहनतीची संधी न सोडता स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणे.

इकडे आड तिकडे विहिर

दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.

आंधळे दळते नि कुत्रे पिठ खाते

मेहनत एकाची आणि लाभ दुसऱ्याचा.

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

उतावळेपणामुळे गडबड आणि मूर्खपणा करणे.

उचलली जीभ लावली टाळ्याला

बोलण्यातील लकब आणि कला जाणून न घेता नुसतीच बडबड करणे.

उथळ पाण्याला खळखळाट फार

कोणत्याही क्षेत्रात ज्ञानाची आणि अनुभवाची कमतरता असल्यास ती कमतरता भरून काढण्यासाठी एखादी व्यक्ती खूप बढाया मारताना दिसते.

उंदराला मांजर साक्ष

वाईट कृत्य करत असताना एकमेकांचे साक्षी बनणे.

एक ना धड भाराभर चिंध्या

एकाच वेळी अनेक गोष्ठी करण्याचा प्रयत्न कोणतीच गोष्ट पूर्ण होऊ देत नाही. सर्वच गोष्टी अर्धवट राहतात.

तुम्हाला मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ (Marathi Mhani ani Tyanche Arth) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा...

The post मराठी म्हणी संग्रह आणि अर्थ _ appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/marathi-money-collection-and-meaning-_/feed/ 0 5838
शब्दांच्या जाती – मराठी व्याकरण | Parts Of Speech In Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d/ https://dailymarathinews.com/%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d/#respond Sat, 25 Sep 2021 05:42:11 +0000 https://dailymarathinews.com/?p=2557 प्रस्तुत लेखात शब्दांच्या जाती दिलेल्या आहेत. मराठी व्याकरण अभ्यासताना विद्यार्थ्यांना शब्दांच्या जाती माहीत असणे खूप गरजेचे आहे.

The post शब्दांच्या जाती – मराठी व्याकरण | Parts Of Speech In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
प्रस्तुत लेखात शब्दांच्या जाती (Parts Of Speech In Marathi) दिलेल्या आहेत. मराठी व्याकरण अभ्यासताना विद्यार्थ्यांना शब्दांच्या जाती माहीत असणे खूप गरजेचे आहे.

शब्दांच्या जाती मराठी | Shabdanchya Jaati Marathi |

मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या आठ जाती आहेत.

१) नाम
२) सर्वनाम
३) विशेषण
४) क्रियापद
५) क्रियाविशेषण
६) शब्दयोगी अव्यय
७) उभयान्वयी अव्यय
८) केवलप्रयोगी अव्यय
        
१) नाम : वस्तू, व्यक्ती, स्थान, पदार्थ यांचे ठेवलेले नाव म्हणजेच “नाम” होय.
उदाहरणार्थ : मुंबई , राम ,पुस्तक.

२) सर्वनाम : नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास “सर्वनाम” असे म्हणतात.
उदाहरणार्थ : मी, तो, तू, ते, स्वतः, तुम्ही, हा , कोणी, जो.

३) विशेषण : नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे “विशेषण” होय.
उदाहरणार्थ : छोटा , मोठा , चांगला ,कठीण , वाईट.

४) क्रियापद : या शब्दातून क्रिया (कृती) व्यक्त होते किंवा जे शब्द स्थिती व्यक्त करतात त्या शब्दांना “क्रियापद” म्हणतात.
उदाहरणार्थ : चालणे, बोलणे, ऐकणे.

५) क्रियाविशेषण : वाक्यातील क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास “क्रियाविशेषण” असे म्हणतात.
उदाहरणार्थ : वारंवार , खूप , नेहमी,  दररोज , नित्यनेमाने.

६) शब्दयोगी अव्यय : नाम किंवा सर्वनामाच्या पूर्वी ज्या शब्दांचा उपयोग केला जातो त्यास “शब्दयोगी अव्यय” असे म्हणतात. नाम किंवा सर्वनामाचा दुसऱ्या शब्दांशी संबंध पूर्वस्थितीने दर्शवला जातो.
उदाहरणार्थ : बसल्यामुळे, परवा ,केव्हाच.

७) उभयान्वयी अव्यय : दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणारे शब्द “उभयान्वयी अव्यय” म्हणून ओळखले जातात
उदाहरणार्थ :  त्यासाठी, व , आणि, शिवाय, परंतु.

८) केवलप्रयोगी अव्यय : एखादी तीव्र भावना किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी जो शब्द वाक्यामध्ये वापरला जातो त्यास “केवलप्रयोगी अव्यय” असे म्हणतात.
उदाहरणार्थ :  अरेरे, बापरे, शाब्बास.

तुम्हाला शब्दांच्या जाती – मराठी व्याकरण (Parts Of Speech In Marathi) हा लेख आवडला असल्यास तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

The post शब्दांच्या जाती – मराठी व्याकरण | Parts Of Speech In Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d/feed/ 0 2557
नाम व नामाचे प्रकार – शब्दांच्या जाती| Noun and Its Types in Marathi | https://dailymarathinews.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%b5-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0/ https://dailymarathinews.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%b5-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0/#respond Wed, 22 Sep 2021 08:18:17 +0000 https://dailymarathinews.com/?p=2553 मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना आपणास नाम व नामाचे प्रकार माहीत असले पाहिजेत. नाम ही शब्दाची जात असून त्याचे

The post नाम व नामाचे प्रकार – शब्दांच्या जाती| Noun and Its Types in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना आपणास नाम व नामाचे प्रकार (Noun and Its Types in Marathi) माहीत असले पाहिजेत. नाम ही शब्दाची जात असून त्याचे व्यवस्थित विश्लेषण आणि विविध प्रकार या लेखात सांगण्यात आलेले आहेत.

नाम म्हणजे काय –

नाम : एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा  स्थळाला जे विशिष्ट नाव दिलेले असते त्यास     “नाम” असे म्हणतात.

नामाचे प्रकार कोणते –

मराठी व्याकरणामध्ये नामाचे तीन प्रकार आहेत.
१) सामान्य नाम
२) विशेष नाम
३) भाववाचक नाम
 
१) सामान्य नाम – एकाच जातीच्या घटकांतील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ असे म्हणतात.
        
उदाहरणार्थ – मुलगा, पर्वत, नदी, शहर, प्राणी, पक्षी.

मराठी भाषेत पदार्थवाचक आणि समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जातात.

२) विशेषनाम : ज्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा अथवा प्राण्याचा बोध होतो . त्यास “विशेषनाम” असे म्हणतात.

उदाहरणार्थ – अरुण, हिमालय, गंगा, मुंबई, वाघ, मोर इत्यादी.
  
३) भाववाचक नाम : ज्या नामातून एखादी वस्तू, प्राणी अथवा व्यक्तीमधील गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्यास “भाववाचक नाम” असे म्हणतात.

उदाहरणार्थ – चांगला, वाईट, उत्साह, अप्रतिम, आनंद, दुःख.
                                   

नाम व नामाचे प्रकार (Noun and Its Types in Marathi) हा लेख तुम्हाला आवडला असल्यास तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका…

The post नाम व नामाचे प्रकार – शब्दांच्या जाती| Noun and Its Types in Marathi | appeared first on Daily Marathi News.

]]>
https://dailymarathinews.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%b5-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0/feed/ 0 2553